Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 22/07/2016 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया! सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या पाककृती मिसळपाववर प्रकाशित करणार आहोत. गणपतीचे विविध प्रकारचे नैवेद्य आपल्या घरी बनत असतात. घरोघरच्या चालीरीतींप्रमाणे खिरापती ,शिदोरी आदि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यांच्या पाककृती तसेच आपल्या कल्पनेतून सादर केलेल्या विविध प्रकारच्या नैवेद्य पाककृती तुम्हाला फोटोसकट लिहून पाठवायच्या आहेत . या उपक्रमात भाग घेण्यासाठी सर्व मिपाकरांना हे निमंत्रण. बाप्पाचा नैवेद्य असणारी कोणतीही गोड किंवा तिखट पाककृती फोटोसह २५ आॅगस्ट पर्यंत sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर पाठवायची आहे. चला तर मग आपल्या विविध पाककृतींचा नैवेद्य दाखवून मिसळपाव.काॅमचा गणेशोत्सव साजरा करु या!
लेखनविषय:

वाचने 4970
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

भाविक नसलो तरी प्रसाद मिळणाय्रा देवळात जायला फार आवडतं लहानपणापासून॥यात मारुती एक नंबर.खोबरं असणारच.रामाच्या देवळात रामनवमिला सु्ंठवडा.माटुंग्याच्या वरदादादाच्या गणपतीत मुलांना भरपूर उकडलेले चणे देत असत.सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद फार महत्त्वाचा असं पोथीत सांगितलंय.डाकोरजी ठाकोरजी असले की छपन्न भोग ( सात दिवस अष्टोप्रहर ) प्रसाद असतो.प्रसादाला न्याय दिल्याने देव भेटतो म्हणजे आम्हास एकनाएक दिवस देव भेटायला येणा रच.

एक पाकृ फसली २६पर्यंत. पण आता मुदत वाढवलीय तर बघू जमतं का.नाहीतर फसलेली म्हणून नंतर खफवर जागा आहेच.