Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अशी बायको असती तर

ह — हरिदास, Sat, 03/05/2016 - 07:25
अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात कफनी घालून, रानावनात निघालो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अशी बायको असती तर पेशवाई गाजवली असती, मिजास मोठीकेली असती, राजबिंडा बनून मिरावलो असतो पर्वतीवर छोटस आमच असत घर अशी बायको असती तर सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर अशी बायको असती तर तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम एक ते चार रोज मस्त केला असता आराम दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर उघडले असते शटर अशी बायको असती तर चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती माझ्यासाठी रांग सुद्धा थांबवली असती काही नसते बोलले उडवल्यावर पुणेकरांची टर, अशी बायको असती तर शनिवारवाड्यात माझ्यासाठी खास ठेवली असती जागा सर्वाना बोललो असतो सौजन्याने वागा माझी गाडी नसती थांबवली कोणत्याच सिग्नलवर अशी बायको असती तर आता नाशिबाला दोष लावुन काय फायदा केला असता छातीठोकुन एक वायदा झालो असतो मी या जन्मातच पुणेकर अशी बायको असती तर

प्रतिक्रिया द्या
22590 वाचन

💬 प्रतिसाद (41)
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 07:42 नवीन
लोल लोल लोल लोल हरिदासपंत आपणास मिपाचे 'देवांग पटेल(पुणेकर)' हा किताब शनवारवाड्यासमोरील पुलावर, जिथे टाकाऊ चार्जर मिळतात त्या गर्दीच्या साक्षीने देण्यात येत आहे. जरा सोमवारपर्यंत थांबा. सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 03/05/2016 - 08:34 नवीन
गोंधळाला या... पुणे-६ च्या पुणेकरांनो गोंधळाला यावे... लक्ष्मी रोडच्या गिऱ्हाईकांनो.... जं.म. रोडला चिवचिवणाऱ्यांनो... प्रभात रोडच्या 'दाटी'करांनो... टिळकरोडच्या दुचाकीस्वारांनो.... झेडब्रीजला बिलगणाऱ्यांनो... अलका चौकात जमणाऱ्यांनो... पर्वतीवर चढणाऱ्यांनो... सारसबागेत दमणाऱ्यांनो... शनवारवाड्यासमोर ओरडणाऱ्यांनो... कोथरूडात निवांत असणाऱ्यांनो... एफसी रोडवर मिरवणाऱ्यांनो... मंडईतल्या शांतिप्रियांनो... युनिव्हर्सिटीत (झाडांमागे) लपणाऱ्यांनो... पाषाणरोडच्या हुच्चभ्रूंनो... कोर्टातल्या रिकामटेकड्यांनो... क्यांपातल्या एकमार्गींनो.... स्टेशनात धडपडणाऱ्यांनो... शनिपाराच्या भक्तगणांनो... लकडीपुलावर जाहीर होणाऱ्यांनो... गोंधळाला य्याव्वे! (खरा पुणेकर असलं काही ऐकून येतंच नस्तो म्हणा!) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/05/2016 - 09:22 नवीन
@सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस Sat, 03/05/2016 - 09:25 नवीन
त्यां मंगला टाकिजपाशी एक पाणीदार मामा मिसळ पण मिळते म्हणे. अर्थात आधी पातेल्यात डोकावून ती खावी लागते असे जाणकार म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 09:43 नवीन
सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)
सगळ्यांचीच कुवत नसते हो उद्योगपती होऊन स्वतःच्या खर्चाचे नेट वापरण्याची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नीलमोहर Sat, 03/05/2016 - 10:01 नवीन
हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळतअसेलतरकावापरूनयेआणित्याबद्दलनेट्पॅकवापरणार्‍यांनीकशासाठीजळावेम्हणे? आणि मंगला टोकीजकडूनच का यायचे? पुणेकरांना येण्यासाठी गल्लीबोळातले अनेक शॉर्ट्कट आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 10:10 नवीन
हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळतअसेलतरकावापरूनयेआणित्याबद्दलनेट्पॅकवापरणार्‍यांनीकशासाठीजळावेम्हणे?
अगदी हाच विचार मनात आला होता. मात्र सोलापूरी शिव्या खायच्या नसल्याने "जळजळ" शब्द लिहीण्याचा मोह आवरला. :)
आणि मंगला टोकीजकडूनच का यायचे? पुणेकरांना येण्यासाठी गल्लीबोळातले अनेक शॉर्ट्कट आहेत ;)
ते सोलापूरचे असल्याने पुण्याचे गल्ली-बोळ त्यांना ठौक नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 12:18 नवीन
नवकविंचा सत्कार कुठे आयोजित केला आहे ते वाचावे. तेथे जायचा मंगला टोकीज कडूनचा रस्ता मला माहीती आहे. बाकी गल्ल्या काहून हुडकायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Sat, 03/05/2016 - 12:38 नवीन
नाहीत हे मोठ्या मनाने मान्य करावे काहून पंगा घ्यावा पुन्या-धन्याशी (अस्स होतं या धाग्यावर आपोआप यमके जुळतात.) पूणेरी शेजारी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 12:42 नवीन
हात जोडतो नाखुकाका यमकहरामी होऊ नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Sat, 03/05/2016 - 13:33 नवीन
त्यांनी गंडा बांधलाय. अता त्यांनाही आपोआप यमके होतात त्याला ते तरी काय करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 13:45 नवीन
भुर्जीला फोडलेले अंडे गुर्जीनी बांधलेले गंडे हपिसात बसलेले संडे सारे बिनकामाचे फंडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ह
हरिदास Sat, 03/05/2016 - 07:54 नवीन
या कवितेतून कोणाला ही दुखावण्याचा मनसुबा नाही. कोणाचे मन दुखावले असल्यास मी मनपूर्वक माफी मागतो.
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Sat, 03/05/2016 - 08:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 03/05/2016 - 09:14 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/05/2016 - 09:30 नवीन
असे Image removed. डब्डे असते तर,आम्ही असे बसलो नसतो भर गवतात लुंगी घालून... सक्काळी सक्काळी निघालो नसतो (दोन दगडांवर!) त्याची नसती आली क'मोडला सर असे डब्डे असते तर!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 03/05/2016 - 09:50 नवीन
वरडा! ___/\___ घ्या गुर्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Sat, 03/05/2016 - 09:53 नवीन
जुने गुरजी परत भेटल्यागत वाटलं अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 09:56 नवीन
होय. हेच आम्चे जुने गुर्जी. कस्सा राव थांबू... या अजरामर तांब्या कवितेची आठवण झाली या निमित्ताने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Sat, 03/05/2016 - 10:02 नवीन
एक वेळ अंड्याविना बुर्जी चालेल पण डबड्याविना गुर्जी हे कसं खपवून घेणार.... ये अशक्य है अनहोनी है. खास गुरुजी आणि वरील लोकांसाठीच हे गाणे.. पसंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 10:12 नवीन
अंड्याविना बुर्जी डबड्याविना गुर्जी वाह... काय यमक जुळवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सस्नेह Sat, 03/05/2016 - 10:15 नवीन
हळूहळू तांब्यागृही परतण्याचे वेध लागताहेत वाट्टं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/05/2016 - 10:19 नवीन
नाय हो नाय! अशीच आली हुक्की म्हणून टाकली थोड़ी फक्की! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 10:21 नवीन
फक्की म्हणजे काय हो गुर्जी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Sat, 03/05/2016 - 10:44 नवीन
चुना... बुवांना ओला चुना(ही) मळायचा अणभव आहे याची नोंद घेणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 03/05/2016 - 10:48 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/05/2016 - 16:36 नवीन
@बुवांना ओला चुना(ही) मळायचा अणभव आहे याची नोंद घेणे>> ढेंण्यवाड ना'खुन्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ग
गणेशा Sat, 03/05/2016 - 11:23 नवीन
आवडली कविता ! चितळ्यांनी रांग थांबवली असती तर तुमच्या तशा बायकोलाच आम्ही घेवुन जावे लागले असते दरवेळेस असे सहज वाटले..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 12:20 नवीन
चितळ्यांनी रांग थांबवली असती तर तुमच्या तशा बायकोलाच आम्ही घेवुन जावे लागले असते दरवेळेस
गणोबा काय रे ह्या वाक्याचा अर्थ? काही लागेना बाबा टोटल. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
य
यशोधरा Sat, 03/05/2016 - 12:41 नवीन
गणेशाबुवा एकदम सुधारक झाले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
अ
अक्षय१ Sat, 03/05/2016 - 14:11 नवीन
गान्धीजीन्चि कविता वैश्नव जन तो याचा अर्थ कोनी सान्गु शकेल काय्?असेल तर प्लीझ प्रतिसाद द्या
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 03/05/2016 - 14:32 नवीन
नाहीतर????? असो. एका व्यक्तीला भेटा. सतीसभौ नाव आहे त्यांच्या काकांचं. (म्हन्जे सतीस्भौ स्न्गतिल, पुतनेभौ पाथ्व्तिल लिहुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय१
ज
जव्हेरगंज Sat, 03/05/2016 - 14:53 नवीन
ल य भा री !!!!!
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Sun, 03/06/2016 - 15:26 नवीन
लॉळलो!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/07/2016 - 06:34 नवीन
अशी बायको असती तर
तर आम्ही तुमच्या शेजारीच घर घेतले असते. पैजारबुवा
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/07/2016 - 09:40 नवीन
काव्य कसंही होवो, मात्र या हरदासाने गुर्जींची कविता मूळपदावर आणली. =))
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 03/07/2016 - 09:46 नवीन
कविता छान!
  • Log in or register to post comments
K
kunal lade Tue, 03/08/2016 - 15:23 नवीन
छान लिहिता हरिदाराव....
  • Log in or register to post comments
ह
हरिदास Wed, 03/09/2016 - 07:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal lade
स
सुमीत भातखंडे Tue, 03/08/2016 - 17:32 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/09/2016 - 08:38 नवीन
अशीच अमुची आई असती वगैरे आठवले! कवीला जास्त दु:ख बायको "अश्शी" नसण्याचे आहे की पुण्यात नसण्याचे आहे ते कळ्ळे नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा