Welcome to misalpav.com
लेखक: चिनार | प्रसिद्ध:
उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी १. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो. २. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे. ३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे. कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते. ४. फूटपाथवर झोपणाऱ्या सगळ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा सरंक्षण देण्यात यावे. आणि विम्याचा हप्ता सबसिडीमार्फत देण्यात यावा. कारण -- कुत्रे असलेत तरी ते माणसचं आहेत. ५. एखाद्याचा प्रेमभंग झाला असल्यास त्याचे भविष्यातले सगळेच गुन्हे माफ करावे. प्रेमभंग किती वेळा व्हावा याबद्दल बंधन असू नये. आणि अश्या प्रेमवीरांची मद्य पिण्याची व्यवस्था सरकारने त्यांच्या घरीच करावी (अर्थात सबसीडीमार्फतच!) कारण -- प्रेमभंग ही एक नियतीने दिलेली एक शिक्षाच असते. ६. सेलेब्रिटीला जेल मध्ये पाठवयाचे असल्यास त्यांच्या ऐवजी त्यांच्या घरगड्यांना पाठवण्याची मुभा असावी. कारण -- बाहेर राहून २०० कोटींचा व्यवसाय करणारे सेलेब्रिटी अर्थव्यवस्थेला हातभारच लावत असतात. ७. अपघात, शिकार, बलात्कार, देशद्रोह असल्या फालतू कारणांसाठी सेलेब्रिटीवर खटला भरून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये. न्यायालयाबाहेरच असे खटले मार्गी लावावे. कारण-- बडे बडे देशो मी ऐसी छोटी छोटी बाते होती ही रेहती है !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

एक गोष्ट कळत नाही. जज नं विचारलं की प्रॉसिक्युशन नं कमाल खान आणि ड्रायव्हर ला का बोलावलं नाही? प्रॉसिक्युशन कसं बोलावणार? जर त्यांना माहिती आहे की हे दोघे सलमानच्या बाजूने साक्ष देणार आहेत तर ते त्यांना गाळणारच ना! यात प्रॉसिक्युशन नं चुकीचं काय केलं? कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हे प्रॉसिक्युशन ठरवणार ना. डिफेन्स नं त्यांना त्यावेळी त्यांचे साक्षीदार म्हणून का बोलावलं नाही? आणि आत्ता ते हा इश्श्यू का उचलतायत? आणि यड्या हायकोर्टाच्या जज ला हे का कळत नाही?

या महान देशांत, न्याय मिळणे, हे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे. निदान, ज्या कोणाला त्याला शिक्षा व्हावी असे वाटत असेल त्यांनी स्वयंस्फूर्तीने त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा. अशा तर्‍हेने केवळ जनताच त्याला शिक्षा देऊ शकते.

सलमानच्या सिनेमांवर मी तरी बहिष्कार टाकलाय. तो दिसला की च्यानेल बदलतो. कमीतकमी यवढे तरी आपण करू शकतो. सगळ्यांनी हेच केले तर त्याला खरी शिक्षा होईल.

काल सलमानला सेशन कोर्टात शिक्षा होई पर्यंत विनापरवाना गाडी चालवणे, दारू पिऊन चालवणे, त्यात अपघात घडल्यावर पळून जाणे वगैरे सर्वच घडलेले होते. तेंव्हा आपल्याला (म्हणजे त्यात मी देखील आलो) कुणालाच काही पोटतिडीकेने वाटत नव्हते. रविंद्र पाटील हे नाव पण त्या व्यक्तीसारखेच दुर्दैवाने इतिहासजमा झाले होते. पण न्यायव्यवस्थेने एक दणका दिला आणि अगदी मस्त दिला. "देर से आये लेकिन दुरुस्त आये" असे म्हणता येईल कदाचीत... पण त्यानंतर सगळी न्यायव्यवस्था गाशाला गुंडाळून कधी हा सल्लू (खरेच) दगड फोडायला लागतोय (एमपीके मधल्यासारखे शूटींगसाठी नाही!) याची घाई झाली आहे. मधल्या काळात आपल्या पैकी नक्की कोणी कोणी त्याचा एकही सिनेमा तत्व म्हणून पाहीला नाही? मग आज एकदम अन्याय झाला म्हणून चिडचिड करायचे काही कारण आहे का? सलमानची शिक्षा लवकरात लवकर आमलात यावी असे मला देखील वाटते. त्याला आणि संजय दत्त ला कुठलीही विशेष सवलत मिळू नये आणि तुरूंगातून सुट्टी मिळू नये असेच वाटते. पण म्हणून कोर्टाने नियम न पाळता करावे असे वाटत नाही... या सर्व चर्चांमधला आणि त्राग्यामधे माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असलाच - तर सलमानची शिक्षा असणे/नसणे हा नसून, कोर्टात जी दिरंगाई चालते तो आहे. Justice delayed is justice denied हा मुद्दा आहे. त्याला अनुषंगून गरीबांना असे जामीन न मिळणे हा देखील मुद्दा आहेच. असो.

आधी त्याचे एक दोन सिनेमेच पाहिले असतील या काळात. मला आठवतोय तो बॉडीगार्ड पाहिलेला, बाकी नाही. पण ते तत्व म्हणून कमी पाहिले किंवा पाहिले नाहीत यापेक्षा सलमान, शाहरुख यांचे सिनेमे बघावेत असे त्यात काही नसते म्हणून. पण रविंद्र पाटील प्रकरण फारसे ऐकिवात नव्हते हे खरे. यापुढे सलमानला बाद करावे की न करावे याचा निर्णय होत नाही कारण आजकाल मिडिया जिथेतिथे आहेच असल्या लोकांना निदान आपल्या करमणुकीसाठी तरी वापरून घ्यावे का असा दुष्ट विचार मनात येतोय.

रविंद्र पाटील बद्धल फारच कमी माहिती उपलब्ध आहे का ? बाकी ओ ओ जाने जाना वाल्या कमाल खानची एन्ट्री झाली म्हणजे अजुन शाब्दिक स्वरुपात तरी म्हणे... इतक्या वर्षांनी ड्रायव्हर नंतर याचाच "अवातार" न्यायालयात प्रकट व्हायचा बाकी आहे का अजुन ? जाता जाता :- जामिन { आजचा नव्हे } कोणत्याही "कॉमन मॅन" ला इतक्या लवकर मिळवता येउ शकतो का ? याचा विचार करतोय ! संदर्भ :-Miracles happen with celebrities: How Salman Khan managed to get bail in 3 hours
मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Damon Paul - Knight Rider Theme (Official Video HD)

जामिन { आजचा नव्हे } कोणत्याही "कॉमन मॅन" ला इतक्या लवकर मिळवता येउ शकतो का ? याचा विचार करतोय ! Unlike Salman Khan, 60% of undertrials spend 3 months in jail before bail

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar

एक प्रामाणिक प्रश्न, असे बरेच अपघात रोज होतात. कित्येक ट्रकचालक, बस ड्रायव्हर, ईतर वाहनचालक दारु पिऊन गाड्या भरधाव वेगाने चालवुन माणसांना मारतात. अशा बर्‍याच केसेस मधे वाहनचालक जामिनावर सुटतात असे पेपरला वाचायला मिळते. आजच असे ऐकले की सलमान खानच्या केसमधे २ एन्.जी.ओ प्रचंड पैसे लाटण्यासाठी १३ वर्षांपासुन ही केस लावुन धरतायत. साक्षीदारांचे घुमजाव ऐकुन हे खरेच वाटते. कोणाला याबाबत काही अधिक माहिती आहे का?

खरे आहे रे सौंदाळ्या. पोलिसही अनेकदा अशा केसचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी करतात.केसचा निकाला लागायला १३ वर्षे लागावीत ह्यावरून पोलिसांच्या कामाची पातळी लक्षात येते.

सलमान किती चांगला आहे याचा उदो उदो त्याचे वकील करत होते. मुळात तो चांगला असता तर तो दारू प्याला नसता?प्याला असता तर विनापरवाना गाडी चालवली नसती.गाडी चालवून अपघात केला असता तर पोलीकॅंकडे जाऊन कबुली दिली असती.कसला डोम्बलाचा चांगला?ज्याचा बाप निरपराध ड्रायव्हरला बळीचा बकरा करू पाहतो,जामीन मिळाल्यावर सेलिब्रेशनच्या गोष्टी करतो त्याचा मुलगा चांगला असणे शक्य तरी आहे काय?काळापहाड आणि तिमा यांच्याशी सहमत.

माझे तर मत असे आहे की त्याने असले अनेक पालथे धंदे केलेत अन ते झाकण्यासाठी दानशूरपणाचा आव आणतो आहे. शिक्षा झालीच पाहीजे.

जयललिता निर्दोष सुट्ली.राजूला जामिन मिळाला.आता लालू आणि अशोक चव्हाण सुटण्याची आतुरतेने वाट बघतोय.

अम्मा आणि रामलिंगम हे सुद्धा चॅरिटी-वॅरिटी करतात काय ? असा निरागस प्रश्न मनात डोकावुन गेला ! ;) संदर्भ :- Bhai so nice! Behold the charitable genius of Salman Khan जाता जाता :- "It was great fun. Not once did Salman Khan allow anyone feel he was stressed about the impending court verdict. He is a completely chilled guy. I hope I get many more opportunities to work with him."

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

आजच व्हॉट्सअ‍ॅप सारख्या "अधिकृत" माध्यमात वाचल्याप्रमाणे, ; ) दाऊद इब्राहीम भारतात परत येयचा विचार करत आहे. कारण सलमान, जयललीता यांच्या संदर्भातील निर्णय वाचल्यावर त्याचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे.