Welcome to misalpav.com
लेखक: कॅप्टन जॅक स्पॅरो | प्रसिद्ध:
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली. आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. (शतशब्दकथा लिहायचा पहिलाचं प्रयत्न त्या जिलबीएवढाचं गोड मानुन घ्यावा. शतशब्दकथा हा प्रकार भयानक अवघड आहे असं माझं मत बनलेलं आहे.)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात नावडते प्रोफेसर असणार. :) तसं पहायला गेलं तर दिड मार्काच्या लायकीची पण गोष्ट नाही. पण काय करणार लेखनकंडुशमनार्थ टंकावं लागतं काहीबाही. सगळ्यांना कुठे ५/५ च्या लायकीचं लिहायला जमणार.

>>> तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात नावडते प्रोफेसर असणार. :) मी सर्वांचा आवडताच आहे, असं माझं कौतुक माझ्या तोंडून कसं सांगू ? >>> तसं पहायला गेलं तर दिड मार्काच्या लायकीची पण गोष्ट नाही. अगदी खरं आहे. प्रश्न न समजता काही तरी उत्तराच्या जवळपास लिहिलंय असं वाटलं की काही तरी पदरात टाकावं लागतं, तसंच हे काही गुणदान. >>> पण काय करणार लेखनकंडुशमनार्थ टंकावं लागतं हो ते स्पष्ट दिसतंय...! >>> सगळ्यांना कुठे ५/५ च्या लायकीचं लिहायला जमणार. अगदी खरं आहे. सर्वच सचिन तेंडुलकर नसतात पण गल्लीच्या क्रिकेट खेळात फटकेबाजी करणारं पोरगंही सचिनपेक्षा काही कमी नसतं. :) (ह.घ्याच) -दिलीप बिरुटे (मिपा गल्लीतला निवृत्त तुफानी फलंदाज) ;)

वेळ नै सध्या. मिपावरुन मी कुठेच जाणार नाही. व्यवस्थेत असो नसो, मान असो वा अपमान, काही असो. मिपा माझं पहिलं प्रेम आहे. अवांतर : आता उपप्रतिसाद लिहु नका. जरा शांतपणे मिपा वाचू द्या मला. :) -दिलीप बिरुटे

उत्तम प्रयत्न ! आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली. असा उघड शेवट करण्याऐवजी... त्याचे पाय नकळत अडखळून तो थबकला. क्षणभर विचार करून त्याने आपल्या कनवटीची चुरगळलेली शेवटची पन्नासची नोट काढली आणि पावशेर जिलबी घेतली. हे कसं वाटतेय ?

मला आवडली - रादर शेवट टोचला.आता त्या प्रसिद्ध दुकानात जाताना ही कथा आठवेल नक्की. कधी कधी तसे मनात येतच असते,आता अधिक प्रकर्षाने येईल.

छान कथा. मिठाई दुकानाच्या मालकांनीच खरे तर आपल्या सर्व स्टाफला सणासुदीचे म्हणुन मिठाईचे गिफ्टबॉक्स द्यायला हवे होते . बाकी , कनवट म्हणजे आतला खिसा का हो ?

गुढी पाडव्याला पार्ल्याच्या साठे यांचे विजय स्टोर्स मधे जाऊन पहा. भाव असतो ४०० रु. किलो.

जहाज छान आहे पण तू या पेक्षा चांगले लिहू शकतोस काठावर पास व्हायचे बंद कर आधी.

आयडिया छान आहे. फार कठीण असतं हो हे मोजक्या शब्दात गोष्ट मांडणे. लहान मुलांना रात्री गोष्ट सांगताना ट ला ट जोडत मुले झोपेपर्यंत गोष्ट खेचावी लागते आणि आता अगदी उलट करावे लागत आहे. १०० शब्द बास…