पाककृती

भरली केळी

Primary tabs

रुची विशेषांक पुरवणी ( अनेक्स )साठी अनाहुतांकडून :-

भरली केळी

साहित्य:-

राजेळी केळी, ओलं खोबरं ,गुळ.

कृती :-
१) राजेळी केळी आणून त्याची साल काळी पडू लागली की ते तयार झाले समझते.साल काढा आणि जपून ठेवा.ती वापरायची आहे.

फोटो १

फोटो २

२) तीन चार तुकडे करा.सुरीने त्या तुकड्यांना थोडी चीर द्या.

३) ओल्या खोबय्रात थोडासाच गुळ घालून शिजवून मोदकाचे सारण करतो तसे करा आणि केळ्याच्या चीर दिलेल्या तुकड्यांत भरा.

फोटो ३

४) पॅनमध्ये केळ्याची साल ठेवून थोडे तुप खाली सोडून त्यावर तुकडे ठेवा.वरती केळ्याचे/ हळदीचे पान वगैरे ठेवले तरी चालेल.वीस मिनिटे झाकण लावून मंद आचेवर शिजवा.

फोटो ४

फोटो ५

टीप :- १) राजेळी केळी तमिळ/केरळी दुकानदार भाजीवाल्यांकडे मिळतात.साधी हिरवी केळी वापरली तर स्वाद एवढा चांगला येत नाही.
२) साधी केळी असतील तर केळ्याच्या सालीस दोन उभे काप मारून सालीतून केळे बाहेर काढा.वरीरप्रमाणे सारण भरून तव्यावर/पॅनमध्ये थोडे तुप लावून शिजवतांना साल वापरू नका.तयार झाल्यावर काढलेल्या सालीतच पुन्हा हे तुकडे भरून साल थोडीशी उघडल्यासारखे दाखवून मांडून खाण्यासाठी ठेवता येते.यात सालीचा उपयोग सजावट म्हणून होतो. ही कृती साधारणपणे गोव्याकडच्या लोकांकडे वापरात आहे.

अनाहुत लोकांची पुरवणी फार आवडली हो..!
वेगळाच पदार्थ.. नक्की करुन पाहिन..

सस्नेह

राजेळी केळी म्हणजे लहान लहान देशी केळी का ?

मार्मिक गोडसे

केळीचा हलवा आवडतो. हा प्रकारही आवडेल.

राजेळी केळी वापरल्यास शिजवताना साल का वापरावी व साधी केळी असल्यास साल का वापरू नये, चवीत फरक पडतो का?

dadadarekar

छान

एस

सारणात थोडी वेलचीपूड घातल्यास अजून चव येईल असे वाटले. करून बघतो.

स्रुजा

अनाहुत पाककृती खास च एकदम ! लगेच करुन बघते, एक केळ उरलंय त्याचं काय करावं हा प्रश्न सुटला. फक्त ते राजेळी आहे की नाही ते कसं ओळखायचं?

दिपक.कुवेत

सोप्पं आहे...सोलून बघ कि...कंजूस रावांनी म्हणून सोललेल्या केळ्याचं चित्र दिलं आहे.

स्रुजा

असंच काहीसं दिसत होतं ब्वॉ माझ्या कडचं केळं. जे काही होतं. केला मी हा प्रकार त्याच दिवशी आणि भन्नाट लागला. त्या सारणात मी वेलची पुड , ड्रायफ्रुट्स वगैरे पण घातले, केळ तुपावर परतलं. कॅलरी च्या नावाने आनंद ! पण चव फर्मास .. मजा आली.

मदनबाण

भरली केळी म्हणजे अती उच्च पाकॄ आहे ! माझ्या मातोश्री हा प्रकार एकदम मस्त बनवतात !
उकडीचे मोदक + तूप आणि भरली केळी + तूप = अमॄत ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यही है प्यार... ;) :- Aa Ab Laut Chalen

त्रिवेणी

दिसते मस्तच आहे. पण इतके गोड नाही खावु शकणार.