Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो . मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले. मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड ! यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे. आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =)) mi - 'मी' अतिअवांतर : मीनिमॅलिझम
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

केवळ "लाल" रंग आहे, म्हणून कम्युनिस्ट???????? भारीच विनोदी बुवा तुम्ही.... कधी कधी त्रिकोणात पण "लाल रंग" असतो. आणि वर्तुळात पण "लाल रंग" असतो. "मिसळ-पाव.कॉम" वर तर "लाल रंगाचा" बराच वापर दिसतो. असो, प्रतिसाद हलकाच घेणे. (चकाट्या पिटणारा) मुवि

हा स्कोअर सेटलिंग चा प्रकार आहे तर, तेव्हाच सगळे इतक्या हिरहिरीने भाग घेत आहेत.
>>> अहो माझे तर वाईट कन्फ्युजन झाले आहे हो , नक्की कोण कोणाचा स्कोर सेटल करु तेच कळत नाहीये , म्हणुन तुर्तास शांत रहातो =))

सही फर्माया आपने...... मिपा म्हणजेच मस्ती मिपा म्हणजेच ज्ञान मिपा म्हणजेच मैत्री आणि मिपा म्हणजेच भरपूर डू.आय.डी. ताई-माई-अक्का यांनी कितीही हिताच्या किंवा कितीही गहन विचार उद्दाम पणे आणि नाना प्रकारे, मांडले तरी योग्य वेळ येताच, ह्या गहन विचार्‍यांचा अवतार समाप्त होतोच. अर्थात अशा अवतारंना आमच्या भाषेत, लोचट किंवा गांडूळ म्हणतात.

एशियन पेंट्सचे धमाकेदार रिजल्ट, डोमेस्टिक डेकोरेटिव बिजनसमधील वॉल्यूम ग्रोथ या फाइनेंशियल क्वॉर्टरमधे 12 पर्सेंट पेक्षा जास्त राहू शकते, कारण लाल रंगाच्या प्रॉडक्ट्सची मागणी वाढत आहे.

आपल्या रंगाच्या दुकानातल्या खूप दिवस न विकले गेलेल्या तांबड्या रंगांच्या डब्यांची छुपी जाहिरात करण्यासाठी मिपाचा असा वापर केल्याबद्दल प्रगो यांचा टीव्र णीशेढ ;) :)

धाग्याची मन लाउन लाल केल्याबद्दल एक हिरव्या रंगाचा डबा, बारिक ब्रश आणि खोडरब्बर देउन पोपशास्त्रींचा सत्कार करण्यात येत आहे.