प्लम रेलिश / चटणी
Primary tabs
गेल्या वर्षी बागेत प्लमचे झाड अगदी फळांनी लगडले होते, भरपूर खाऊन, मित्र-परिवारात वाटून ही काही संपेना, ह्या वर्षी ठरवले होते की प्लम लागले की खाऊन उरतील त्याची चटणी, जॅम असे काही बनवायचे , पण ह्यावर्षी फुलं तशी कमीच फुलली मग फळं ही त्यामनाने कमीच लागली, दोनदा काढून खाऊन झाले मग म्हटले आता जी उरली आहेत त्याची चटणी करु, तर ही प्लमची आंबट-गोड-तिखट चटणी / रेलिशची पाकृ देतेय.
साहित्यः
१२-१५ पिकलेली प्लम्स (आमच्याकडे व्ह्किटोरिया जातीची प्लम्स आहेत, कोणतीही पिकलेली प्लम्स घेऊ शकता)
साधारण १/२ वाटी चिरलेला गुळ (प्लम्सच्या गोडीनुसार गुळाचे प्रमाण घ्यावे)
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून बडीशेप
३-४ लवंगा
१/२ इंच आले किसून घेणे
१-१/४ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्लमस स्वच्छ धुवून, बिया काढून, बारीक फोडी करुन घेणे.
पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, लवंगा घालून फोडणी करणे.
मोहरी तडतडली की जीरे व बडीशेप घालून परतणे.
आता त्यात चिरलेले प्लम्सचे तुकडे घालून ५ मिनिटे परतणे.
प्लमला पाणी सुटून ते मऊसर होतील, जमेल तसे चमच्याने गर दाबून घ्यावा.
आता त्या किसलेले आले व मीठ घालून घेणे.
दोन मिनिटे परतल्यावर त्यात लाल तिखट व गुळ घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहणे.
४-५ मिनिटांनी मिश्रणातील ओलसरपण कमी होऊन मिश्रण दाट होऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करावा.
चटणी पूर्ण गार होऊ द्यावी.

स्टरलाईज्ड बर्णित चटणी भरुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकते.
ही चटणी तोंडीलावणे म्हणून किंवा पराठे, ब्रेड, पॅनकेक्ससोबत किंवा क्रॅकर्स व चीझसोबत सर्व्ह करु शकता.
वाह ! काय सुंदर दिसतीये. मी अशी विशाखाच्या रेसिपी ने अॅपल प्लम चटणी करते. मला ही लवंग , बडिशेप आणि आल्याची आयडिया फार आवडली. आता नुसती प्लम्स ची पण एकदा करेन :)
वाव..एकदम टेम्पटिंग दिसतीये चटणी..सद्ध्या इथे पण बरेच मिळतायत प्लम्स. आता करुन बघते.
मस्त
एकदम तोंपासु आहे ही पाककृती.
अवांतर - माझी आई टमाट्यांचे लसूण घालून लोणचे करते. दिसायला ते असेच दिसते.
काय आठवण काढली श्रीरंग भाऊ!!! अहाहा टोमॅटो ची चटणी !! <३
मस्त हो मस्त!
तोंपासु!
सानिका,_/\_
रंगाभाऊ,लोणच्याची कृती मिळेल का?
प्लम्स म्हणजे आपल्याकडे "आलूबुखारा" म्हणतात तेच फळ असते का? जबरदस्त पाककृती आहे ही.
सुंदर दिसतीय ग चटणी.एकदम तोपासु.
सध्या मिळतायत प्लम.करुन पहाते.
_/\_
आम्ही जातो आमुच्या गांवा,
आमचा रामराम घ्यावा..
छानच असतात तुझ्या पाकृ. देखणे फोटो आणी सोप्या भाषेत लिहिलेले वर्णन
छान सोपी पाकृ.
प्लम्स आणि ते झाड पण भारीच..
वाह साने, भारीच
आहाहा काय सुंदर रंग आलाय चटाणीला. मस्तच.
नेहमीप्रमाणेच "स्लssssssर्प" प्रकारची पाकृ !
चटणीचा रंग काय मस्तं चटकदार दिसतोय.
छान सोपी पाककृती. प्लम्स नुसते खायला मला फार आवडत नाहीत पण आता ही चटणीची आयडिया फारच मस्तं मिळाली. नक्की करून पाहते.
चटणी छान दिसते आहे.
चविष्टं असणारच
छान फोटो.
मस्त प्रेझेण्टेशन
कसली भारी दिसते आहे ती चटणी!
कसला सुंदर कलर आलय ग चटनीला.
जरा कमी खटपट आहे सो नक्की करुन बघनार.
सुंदर!
मस्त चटणी
भारी!!
वाह! फोटो किती सुंदर. पाकृही आवडली.
मस्त ! :)
शेवटचा फोटू त्रास दायक आहे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja
केली मी ही चटणी.
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त
जाम भाव खाल्ला आहे तुझ्या रेसिपीने.
झकास
मस्त दिसतेय!
मी प्लमची चटणी फ्रीज करुन ठेवलेय. लागेल तसे एक पाकिट काढते.
फोटो कातील...
नेहमीचाच प्रतिसाद...
१. सुंदर फोटो
२. सुंदर लेखनशैली