एक सहज सुचलेली/केलेली तुलना.
फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात.
समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर;
तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम.
पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं.
इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते.
बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही.
ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार.
हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर.
चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते.
गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते.
फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात.
हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता.
आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT.
एक महत्वाचा नामोल्लेख: धाग्यातील चित्रात मागे दिसणारी हर्क्युलियन पोज़मधील व्यक्ती म्हणजे माझा ट्रेकस्नेही परेश
पेणकर होय

प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
व्यायाम करायचा असेल नियमीत तर
धागा व प्रतिसाद आवडले. ते
चिनी प्रकार बरेचसे
छान माहिती.
जिमला जाण्या आधी
थांकू रे.
आपली वाटी आणून येऊ घेऊन जाणे,
केळे
खुपच छान धागा :)
घामाचे काम शरीराला थंड ठेवणं
व्यायामाचे फायदे जरा
व्यायामाचे फायदे जरा सावकाशीने लिहितो.कितीही टेक्नीकल असले तरी शक्य तितक्या सविस्तरपणे लिहा.प्रतिक्षेत.
तेच ते हो :)
व्यायाम हे प्रार्थने सारखे
चांगली माहिती.
धागा आणि प्रतिसाद आवडले.
स्वानुभव
अनुभव सांगितल्याबद्दल अनेक
अभिनंदन.
वय किती आहे ?
सर
शक्यतो
रस
२७
व्वा!
५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज
५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज
आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि
आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि
_/|\_
महत्वाचा विषय
- यावेळी काही परिचितांच्या सल्ल्याने १ महिन्याचा शुगर फ्री चॅलेंज घेतला. चहा कॉफीतून साखर दोन वर्षांपूर्वीच सोडली होती. एक महिना थेट साखर अन अप्रत्यक्ष साखर असलेले सर्व पदार्थ वर्ज्य केले. आता अपवाद म्हणून एखादेवेळेस गोड पदार्थ खातो.
- ब्रेड व इतर बेकरी प्रॉडक्ट्स खाणे जवळ जवळ बंद केले (महिन्यातून एक दोन वेळा खातो).
- तळलेले पदार्थ खाणे जवळ जवळ बंद केले (महिन्यातून एखाद्याच वेळेस अल्प प्रमाणात खातो).
- भातासाठी ब्राऊन राइस वापरणे सुरू केले.
- हापिसातल्या लंचमध्ये फळे व सॅलड खाणे गेली दोन अडीच वर्षे सुरू आहे त्यात बदल करण्याची गरज पडली नाही.
व्यायाम म्हणून हापिसातून घरी आल्यावर अॅरोबिक्स प्रकारचे व्यायाम करू लागलो. दोरीवरच्या उड्या मारणे, कराटेमध्ये उजव्या डाव्या हाताने बुक्क्या मारण्याची अॅक्शन करणे, जागच्या जागेवर धावणे इत्यादी. त्याखेरीज मिनी इलिप्टिकल, अन एक्सरसाइझ बायसीकल खरेदी केली. जेव्हा इतर व्यायाम केले नाही तेव्हा या यंत्रांद्वारे व्यायाम करणे सुरू केले. हापिसच्या इमारतीत मी पाचव्या मजल्यावर काम करतो. पूर्वी एखादेवेळेसच जिन्याचा वापर करायचो. आता रोज किमान दोनदा जिन्याने चढून वर जातो. एकावेळी दोन पायर्यांचे पाउल टाकतो. त्यामुळे अधिक व्यायाम होतो. गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल पुन्हा तपासले असता ते पूर्वीपेक्षा १० टक्क्यांनी कमी झाले. वजनही २ किलो ने घटले. डॉक्टरांनी या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व हेच प्रयत्न पुढे सुरू ठेवण्यास सांगितले आहे कारण कॉलेस्टरॉल अजूनही नॉर्मल नाही. औषध घेऊन कमी करण्याची मात्र अजिबात गरज नाही असे डॉक्टरांचे मत आहे. आयुष्यात प्रथमच ठरवून असे काही करायची वेळ आली अन ते करू शकलो. मला स्वतःला पूर्वीपेक्षा हलके वाटते व कामावरून घरी आल्यावर पूर्वीपेक्षा अधिक उर्जा असल्याचे जाणवते.गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल
चार महिने एक आठवडा
गव्हाची पोळी आणि भाकरी
Pagination