Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बरोबर आहे, त्यामुळेच सर्पमित्रांचा आणि संशोधकांचा मृत्यू होतो. ते हाताळत असताना खूप वेळा दात लागला हे कळत नाही आणि जेंव्हा कळते तेंव्हा अर्ध्या गौऱ्या मसणात गेलेल्या असतात.

आजच इथल्या दैनिकात बनावट सर्प मित्रांवर बातमी आहे. हे सर्पमित्र चक्क सापांच्या/विषाच्या तस्करीत पण गुंतलेले आहेत म्हणे. अवघड आहे सारं :(

हे प्रकार हल्ली खूप वाढले आहेत. दिस्कोवरी प्रेरित सर्पमित्र गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्र्यांसारखे उगवले आहेत.त्यांना फक्त थोडी माहिती असते आणि फेसबुक चा अल्बम भरायला साप पकडतात. या सर्पामित्रांमुळे जेवढे सापांचे हाल होत आहेत तेवढी बाकीची लोकं पण करत नाहीत, कारण साधारण पणे लोकं सापांना मारतात किंवा पळून जातात, त्यांना घरी अन्न-पाण्याशिवाय उपाशी ठेवत नाही. आपला १९७२ चा वन्यजीव कायद्या मध्ये पळवाटा शोधून हे सर्पमित्र लोकं वन्यसृष्टीची वाट लावत राहतात. आत्ता हे विषाचे वाचून तर वाईट वाटले, यांना फक्त एखादा कोब्रा किंवा मण्यारच धडा शिकवू शकते.

Untamed and Uncut नावाची डिस्कवरी / नॅट जिओची एक सिरीज आहे.. तूनळीवर त्याचे व्हिडीओज मिळतील. हे असे लै उत्साही प्राणीमित्रमंडळ प्राण्यांच्या लै जवळ गेल्यावर प्राण्यांनी आणखी जवळ करून डायरेक यमाच्या जवळ कसे पोचवले / यमाचे दर्शन घडवले याचा आँखो देखा हाल आहे!!

हो कसे किडे करायचे नाही हे त्याचे खरे उदिष्ट आहे, पण ते बघूनच काहींनी अपघात करून घेतले आहे. लोकं जो पर्यंत त्या परिस्थितीतून स्वतः जात नाहीत तो पर्यंत त्यांना अक्कल येत नाही, हा माझा अनुभव आहे. बाहेरच्या देशात अपघात झाल्यावर हेलिकॉप्टर पासून सगळ्या सोई उपलब्ध असतात, विमा असतो त्यामुळे जीव आणि $ पण वाचतात. पण आपल्या कडे असा अपघात झाला तर हॉस्पिटल पर्यंत पोहोचेपर्यंत सर्पमित्र खूप वेळा दगावतो.

फार वाईट वाटले... :( नागांच्या मोठ्या हिंसेची कथा आपल्या इतिहासात सुद्धा दिसुन येते.. राजा परिक्षिताचा पुत्र जनमेजय ह्याला आपल्या पित्याच्या मॄत्यु ने भयंकर दु:ख झाले... { परिक्षिताने कलिला त्याने मागितल्या प्रमाणेच सुवर्ण हे ५वे स्थान दिले होते. परंतु याच सुवर्ण स्थानाचा उपयोग करुन त्याने परिक्षितावर प्रभाव टाकला कारण त्याने ( परिक्षिताने) धारण केलेला मुकुट सुद्धा सुवर्णाचाच होता.कलिग्रस्त झालेला राजा एकदा वनात भटकला असताना भूक आणि तहानलेल्या परिक्षित एका ऋषिंच्या आश्रमात शिरले,समाधिस्थ ऋषिं कडुन त्यानी पिण्यास पाणी मागितले...समाधित असल्याने ऋषिंना राजा तिथे असल्याचे समजले नाही परंतु कलिग्रस्त राजास मात्र हे आपला अपमान करत आहे असे वाटले... तेव्हा रागाने त्यांनी तिथेच पडलेला एक मेलेला साप त्यांच्या गळ्यात टांगला आणि परत निघुन आला. थोड्या वेळाने जेव्हा ऋषिं पुत्र तिथे आला तेव्हा त्यानी हा प्रकार पाहिला. तेव्हा त्या दिवसापासुन ७ व्या दिवशी साप {तक्षक} चावुन राजाचा मॄत्यु होईल असा शाप दिला, त्या प्रमाणेच राजा परिक्षिताचा मॄत्यु झाला.} या गोष्टीचा बदला घेण्यासाठी जनमेजयाने सर्पसत्र करण्यास सुरुवात केली, ज्याच्या यज्ञात अनेक सापांचा आणि नागांचा बळी दिला गेला.

मला वाटतं पुराणातल्या त्या सर्पसत्राचा संबंध नाग या सरिसृपाशी नसून तो नाग नावाच्या एका खास हेर जमातीबद्दल आहे, परिक्षीत माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी राक्षसकुळाचा राजा होता, आणि त्याच्या राज्यात हे हेर प्रचंड प्रमाणात विखूरलेले होते. तक्षक हा त्यांचा प्रमुख असावा.. थोडक्यात तर या कथेचा मनासारखा अर्थ बदलत ती `सापांचा बळी' पर्यंत पोहोचलीय. संदर्भ देण्यासाठी नेमकं काय वाचलेय तेच आठवत नाही म्ह्णून शक्य नाही. जेडी च्या मुळ लेखातली कालियामर्दन वाली गोष्ट ही सुध्दा कुठल्यातरी गंधर्वाला दिलेल्या शापाशी निगडीत आहे. आपले पुर्वज जरी नागाला घाबरत असले तरी त्यांचा नायनाट करण्याऐवजी त्यांना देवत्व देण्याचा शहाणपणा करून आपल्या पिढ्यांना त्यांच्यापासून लांब ठेवण्याच्या पक्षातले असावेत, (नागपंचमीचा दिवस सण म्हणून त्यामुळेच साजरा होत असावा) पण पुढे हा ही शहाणपणा गेला असावा..

मला आजपर्यंत वाटत होता की "हा" परिक्षीत म्हणजे अभिमन्यूचा "तो" कॄष्णाने जिवंत केलेला मुलगा परिक्षीत...

मला आजपर्यंत वाटत होता की "हा" परिक्षीत म्हणजे अभिमन्यूचा "तो" कॄष्णाने जिवंत केलेला मुलगा परिक्षीत हो तोच तो. परीक्षित जनमेजय जनमेजय

माझंच काहीतरी कफ्युजन झालं, बहूदा प्रल्हादाच्या वंशातही एक परिक्षीत होता, त्यामुळे असेल. पण नाग ही जमात असल्याचं वाचुन मला आगदीच `संजय सिंघानीया' झाल्यासारखं नाही वाटलं :)

कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला (त्याची पूजा केली)चा अर्थ गोवर्धन पर्वतावर वृक्षारोपण केले,गोवर्धन पर्वत आणि इतर ब्रजभूमीत पसरलेल्या पर्वतांच्या पायथ्याशी कृष्णाने ९९ तीर्थांची स्थापना (९९ सरोवरांची) स्थापना केली. या पावसाचे पाणी सरोवरांमध्ये एकत्र केले. गुर-ढोर जे यमुनेच्या पाण्यावरच जगत होते आणि यमुनेच्या किनार्यांवरच सर्व घाण करत होते. तेथून दूर गेले. नदीकाठावर कुंजवनाची निर्मिती केली. यमुना स्वच्छ झाली, कालिया नाग पळून गेला. या कार्यांमुळे इंद्राच्या कोप (अकाल आणि बाढ दोन्हीपासून ब्रज भूमीची रक्षा झाली.

वर आणि हा विधिहि करायची पद्धत आहेच.नाग मुद्दाम मारला तर, चुकून मारला गेला तर, दुसऱ्याने मारताना आपण पाहिले तरीही नागाचे श्राद्ध, ह्या विधिद्वारे केले जाते.

:( आमच्याकडे कोल्हापुरात कुम्भारीण मावशी घेउन यायच्या मातीचा नाग. (तो मात्र पाच फड्याचा असायचा) त्याचीच पुजा. नागपंचमी झाल्यावर तो मातीचा नाग तुळशीच्या कुन्डीत विरघळुन जायचा. अवांतर : कुम्भारीण मावचींची टिपीकल आरोळी "नागुबं घ्या नागुबं" अजुन लक्षात आहे.

अवघड आहे! तोंड शिवलेला नाग पाहून तर फार वाईट वाटलं. :(

मनुष्य हा जगातला सर्वात क्रूर आणि दगाबाज प्राणी आहे. आणि त्याच्याच कृत्यांनी त्याचा सर्वनाश अटळ आहे.

नाग, साप आणि काय न काय... आपल्याला ह्या प्राणीसमुदायाबद्दल फार काही माहीती नाही पण एकुण हे प्रकरण लै डेंजर आहे...त्यातल्या त्यात आपला संबंध फक्त...ए मी साप नी तु नाग..आता मला म्हण सापड्या....क्या पीजे पाशीच सुरु होऊन तीथेच थांबतं. लेख मालीका छान... - (फुस्स)वाटया..

च्यायला कसली कसली ढकलपत्र पाठवतो , हे किती महत्चाचे आहे ! मला मेल कराल का ? (आणि ती पी डि एफ इथे देखील अनेकांना हवी असणार आहे!) रच्याकने , फोटु दिसत नाहीत पण त्यामुळे लेख वाचू शकलो ! मला एक कळत नाही ,निसर्गाला सोबत घेऊन विस्तारलेल्या भारतीय संस्कृतीत ही क्र्र प्रथा काय म्हणून आली असेल?

निसर्गाला सोबत घेऊन विस्तारलेल्या भारतीय संस्कृतीत ही क्र्र प्रथा काय म्हणून आली असेल?
अहो मूळ उद्देश कसाही असला तरी त्याची वाट लागणे हे सर्वत्रच दिसते, जातीव्यवस्था, सतीप्रथा, लहान मुलींची हत्या, इ.इ. प्रथाही अशाच डिव्हेलप झाल्या ना. क्रूरतेबद्दलच बोलायचे झाले तर यज्ञात पशुबळीही देतच होते पूर्वी. अजूनही कितीतरी जत्रांत बोकड इ. बळी देतातच.

पुणे : वाइल्ड लाइफ कायद्यातील तरतुदींना अनुसरून सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे जिवंत नागांची पूजा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. परिणामी खंडित झालेली नागपंचमी साजरी करण्याची येथील अनेक वर्षांची परंपरा पूर्ववत करण्याकरिता या कायद्यामध्येच बदल करू, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली. दुवा

काय भीषण प्रकार आहेत!! :( निसर्गाचाच एक भाग म्हणून स्वतःला आपण का बघू शकत नाही हे खरंच समजत नाही. हे असले प्रकार समोर आले की आपल्या तथाकथित "प्रगतीची" लाज वाटायला लागते! :( छे, माणसाइतका क्रूर,कृतघ्न आणि अक्कलशून्य प्राणी दुसरा नसेल!

बरं झालं चतुरंगनी हा लेख पुन्हा वर काढला. सगळे लेख वाचून काढले. 'वाया' गेलेल्या वर्षाचा इतका सुंदर उपयोग फारच कमी लोकांना करता येतो. सापांवर होणार्या अन्यायाबद्दल काय बोलावे? मनुष्याचं क्रौर्य, अप्पलपोटेपणा आणि मूर्खपणाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे.

प्रत्येक नाग पंचमीच्या १ आठवडा अगोदर हा लेख वर आला पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे , रचाक ने हळू हळू हे प्रकार कमी होत आहेत असं वाटत

अरे इतका सुंदर लेखमाला प्रकार आजवर मिस झाला ज्याचं दुःख वाटले!! पण आता ठीक आहे, पुढले भाग येणार आहेत काय?

हि कुठली संस्कृती जोपासतात? एव्ह्ढ्या निर्दय पातळीवर उतरुन नक्कि काय साधते? विदारक, अमानुष आहे हे पण तरीही हे चालुच आहे.. कायद्याच्या बडग्यापेक्षा अंधश्रद्धाचा बडागा जास्त आहे. खूप उद्वीग्न करणारं आहे सगळं. --मयुरा

हो, पण आता थोडे थोडे कमी होत आहेत हे प्रकार. सोशल मिडियामुळे थोडी थोडी मदत होते आहे. महाराष्ट्र मध्ये कात्रज सर्पोद्यान सारख्या संस्था खूप चांगल्या काम करत आहेत त्यामुळे गाव-गावात कार्यकर्ते तयार झाले आहेत.