मानवी मन खरंच किती चंचल असतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायला काही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातच इतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्याला नुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात. मानसशास्त्राचे कितीही शिक्षण घेतले तरी मानवी मनाला अगदी अचूक ओळखण्याची शक्ती कोणालाही मिळत नाही.
अशा वेळेला भूलभुलय्या नावाच्या एका चित्रपटात आलेले वाक्य मला फार आठवून जाते. Psychology is only science without any definition. हर आदमी की सोच अलग, हर ताले की चाभी अलग. एखाद्याला एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तीच गोष्ट दुसऱ्यालाही चुकीचीच वाटेल असे नाही. एखाद्या सापाला मारताना पाहून सर्पमित्राला दुख: होते, त्याच गोष्टीचे दुख: एखाद्या सामान्य माणसाला होईलच असे नाही. अश्या ठिकाणी माणसाच्या भावना समजणे फार कठीण जाते. आपण त्या माणसाच्या गतजन्माचा कितीही आधार घ्यायचा ठरवला तरी अनेकवर्षे चहा ज्याला अतीव प्रिय आहे ती व्यक्ती आजही चहालाच पसंती देईल ह्याची शंभरटक्के खात्री द्यायला कोणी तयार होईल का? अगदी जवळची नात्यातली मंडळी असतील तरी त्यांचाही अंदाज काही कारणास्तव चुकीचा ठरू शकतो.
अश्या ठिकाणी नशीब हा factor समोर येऊ लागतो. ज्याप्रमाणे घाटात अत्यंत सराईतपणे गाडी चालवणाऱ्या चालकाचा अंदाज काही कारणास्तव चुकू शकतो त्याचप्रमाणे मनाचा अंदाज लावणाऱ्याचा अंदाजही चुकू शकतो. ह्याला नशीब समजून सोडून देता आले पाहिजे. नशीब मानवी रूप धारण केलेल्या देवाला चुकले नाही तर आपण तर सामान्यातिसामान्य आहोत. आपल्याला कसे चुकणार. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे , फळ मिळणे नाही. आपण प्रयत्न करून वर्तमानात राहावे आणि चुकलेल्या अंदाजांची शिक्षा भविष्यावर सोडावी हेच योग्य आहे......
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
ह्म्म्म... मन चिंती ते वैरी न
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.माझा थोडा गोंधळ होत आहे !