Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कदाचीत इथेच ग्यानबाची मेख आहे. कलाकाराच्या "आत" जे काहि शिजतय ते मनाचे पापुद्रे फाडुन एखाद्या विशिष्ट पद्धतीने व्यक्त होणे म्हणजे जर कला असेल तर ज्या ज्या वेळी मनाचे पापुद्रे अलगद उलगडण्याजोगे असतील तेंव्हा नियमीत कलाकृती जन्मास येईल. जिथे मनाचं आवरण घट्ट्/टणक असेल त्यावेळी कलेला उफाळुन वर यायला वाव कमि मिळणार. आणि मनावर तर कोणाचा ताबा असुच शकत नाहि... त्यामुळे कलेच्या प्रदर्शनाबाबबत सातत्य राखणं अशक्य असावं. रियाज/सराव करुन एखादं स्किल डेव्हलप करणं वेगळं. बघणार्‍याला कदाचीत ति कला वाटेल पण कलाकार स्वतःला फसवु शकत नसणार. अर्थात... आमच्या बाबतीत सगळ्याच जर-तर च्या गोष्टी... इस मामलेले अपना हाथ थोडा तंग है :D

प्यारें, आपने सही नस पकडी है, माझे दोन पैसे. प्रतिभा आटत नाही. हरवते. वर म्हटल्याप्रमाणे इतर भावना वरचढ होतात तेव्हा प्रतिभा हरवते. परफॉर्मन्सचं प्रेशर, डेडलाइनचं प्रेशर, लोकांच्या अपेक्षांचे प्रेशर. वैयक्तिक राग-लोभ-अहंकाराचं प्रेशर अशी अनेक कारणं वरचढ झाली की प्रतिभेला जे पाण्यासारखं पारदर्शक मन लागतं ते मिळत नाही. कलाकृती एक काम होतं, कामात मजा येत नाही. जे कलासाधनेत पूर्ण रममाण होतात, ध्यानस्थ होतात, तयांची प्रतिभा आटत नाही, हरवत नाही. काही लोक सतत उच्च दर्जा कायम राखतात. त्यांनी एक्स्पोजर लिमिटेड ठेवलेलं असतं. जे अतिशय चांगलं झालंय तेच पुढे मांडलं. जगात कोणीही सदासर्वदा चांगलंच काम करू शकत नाही. खरा कलाकार सतत नाविण्याच्या ध्यासाने पिसाटलेला असतो. झालेली कलाकृती चांगली की वाईट हे रसिकांच्या मान्यतेवर ठरते. कलाकाराच्या मान्यतेवर नाही. असंख्य कलाकृतींतून काही चांगल्या लक्षात राहतात. त्या चांगल्यांच्या अस्तित्वात येण्यासाठी त्या असंख्य वाईट कलाकृतीही मदत करत असतात. केवळ उत्त्मच काम करेन असे म्हणून कोणी कलाकार आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही.