जे न देखे रवी... सुंदर तलम रेशीम.. (धागा -३) By प्राजु · Wed, 01/09/2008 - 01:19 ">Wed, 01/09/2008 - 01:19 · 20353 reads · 0 bookmarks Primary tabs बघा मंडळी... आता इथे या सगळे... पुन्हा विणकरी जमूया... ही नवी वीण भाग -३... यात आपल्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या सहकर्याशिवाय हे शक्य नवते. चला पुन्हा विणूया... Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 01:21 पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन... Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/09/2008 - 01:28 पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली... Log in or register to post comments ऋषिकेश 01/09/2008 - 01:28 धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 01:35 पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु Log in or register to post comments ऋषिकेश 01/09/2008 - 01:38 धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 01:40 ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली. Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 01/09/2008 - 01:40 बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 01:44 लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/09/2008 - 01:50 आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा Log in or register to post comments ऋषिकेश 01/09/2008 - 01:52 आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 01:56 धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/09/2008 - 02:01 हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय? Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 01/09/2008 - 02:00 न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 02:13 मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु. Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 02:04 अमेरिकेत आहे मी. - प्राजु. Log in or register to post comments प्राजु 01/09/2008 - 02:22 माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु. Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 01/09/2008 - 02:29 माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :(( Log in or register to post comments प्राजु 01/11/2008 - 00:08 खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु. Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 01/11/2008 - 00:45 तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी Log in or register to post comments प्राजु 01/11/2008 - 01:25 भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/11/2008 - 01:50 पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा Log in or register to post comments प्राजु 01/11/2008 - 01:53 अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/11/2008 - 02:07 तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा Log in or register to post comments सनिल पांगे 01/11/2008 - 22:15 तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल Log in or register to post comments प्राजु 01/11/2008 - 23:25 तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु.. Log in or register to post comments सुधीर कांदळकर 01/13/2008 - 18:40 शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे Log in or register to post comments सनिल पांगे 01/13/2008 - 21:07 प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल Log in or register to post comments प्राजु 01/13/2008 - 22:39 मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:16 मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 01:28 समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:34 सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 01:38 जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:49 तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:58 तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस? Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:04 स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:14 सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला... Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:09 ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु. Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:14 पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:17 वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:18 रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:20 वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:31 मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा... Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:34 शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:39 सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:43 शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:45 खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:52 तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:48 गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:59 प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो Log in or register to post comments प्राजु 01/15/2008 - 02:58 वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु. Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/15/2008 - 03:09 मिटणं म्हणजे प्रेम असंही म्हणता येतं... प्रेमाशिवाय तरी कुठे जिवन हे जगता येतं... Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 01:21 पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन... Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/09/2008 - 01:28 पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली... Log in or register to post comments
ऋषिकेश 01/09/2008 - 01:28 धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 01:35 पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु Log in or register to post comments
ऋषिकेश 01/09/2008 - 01:38 धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 01:40 ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली. Log in or register to post comments
ब्रिटिश टिंग्या 01/09/2008 - 01:40 बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 01:44 लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/09/2008 - 01:50 आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा Log in or register to post comments
ऋषिकेश 01/09/2008 - 01:52 आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 01:56 धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/09/2008 - 02:01 हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय? Log in or register to post comments
ब्रिटिश टिंग्या 01/09/2008 - 02:00 न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 02:13 मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु. Log in or register to post comments
प्राजु 01/09/2008 - 02:22 माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु. Log in or register to post comments
ब्रिटिश टिंग्या 01/09/2008 - 02:29 माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :(( Log in or register to post comments
प्राजु 01/11/2008 - 00:08 खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु. Log in or register to post comments
ब्रिटिश टिंग्या 01/11/2008 - 00:45 तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी Log in or register to post comments
प्राजु 01/11/2008 - 01:25 भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/11/2008 - 01:50 पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा Log in or register to post comments
प्राजु 01/11/2008 - 01:53 अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/11/2008 - 02:07 तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा Log in or register to post comments
सनिल पांगे 01/11/2008 - 22:15 तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल Log in or register to post comments
प्राजु 01/11/2008 - 23:25 तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु.. Log in or register to post comments
सुधीर कांदळकर 01/13/2008 - 18:40 शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे Log in or register to post comments
सनिल पांगे 01/13/2008 - 21:07 प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल Log in or register to post comments
प्राजु 01/13/2008 - 22:39 मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:16 मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 01:28 समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:34 सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 01:38 जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:49 तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 01:58 तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस? Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:04 स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:14 सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला... Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:09 ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु. Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:14 पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:17 वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:18 रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:20 वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:31 मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा... Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:34 शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:39 सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:43 शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:45 खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:52 तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:48 गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 02:59 प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो Log in or register to post comments
प्राजु 01/15/2008 - 02:58 वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु. Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/15/2008 - 03:09 मिटणं म्हणजे प्रेम असंही म्हणता येतं... प्रेमाशिवाय तरी कुठे जिवन हे जगता येतं... Log in or register to post comments
पाऊस झिरमिर झिरमिर
पानापानात बरसतो
पाऊस अल्लड अवखळ
धरेशी पिंगा घालतो..
- प्राजु.
चला शो मस्ट गो ऑन...
पावसाच्या सरींनी
धरा न्हाऊन निघाली
अन नववधू सारखी
ती हिरवीगार झाली...
धरेशी पिंगा घालतो
पावसाचा गहिवर
की धरेस भेटाया बरसला
मेघकुंभ अतिआतुर
पाण्यात वाकूनी तरू
प्रतिबिंब आपुले पाहते
क्षितिजाला टेकूनी नभ
धरेला गूज सांगते..
- प्राजु
धरेला गूज सांगते
अतिचपळ विद्युल्लता
धरणीही मग लाजून भिजते
ऐकून आकाशाची कथा
ऋषिकेश....
फारच सुंदर...
बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली.
बरसणार्या मेघांच्या तालावरी
हिरवेगार पीक डौलती
जणू पावसाच्या स्पर्शाने
धरणीचे रोमांच उभे राहती
लाजलाजली पाहूनी भास्करा
पांढ-या वस्त्रा आड लपली
हळूच सरला नाजूक पदर
अन अवनी ती धुंदित झाली
- प्राजु.
आज झाले मज काय
नाही 'मी' तो कालचा
काल मन माझे होते
आज 'मी' झालो मनाचा...
चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :(
उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन....
(मनमौजी) -इनोबा
आज 'मी' झालो मनाचा
पण माझे मन आहे कोठे?
घेऊन गेलीस ते तुजसवे
आता उरले फक्त नाते
धन्यवाद.. विनोबा,
उद्या या पुन्हा..असेच.
-प्राजु.
हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय?
न लगे थांग तिच्या
अथांग मनाचा
गुंता कसा सोडवू मी
न उमजलेल्या भावनांचा
मन माझे हिरवे हिरवे
घेई झेप आकाशी
पंख पसरूनी पुन्हा
विसावे तुजपाशी..
- प्राजु.
अमेरिकेत आहे मी.
- प्राजु.
माझ्या मनाचा थांग
मी कवितेतून मांडला
चारोळीतून शब्दांचा
सडाच इथे सांडला..
- प्राजु.
माझ्या मनाचा थांग
न समजला तिला
बांधून मोकळी झाली ती
राखी माझ्या हाताला :((
खूप खोल जाऊनही
नाही समजले तिचे मन
तिने मात्र अर्पिले मला
तन, मन आणि धन..
- प्राजु.
तिच्या मनाच्या डोहात
मारूनी खोल बुडी
मला न समजे कोठे
माझ्याबद्दलची भावना दडी
(दडलेला) छोटी टिंगी
भवनेला शब्दात गुंफून मी
कागदावर ठेवले..
माझे मनंही नकळत
अश्रू बनून ओघळले..
- प्राजु.
पुस डोळे सखे आता
सांग तुला हवे काय...?
माझं मन हे अबोल
जशी दूधावर साय...
(फणसा सारखा) -इनोबा
अबोल अबोली फुलून आली
आज माझ्या अंगणी..
हजार नक्षत्रे क्षणात हसली..
रूप तिचे पाहूनी..
- प्राजु.
तुझं रूप हे लोभस
तरीही का मन भकास
तुझं हसणं हे असणं
आणि मी आहे आभास
(मन माझे हे...) -इनोबा
तसं पाहीलं तर
खेळला तर जुगारही चांगला आहे
काहीचं नसण्या पेक्षा
मोल आला तर भंगारही चांगला आहे
@सनिल
तुझं हसणं जणू
चांदण्यांच शिंपणं...
तुझ्यात गुंतून माझा
'मी'पणा संपणं...
- प्राजु..
शिंपलेस तू
हृदयांत मिपाकरांच्या
प्रीतिचे मळे
मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे
प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
@ सनिल
मनांत माझ्या
मोराची केकारव
मिपाकरांचे प्रेम असेच मिळो
हीच देवाकडे आर्जव..
- प्राजु
मोर नाचला वनात
हर्ष माझीया मनात
त्याचे मन दुखी: कष्टी
अशृ लपती पाण्यात
(पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा
समुद्राने एकदा
गोड व्हायचं ठरवलं
माशांच्या अश्रुंनी
सारं पाणी खारावलं..
- प्राजु
सागराच्या खारट उदरामधे
जिवन कसे रंगीत असते
तो कसाही असला तरी
त्याच्यातही जिवनसंगीत असते...
(अथांग) -इनोबा
जीवनाच्या संगीतात
तू माझा सूर आहेस
माझ्या ललाटीचा
तू नूर आहेस..
- प्राजु
तुझ्या ललाटी विधात्यानं
माझंच नाव का बरे लिहावं?
तूझ्या भांगातल्या कुंकूतही
मी तुझा होऊन जगावं...
(तूझाच) -इनोबा
तूझ्या भांगात कुंकु भरताना
तू किती स्वप्नं पाहीली होतीस
खरं सांग तेव्हा तू
स्वतःची किती राहीली होतीस?
स्वप्न अधूरी सोडून तू
जाशील असं वाटलं नव्हतं...
सुखाची किरणे झाकोळणारं
ढग तेव्हा दाटलं नव्हतं...
(......) -इनोबा
सुख म्हणजे काय?माझ्यासमोर
सगळा पाढा त्याने पढला
आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे
तो ढसाढसा रडला...
ढग दाटून असे आले
मनांत काहूरांचे
गालवरती ओघळले
थेंब कोणते... पावसाचे?
- प्राजु.
पाऊसही असा
वेड्यासारखा वागतो..
तुझ्यासोबत भिजावं तर..
फक्त शिंतोडे उडवून जातो
- प्राजु
छान आहे चरोळी.. भांगाची.
वेडा आहे मी
असं तू सारखी म्हणतेस
पण मला पाहिलं की
तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस...
(का बरं?) -इनोबा
रात्र अशी अबोल
ढ्साढसा रडते
रजनी नाथालाही
अंधारातच ठेवते..
- प्राजु
वेडा आहेसच तू
हे काही नवे नाही
मुक प्रेम करणे, तुला
दुसरे काही हवे नाही
- प्राजु.
मी आहे जरा असा
मनातूनच जगणारा
प्रेमामधेही,मूक्या
शब्दांसारखा वागणारा...
शब्द मुके होतात
वाणी द्वेश करते..
तुला पाहताक्षणी
नजरच माझी बोलते..
- प्राजु.
सगळ्याच गोष्टी सांगूनही
तूला मला समजत नसतात...
काही गोष्टी मूक्यानेही
खुप काही बोलत असतात...
(अव्यक्त) -इनोबा
शिशिराच्या पानगळीनं
तो इतका झडला होता...
माझ्याबरोबर बोलता बोलता
मूक्यानेच रडला होता...
-इनोबा
खूप काही बोलूनही
मी काहिच बोलले नाही
तुझ्या दोन शब्दांनी
मी माझीच उरले नाही..
- प्राजु
तू हवीस फक्त
आणखी काही मागत नाही
तसा कधी कधी मी
वेड्यासारखा वागत नाही...
(ठार वेडा) -इनोबा
गळताना झाडावरून
प्राजक्त मुसमुसतो..
क्षणभंगूर जीवन त्याचे
पण आसमंत फुलवतो
- प्राजु
प्रेमाचा प्राजक्त
प्रत्येकालाच हवा असतो,
पण...प्रत्येकाच्या आसमंतात
दरवळेल,याचा नेम नसतो
वेड्यासारखे वागणे
म्हणजे नक्की कसे?
कमळामध्ये भुंग्याने
मिटून जाणे जसे?
- प्राजु.
मिटणं म्हणजे प्रेम
असंही म्हणता येतं...
प्रेमाशिवाय तरी कुठे
जिवन हे जगता येतं...