Welcome to misalpav.com
लेखक: ganeshpavale | प्रसिद्ध:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय. असामान्य व्यक्तिमत्व, आणि कर्तुत्ववान देशभक्त आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे प्रगाड बुद्धिवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा

मित्रांनो,आपल्याकडे बरीच अशी व्यक्तिमत्व होवून गेली कि जी आजही जनमाणसात अजरामर आहेत. त्यात प्रत्येक हिंदुच्या मनात, मराठी माणसाच्या मनात आपल अढळ स्थान बनवणारे थोर क्रांतिवीर, स्वातंत्रवीर आपल्या पैकी बरेच जणांचे आदर्श………। आपल्या लेखणीने उभ्या हिंदुस्थानात नव चैतन्य निर्माण करणारे ज्यांचे शिवछत्रपती आदर्श होते. ते मवाळ, जहाल आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे "स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर" जय शिवराय जयस्तु हिंदुराष्ट्राम…। - गणेश पावले
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

टिळक आणि गोखले यांच्या विचारांच्या दरीतला सुवर्णमध्य काढण्याची क्षमता असणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा, जाज्वल्य देशाभिमान असेलेला नेता. पण दुर्दैवाने मोलाची वर्ष (टिळक आणि गोखल्यांच्या पाश्चात) काळ्यापाण्याच्या शिक्षेत गेल्याने आणि परत येईपर्यंत ती पोकळी गांधींनी भरून काढल्यामुळे इतिहासात एका भरीव कामगीरीपासून वंचित राहिलेला नेता. (शेवटच्या वाक्यावर बर्‍याच जणांचा आक्षेप असतो). इतिहासात सशस्त्र चळवळीचा पुरस्कार करणार्‍या नेत्यांची धरपकड करून काळ्यापाण्यावर पाठविल्यावर सशस्त्र चळवळ अगदीच ठप्प झालेली दिसते. १९११ मध्ये ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावल्यावर, टिळकांच्या पाश्चात, गांधींचा उदय होण्यापूर्वी (मोक्याच्या वेळी) सावरकरांची राजकीय कारकिर्द जवळजवळ संपुष्टात येते. माझ्या मते जेव्हा सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगातून मुक्त झाले तोपर्यंत गांधी हे "हिंदूंचे" मोठे नेते झालेले होते. काँग्रेसपाठी सामान्या जनता (बहुसंख्या हिंदू) होती. सावरकरांसारखा नेता टिळक-गोखल्यांच्या काळापासूनच काँग्रेसपासून दूर होता. सावरकरांनी त्यानंतर (1937 मध्ये) नेतृत्व केलं ते "हिंदू महासभेचं". लंडन मध्ये "इंडिया हाऊस" चालवणारा, पॅरिस मध्ये मॅडम कामांकडे भूमिगत म्हणून वावरणार्‍या नेत्याला पाश्चात्य संस्कृतीतला सुधारणावाद दिसला नाही असे समजणे हा त्या उत्तुंग नेत्याचा अपमान आहे. कट्टर हिंदुत्वाने भारलेल्या लोकांपुढे (ज्यांनी हिंदुस्थानाव्यतिरिक्त इतर जग पाहिलंच नाही, समुद्र पार केला तर सुचिर्भूत व्हाव लागतं, मुसलमान हे देशाचे कट्टर शत्रू आहेत अशी समज असलेल्यांपुढे) "गो-हत्या पाप नाही" वा हिंदू [संस्कृती] म्हणजे भारतात राहणारे सगळी लोक (मुसलमानांसहीत) अशा आशयाचे, बुद्धिभेदाचे तार्किक विचार मांडले तर त्यांना सावरक कसे समजतील? मग "सावरकर कोणाला कळले नाहीत" हा एक मतप्रवाह बनतो. जिथे आजही नेत्यांना 'जुमल्यांच्या' भाषेत बोलाव लागतं तिथे ७०-८० वर्षापूर्वीची काय कथा. नेता जे बोलतो ते अनुयायांना सोडा, बुद्धिवाद्यांनाही समजण्यात गोंधळ असेल तर त्या नेत्यापाठी जनाधार तरी कसा असेल? सावरकरांसारख्या उंचीच्या माणसाचं दु:ख कदाचित इथे असावं. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, वेगवेगळ्या भाषा संस्कृतीसाठी, साहित्यासाठी सावरकरांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उचित आदर नक्कीच केला पाहिजे. त्याची जाण ठेवली गेली पाहिजे. (माझा मूळ लेख विषयाशी विसंगत इथे आहे. त्यातला हा काही भाग.)