Welcome to misalpav.com
लेखक: परी१२३४५ | प्रसिद्ध:
ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत. परंतु नेमकी माझी बारावीची पूर्व परीक्षा चालू होती दुसरया दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तास मला काही टेन्शन नव्हत. परंतु स्कोरिंग साठी अभ्यासाची माझी धडपड चालू होती. पण ज्यावेळी मला समजले कि आज प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संतूर वादक आदरणीय पंडित शिवकुमार शर्माजी येणार आहेत तेंव्हा परीक्षेचा कसलाही विचार न करता मी त्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरविले कारण संतूर हे माझ खूप आवडते वाद्य आहे आणि पंडित शिवकुमार शर्माजी हि माझी संगीत क्षेत्रातील आवडती व्यक्ती आहे. आणि त्यांचा कार्यक्रम एवडा जवळ आणि मी जाणार नाही अस तर होऊ शकत नाही. त्यामुळे मी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी गेले. कार्यक्रम साधारणता ६ वाजेपर्यंत चालू झाला सुरुवातीला काही मान्यवरांचे कार्यक्रम झाले. परंतु त्यावेळी पंडित शिवकुमार शर्माजी आलेले नव्हते. अचानक एकदम गोधळ झाला कि मकरंद अनासपुरे आले म्हणून सौरभभैय्या, मोनिकाताई, व मी पळत गर्दीच्या ठिकाणी गेलो व खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसले. काही वेळ कार्यक्रम पहिला आणि थोड्याच वेळात पंडित शिवकुमार शर्माजी आले म्हणून एकाच गोंधळ उडाला. आणि ते एकता क्षणी मी सर्व काही विसरून त्यांना भेटण्यासाठी धावत त्यांच्या गाडीजवळ पोहचले. गर्दीतून वाट काढत मी त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांच्या पाया पडले तसे ते माझ्याकडे बघून प्रसन्न हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज होते अगदी सिरीयल मध्ये देवी देवतांच्या चेहऱ्यावर असते तसेच. क्षणभर मी त्यांच्याकडे पाहताच राहिले. मी माझ्याजवळचा कागद आणि पेन ऑटोग्राफ साठी त्यांच्यासमोर धरला आणि ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी गोष्ट घडली. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले कि “ बेटा आप कभी भी किसीसे ऑटोग्राफ मत मांगना बल्की आप इतनी बडी हो जावो कि सारी दुनिया आपसे ऑटोग्राफ मांगे ”. तो क्षण माझ्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता. जो कि मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर खूप कलाकारांशी जवळून बोलन झाल परंतु मी कधीही कोणाला ऑटोग्राफ मागितला नाही. आज हि गोष्ट सर्वांशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ह.ह.पु.वा. बर्‍याच दिवसांनी अशा उत्तम दर्जा चा लेख आणि अत्यंत अभ्यासु प्रतिसाद बघायला मिळाले. बरं वाटलं.

हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ती कु.परी 12345 आणी श्री.प्रा.डॉ चां सत्कार एक एक स्क्रॅपबुक आणी घड्याळ देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अविस्मरणीय कार्यकर्ते

गजराचे असावे अशी प्रेक्षकांतून सूचना आली आहे. आसन क्र १७ बुवांचे शेजारी आणि टक्याचे पाठीमागची लाईन रांग.

मकरंद अनासपुरे सरांचा अनासपुरे सर कधी झाले? मुक्त॑पीठ मोड ऑन - हलकेच घेणे. पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या डायरीतले एक पान - (सर्वाना कळावे म्हणून मराठीत भाषांतर करून लिहीतोय). दि. ३१ डिसेंबर- च्यायला आज सकाळपासून कायतरी पनौती लागली होती. ३१ डिसेंबर साजरा करावा म्हणून प्लान केला होता पण नेमके कुठल्यातरी शिक्षण संस्थेत बोलावणे होते. सकाळीच उठून सेक्रेटरीला हे निमंत्रण घेतल्याबद्दल झा॑ड झाड झाडला. ही शैक्षणिक संस्था दरवर्षी मान्यवरांना बोलावते आणि आम्हाला मानधन न देता उलट आमच्याकडूनच देणगीची अपेक्षा करते.आता शैक्षणिक संस्थेत कार्यक्रम म्हणजे चांगले कपडे घालणे आलेच. आधीच माझी संतूर काही दिवसांपुर्वी प्रवासात गहाळ झाली तो एक खर्च आहेच आता नवीन कपड्यांवर खर्च. गेलो मग नवीन कपडे घालून. थोडाफार मेकप केला आणि चेहर्‍यावर तेज आणले. अतिशय वैतागलो होतो. मुद्दामून उशीराच गेलो थोडासा. जसा कार्यक्रमाला गेलो तर ही गर्दी माझ्या मागे. नुसताच गोंधळ. एकदम एका मुलीने पायावर डोके ठेवले आणि नंतर भूत बघीतल्याचे भाव आणून माझ्याकडे पहात राहीली. काही क्षणांनी अचानक पेन आणि कागद माझ्यापुढे ऑटोग्राफसाठी धरले. नुसता कागद पाहून डोक्यात तिडीक गेली. निदान चांगली डायरी तरी आणायची ना सही घेण्यासाठी. हल्लीच्या पिढीला काहीच कळत नाही. हा कागद नंतर माझ्या सहीसकट कोठेतरी गहाळ नक्कीच होणार. त्यापेक्षा ठरवले की काही झाले तरी सही नाही द्यायची. उगाच बळे-बळे चेहर्‍यावर हसू आणले आणि त्यामुलीला बाजूला करण्याच्या निमित्ताने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मारला एक काहीतरी डॉयलॉग. त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी यायचे बाकी होते. कार्यक्रम केला मग . मध्ये हळूच एकदोनदा त्या मुलीकडे पाहीले तर तिला माझी सही मिळाली नाही याचे काहीच न वाटता उगाच आजूबाजूच्या लोकांना मी काय सांगितले ते सांगत असावी असे वाटत होते. आता ह्यानंतर कोठल्याही सेलेब्रीटीला आटोग्राफ मागण्यासाठी ही कधीच छळणार नाही हे मात्र पक्के... मुक्त॑पीठ मोड ऑफ - हलकेच घेणे.

अग बाई, अस्स झाल होय.बर झाल तुमी सांगितलं.नाहीतर इतके वर्ष मी उगीचच भलत्याच भ्रमात होते कि हो. योगी९०० तुमच्या कल्पना शक्तीला मनापासून दाद.

तुमच्या कल्पना शक्तीला मनापासून दाद. आभारी आहे. हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. सहज गंमत म्हणून लिहीले आहे. बाकी तुम्ही अजुन बर्‍याच कलाकारांना भेटला हे वाचून थोडी जळजळ झाली. त्या जळजळीतूनच वरील प्रतिसाद आला आहे असे समजा.

सहज गंमत म्हणून लिहीले आहे. पण खरच तुमच हे लेखन विचार करण्याच्या पलीकडचे आहे.असा कधीच कुणी विचारच केला नसेल.मलाही वाटल नव्हत.या लेखाला असाही प्रतिसाद येईल. पण छानच आहे

आहो हे काहीच नाही. माझ्यापेक्षाही शतपटीने चांगला विस्तार करू शकतील असे लोकं मिसळपाववर आहेत्... मि.पा.वर तुमचे स्वागत - हे लिहीण्यास विसरलो.

खल्लास फुटलो, जबरदस्त धाग्याला अजुन मोठी लिफ्ट मिळणार आता.

त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज होते अगदी सिरीयल मध्ये देवी देवतांच्या चेहऱ्यावर असते तसेच

मी दिड तास घालवुन एक प्रवासवर्णन लिहिले, मला स्वतःला आवडले ( खोटे कशाला बोलु :-) ) प्रतिक्रिया ३, त्यात १ माझी :-) http://www.misalpav.com/node/30866 - जाहिरात नाव बदलुन कमलिनी/ अप्सरा/ रंभा/मेनका करुन घेतो आता!

लेखावरून मुपी आणि प्रतिक्रियांवरून mechanical डिपार्टमेंटमध्ये असल्याचा भास झाला! :P