मण्यारीचे विष हे माणसाच्या मेंदूच्या संदेशवहनात अडथळा आणते त्यामुळे मेंदुचे संदेश इकडून तिकडे जाणे बंद होते. यामुळे माणसाला मूर्च्छा(बेशुद्धी) येते. मेन्दुच्या तळाशी असणारी श्वसन आणि हृदय यांचे नियंत्रण करणारी केंद्रे असतात. त्यांचे काम यामुळे अनियमित होते आणि माणसाचे श्वसन केंद्र बंद पडते आणि त्यामुळे माणूस दगावतो. एखादे वेळेस असे होते कि श्वसनबरोबर हृदयाचे नियंत्रण करणारे केंद्र अनियमित काम केल्याने नाडीचे ठोके हळू आणि मंद होतात. यामुळे डॉक्टरने एखाद्या व्यक्तीला मृत घोषित केले असावे आणि यातून हि अफवा पसरली असावी. काळजीपूर्वक तपासले असता नाडी मंदपणे चालू असते हे कळून येते, अशा रुग्णाला विषाचा प्रभाव उतरेपर्यंत कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवले तर तो जगतो आणि पूर्ण बरा होऊ शकतो.
या उलट घोणस किंवा फुरशाचे विष तुमच्या शरीराचे मास विरघळवतात त्यामुळे माणूस जिवंत राहिला तरी त्याला पुढचे उपचार फार दिवस घ्यावे लागतात.
प्रतिक्रिया
मण्यारीचे विष हे माणसाच्या
+११११
मागल्यावेळी फक्त नागपंचमी चा
काही फोटू दिसले नाहीत. तक्रार
काही फोटू दिसले नाहीत. तक्रार नाही उलट बरे वाटले.:)माहितीपूर्ण लेखमाला
उत्तम माहीती मिळाली.. पुभाप्र
Pagination