Welcome to misalpav.com
लेखक: सुहासदवन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अपघात झालेल्या गोविंदांची मलमपट्टी आणि जास्त नुकसानीची भरपाई सरकारने का करावी, त्या मंडळांनी का करू नये. जर कोणी मृत झालाच तर त्या मंडळावर किंवा प्रायोजकावर मनुष्य वधाचा गुन्हा का चालवू नये. हा तर जास्तच...

दर वर्षी दही हंडी या खेळात हंडी खालचा गोविंदांचा डोलारा बरेच वेळा कोसळतो . माणसे जखमी होतात आणि त्यातील काहींचा मृत्यु होतो. हे अपघात बहुतांशी वरच्या थरातील गोविंदा रस्त्यावर (बहुधा डांबरी) कोसळल्याने होतात. या वर्षी एका वाहिनीने सांगितल्या प्रमाणे फक्त मुंबईत २६७ गोविंदा जखमी झाले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी हा विचार मनात आला . सर्वात खालचे कडे असते त्याच्या बाहेर जमिनीवर अंथरलेले एक गाद्यांचे कडे करावे. ते अनेक सहज जोडता येणार्या आर्क( भूमितीतील मराठी शब्द आठवत नाही) आकाराच्या गाद्या वापरून बनवावे. त्याची रुंदी पुरेशी असावी, म्हणजे donut च्या आकाराचे ची पुरेशी जाड गादी बनवावी. कोसळणारे बरेच गोविंदा या शॉक absorber गाद्यांवर पडतील आणि त्यांचे अगदी किरकोळ जखमांवर निभावेल. पोलिसांनी परवानगी देण्यापूर्वी सर्व दही हंडी खेळ योजना करणार्या संस्थावर या सुरक्षा कवचाची सक्ती करावी. प्रेक्षक गादीवरच येउन गोंधळ करणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. कदाचीत हा गादी सेट काही वर्षासाठी पुनः वापरता येईल.

डीजेंच्या दणदणाटात ध्वनीमर्यादेचे सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या दहीहंडी मंडळांवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारणारे ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर (५३) यांना नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. या प्रकाराने अतिउत्साही नेत्यांच्या दहीहंडी मंडळांना वाचविण्यासाठी खाकी वर्दीतील गुंडगिरीच समोर आली. संदर्भः http://www.loksatta.com/maharashtra-news/social-worker-beaten-up-in-thane-by-cops-185792/

महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात गोकुळाष्टमीस कानोबा अंगात येतो असे ऐकण्यात आले. त्याबद्दल अधीक माहिती हवी आहे.