पाककृती

बाप्पाचा नैवेद्य : केशर-मलई मोदक पेढे

Primary tabs

.

साहित्यः

रीकोटा चीझ १ टब किंवा २५० ग्रा.
कंडेन्स्ड मिल्क टीन - ३५० ग्रा. (मी अर्धा टीन वापरला)
१/४ वाटी गरम दुधात केशर चुरडून मिसळलेले
१/४ टीस्पून भरडसर कुटलेली वेलची

.

पाकृ:

नॉन-स्टीक पॅनमध्ये रीकोटा चीझ काढून सतत मध्यम आचेवर ढवळत रहावे.
आधी चीझ पातळ होईल, मग १५-२० मिनिटांनी त्यातील ओलसरपणा कमी होऊन ते खव्याप्रमाणे कणीदार, गोळा होऊ लागेल.
ह्यात आता आपल्या चवीप्रमाणे कंडेन्स्ड मिल्क ओतावे, मला बरोबर अर्धा टीन लागला.
कंडेन्स्ड मिल्क मिक्स केल्यानंतर केशर मिश्रीत दूध घालावे व सतत ढवळत रहावे.

.

२०-२५ मिनिटांनंतर मिश्रण आळु लागेल, ह्यात आता वेलची घालून मिक्स करावे.
थोडेसे मिश्रण प्लेटवर काढून त्याचा गोळा करुन पहावा, गोळा नीट झाला म्हणजे मिश्रण पर्फेक्ट तयार झाले.
गॅस बंद करुन मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.
पूर्ण गार झाल्यावर चांगले मळून घ्यावे.
मोदकाच्या साच्यात छोटे-छोटे गोळे भरुन मोदकाचा आकार द्यावा.

.

मोदकाचा आकार द्यायचा नसेल तर छोटे गोळे करुन ते चपटे करुन पेढे तयार करावे व त्यावर पिस्त्याचे काप लावावे.
बाप्पाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यावे :)

.

.

रीकोटा चीझऐवजी तुम्ही खवा वापरु शकता. खव्याला आधी चांगले परतून घ्यावे व पुढिल कृती वर दिल्याप्रमाणेच करावी.

गणपती बाप्पा मोरया !!
__/\__

पीके

छानच आहे. फोटो पण मस्त. फक्त एक शंका विचारतो, यात साखर घालायची नाही का?

त्रिवेणी

कंडेन्स मिल्क गोडीसाठी पुरेसे असावे असे मला वाटते.
बाकी पाकृ नेहमीप्रमाणे झकास.

रेवती

नेहमीप्रमाणेच म्हणते. काय ते समजून घ्यावे.

ब़जरबट्टू

तोपांसू आहेत..

मोदकाचा आकार गंडला दिसतोय.. अर्थात त्याने काही फ़रक पडत नाही म्हणा.. :)

अजया

मोदक मोदकासारखेच तर दिसत आहेत!
सानिका माते ती रंगसंगती किती सुंदर साधली आहेस फोटोत.दंडवत स्विकारा!

पियुशा

व्वा झकास झालेत मोदक कलर सुरेख आलाय

शेफिल्डचा राजा खूष झाला असेल ग हे तुझे मोदक पेढे पाहून. फार सुरेख दिसत आहेत..
स्वाती

येक नंबर!

....................

असे मोदक का नै करत लोकं? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
दुत्त दुत्त!

हल्ली मिळणारे लो कॉलिटी केशरी मोदक आणी पेढे ,दोन दीवसात वाळून कडक होतात. आणी फोडुन पाणी टाकलं,तर गंधगोळी म्हणून-कामी येतात. ;)

Mrunalini

अप्रतिम मोदक सानि.. खुप छान. करुन बघायला पाहिजे.

इशा१२३

साने सुरेख दिसताहेत केशरी मोदक.उचलावासा वाटतोय अगदि.

पद्मावति

मस्तं पाककृती. सोपी वाटतेय. नक्की करून बघणार.
केशराचा रंग अतिशय सुरेख आलाय. सादरीकरण फारच सुंदर.

दिपक.कुवेत

सोपी, सुटसुटीत पाकॄ. रीकोटा ईथे मिळतच सो करुन पाहिन. पण फुल क्रिम दुध आटवून खव्याचे असेच होतील का? आय मीन कणीदार खवा होईल का? मागे एकदा मी असा खवा केलेला पण तो फारच ड्राय आणि कड्क झाला होता.