श्री. विवेक पटाईत यांचा अहल्येवरचा लेख वाचावयाला सुरवात केल्यावर सुखावलो होतो. श्री. विवेक मूळ रामायणावरून, तेथील संदर्भ देऊन, लिहत असल्याने "कादंबरीती"ल व्यक्तीचित्रे वाचतांना खटकणारे वाचावे लागणार नाही असे वाटत होते. पण पुढे पुढे गेलो तसे जाणवले की "अरे, हे तर आपण वाचलेल्या "रामायणा"तील नाही." आता रामायण व महाभारत यांचे खंड हाताशीच असतात. बालकांड, सर्ग ४८-४९ वाचावयास सुरवात केली आणि काहीच जुळेना. वैतागलोच. मिपा बंद असल्याने त्यांचा लेख समोर ठेवून तपासणेही शक्य नव्हते. पण शेवटी त्यांनीच आमच्या बंद कुलुपाची चावी दिली. "हरि अनंत, हरिकथा अनंता" त्यांचे "वाल्मीकि रामायण" निराळे व माझ्याकडील " वाल्मीकि रामायण " वेगळे. माझ्याकडे पं. सातवळेकर यांनी संपादित केलेले स्वाध्याय मंडळ, पारडी यांनी छापलेले रामाय़ण (संस्कृत व मराठी भाषांतर) प्रथम प्रकाशन १९५८ ९ खंड ही पुस्तके आहेत. वरदा प्रकाशन यांनी हेच भाषांतर प्रसिद्ध केले आहे. श्री विवेक त्यांच्याकडील रामायणाची माहिती देतीलच. आता तुम्ही म्हणाल " तुमच्याकडील पुस्तकांचे कळले हो, इथे त्याचा काय संबंध ? पुस्तकांची जाहिरात करावयाची ही जागा नाही." मान्य. संबंध असा की श्री. प्रसाद प्रसाद लिहतात त्याप्रमाणे श्री. पटाईत यांची गोष्ट, आपणास माहीत असते त्या मराठी गोष्टीपेक्षा, निराळी आहे व मी जी गोष्ट सांगणार आहे ती आणखीनच निराळी आहे. मी संस्कृत श्लॊक देत नाही, त्याची गरज दिसत नाही. भाषांतर विश्वसनीय आहे, विश्वास ठेवा.(सदाशिव पेठेतील संशयखोरांनी घरी येऊन पुस्तक बघावे !)
(विश्वामित्र रामाला आश्रमाची माहिती देत आहेत )
हा आश्रम महात्मा गौतम ऋषींचा होता. पूर्वी त्या गौतममुनींनी अहल्येसहवर्तमान अनेक संवत्सरसमुहपर्यंत तपश्चर्या केली. एकदा गौतममुनि आश्रमांत नाहीत, अशी संधी साधून सहस्रनयन इंद्र गौतममुनींचा वेष घेऊन आश्रमात आला आणि अहल्येला म्हणाला, "हे सुंदरि, तुझ्याशी समागम करावा अशी माझी इच्छा आहे " हे रामा, हा गौतमाचा वेष धारण करून आलेला इंद्र आहे, हे जाणूनही, प्रत्यक्ष देवराज इंद्रही आपल्या सौंदर्यावर लुब्ध होऊन आला आहे याचे कौतुक वाटून व देवांच्या समागमाचे सुख कसें असतें, हें पहावे , म्हणून त्या दुर्मति स्त्रीने त्याच्याशी रममाण होण्याचे मनांत आणिले. (समागम झाल्यावर) प्रसन्न मनाने ती त्या इंद्राला म्हणाली, "हे सुरश्रेष्ठा, मी कृतकत्य झालें, आता आपण येथून त्वरित जा आणि गौतममुनीपासून आपण स्वत:चे व माझे सर्वप्रकारे रक्षण करा." इंद्र पर्णकुटिकेतून गौतमाची मनांत भीति बाळगून लगबगीने बाहेर पडत आहे तो महामुनी गौतम आश्रमांत प्रविष्ट होतांना त्याच्या दृष्टीस पडले. आपला वेष धारण करणार्या दुराचारी इंद्राला पाहून गौतममुनि क्रोधाने त्याला म्हणाले, "हे दुर्बुद्धे, माझा वेष धारण करून ज्याअर्थी तूं हें निंद्य कृत्य केले आहेस त्या अर्थी वृषणरहित होशील." इंद्राचे वृषण तत्क्षणी भूमीवर गळून पडले. याप्रमाणे इंद्राला शाप दिल्यावर गौतममुनींनी आपल्या भार्येलाही शाप दिला कीं, "इतर कसल्याही प्रकारचा आहार न करतां केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप करीत तूं हजारो वर्षे या ठिकाणीच वास्तव्य कर, व कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता (कोणासही तोंड न दाखवता) तू येथेच आश्रमामध्ये पडून रहा. राम जेव्हा या वनांमध्ये येईल, तेव्हाच हे दुराचारिणी लोभमोहरहित बनलेली अशी तूं त्याच्या आदरतिथ्याने शुद्ध होऊन आनंदाने माझ्या समीप प्राप्त झाली असतां पूर्ववत सर्वांच्या दृष्टीस पडण्यायोग्य होशील",
आता दोन गोष्टींमधील महत्वाचे फरक बघा.
(१) इंद्र गौतमांना घाबरत होता. गौतम नाहीत तेव्हाच तो वेष पालटून येतो इद्राला शासन करण्याइतके तपोबल गौतमाकडे होते.
(२) इंद्राला अहल्येने ओळखले होते. तिचे कृत्य जाणीवपूर्वक होते. ती "कृतकृत्य" झाल्याचे स्वत: म्हणते व इंद्राने स्वत:ला व तिलाही गौतमाचे क्रोधापासून वाचवावे असे म्हणते.
(३) अहल्येने स्वत: पश्चात्ताप करत, कोणालाही तोंड न दाखवता एकांतवासाची शिक्षा भोगावयाची आहे. इथे लोकापवादाशी संबंध नाही.
(४) शाप वृषण गळून पडण्याचा आहे. सहस्रभगाचा नाही. अहल्या प्रथम ही त्याला सहस्रनयन म्हणत आहे.
(५) अहल्येने रामाचे आदरतिथ्य करून शुद्ध व्हावयाचे आहे. मिठी मारणे केवळ अप्रस्तुतच नव्हे तर अनाचरणीय आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर पं. सातवळेकर यांनी दिलेली गोष्टच जास्त सुसंगत, पटणारी वाटते.
आणखी एक गंमत. रामायणाच्या उत्तरकांडात अहल्येची गोष्ट परत येते.तेथे इंद्र अहल्येवर बलात्कार करतो व त्याला त्याचे फळ भोगावे लागते असे म्हटले आहे. पण ही उघड उघड प्रक्षिप्त कथा आहे.
अहल्येची कथा थोड्याफार फरकांनी लिंगपुराण, गणेशपुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण स्कंदपुराण, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, यां ठिकाणी आहे. पण शरदबुवांचा वेळ संपला आहे.
शरद
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
सहमत आहे.
प्रिय शरदराव,
शबरीची कथा रामायणातील एका
विवादास्पद
हसुन मेलो !!!
रामाने......
हीच कथा ठावूक होती...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }शंका निरसन केल्याबद्दल आभारी
जसे महाभारतासाठी भान्डारकर
बडोदा रामायण आवृत्ति प्रमाण
माहितीबद्दल धन्यवाद!
हीच माहिती आहे
इंद्राने बलात्कार केला ही
प्रश्न गौतम ऋषींचाही आहे.
तस म्हंटल तर, मग या बाकिच्या
रामायण
पूर्णपणे सहमत.
श्री राम मर्यादापुरषोत्तम
या कथेत रुपकार्थ का बरे घेतला
रामाकडून अहल्योद्धार हा
ब्याट्या तुझ्याकडला श्लोक टाक