Welcome to misalpav.com
लेखक: पुणेकर भामटा | प्रसिद्ध:
मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे. संपूर्ण चित्रपट एक नितांत सुंदर अनुभव देऊन जतो. लागे राहो मुन्ना भाई नंतर पहिला चित्रपट असेल ज्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागाइतकाच प्रभावी बनवला आहे. कथा अगदी तिथूनच चालू होते जिथे पहिला भाग संपला होता. तनू आणि मनू च्या लग्ना नंतर त्याचं वेगळ होण आणि मनू च्या आयुष्यात तनू सारखी दिसणारी मुलगी येण, मनू तिच्या प्रेमात पडण असा आजकालच्या कुठल्याही मराठी हिंदी मालिके मध्ये शोभेल असा विषय घेऊन दिग्दर्शक आनंद राय यांनी चित्रपट बनवलाय. चित्रपटाचा शेवट हि आपल्या सर्वांना अपेक्षित असा मराठी हिंदी मालिकांमध्ये शोभेल असाच आहे परंतु चित्रपटाचे सादरीकरण हा या चित्रपटाची जमेची बाजू आहे. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे जिवंत केल्या आहेत, विशेष कौतुक करावे लागेल ते कंगना राणावत चे संपूर्ण चित्रपट मध्ये तिने तिच्या वाट्याला आलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे वठवल्या आहेत. माझ्या आवडत्या नायिकांमध्ये काजोल नंतर कंगनाचा नंबर लागेल असे वाटते. दोन व्यक्तिरेखा आणि त्याही परस्परांपासून अगदी वेगवेगळ्या, केवळ किंचितसे चेहऱ्यामध्ये साम्य. या चित्रपटाने डबल रोल चा एक वेगळा पायंडा घालून दिला आहे. एकूणच काय तर चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे, पूर्वीच्या जामन्या सारखे दोन दोन वेळा थेटरात तिकीट काढून बघण्याचा मोह आवारत नाही. - पुणेकर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आणि तो लग्नाचा म्हणून जो काय ड्रेस घातलाय तो कसला मजेशीर आहे. तिचा अभिनय सोडता बाकी सगळी अतिशयोक्ती आहेच्च.
हरयाणाच्या त्या भागात लग्नामध्ये स्त्रीयांनी तसेच कपडे घालण्याची पारंपारीक पद्धत असावी असे मला वाटते.

सहमत...बाकी ती जांभळी लिपष्टिक होती की गडद गुलाबी? वैसेभी पुरुषी डोळ्यांना रंग अंमळ कमीच दिसतात असे शास्त्रज्ञही सांगतात, सबब आमचे म्हणणे चूक असण्याचा दणकून चानस आहे.

माझ्या डोळ्याला तर जांभळट वाटली बुवा. एकंदरीत द्त्तोच ध्यान करुन टाकलय पार त्या सीन मध्ये.. पुढे ती लिप्स्टीक थोडी फेड होते तेव्हा बरी दिसते. पण माणुस दचकेल अशी रंगरंगोटी का केली असावी?!!

असेही असेल दर्शकांनी "ध्यान" पहावे फक्त लावू नये म्हणून !!! हाकानाका !!! जुगलबंदी प्रेक्षक नाखु

के एल पी डी म्हणजे खास लम्हे पे धोका. म्हणजे पहा, आधीच्या विशिष्ट घटनाक्रमामुळे अपेक्षांची पातळी एकदम त्सुनामीसारखी उंचावलेली असते ती नंतर एकदम खास क्षणी, अर्थात जिथे काहीतरी व्हावे असे वाटते तिथेच नेमकी हॉलंड देशाच्या जमिनीसारखी सपाट होते.

म्हणीमध्ये "भरवशाच्या म्हशीस टोणगा होतो" तर के.एल.पी.डी. मध्ये "आधीच्या विशिष्ट घटनाक्रमामुळे अपेक्षांची पातळी एकदम त्सुनामीसारखी उंचावलेली असते ती नंतर एकदम खास क्षणी, अर्थात जिथे काहीतरी व्हावे असे वाटते तिथेच नेमकी हॉलंड देशाच्या जमिनीसारखी सपाट होते." हे अपेक्षित असते. त्यामुळे ही म्हण समांतर म्हणता येणार नाही.. ;)

एग्झॅक्ट समांतर नसेल तर मग ते समांतर नाहीच. कारण ते समांतरच्या व्याख्येलाच निकालात काढते. त्यामुळे आपण "मिळतीजुळती" असा शब्द वापरूया आता. ;)