माझा उद्देश पुस्तकाचा ओझरता परिचय करून देणे एवढाच होता. या लेखामुळे तुम्हाला मूळ पुस्तक वाचावेसे वाटले तर जरूर वाचा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे १/२ उदाहरणे इथे देते.
१) नानींना म्हटले, "बघा गोरखला!" पण ते तेवढ्यापुरतंच. 'बौद्ध' आळीतल्या नानींकडे निंबाळकरांचा गोरख थोडाच जाणार होता? माझ्या ओसरीवर, नानींच्या हातचा च्या पिताना, नाहीतर आईने भाकरी दिली नाही म्हणून उपाशी असताना नानींच्या डब्यातली भाकरी खाताना, रात्री माझ्या घरी काही कारणाने दोघांना रहावे लागले तेव्हा जाजमावर त्यांच्या शेजारी गाढ झोपताना, त्याच्या मनात नानींचा 'बौद्धपणा' आल्याचा मला कधी संशयही आला नाही. पण सारे विंचुर्णी गाव ओलांडून राजरोस काही तो त्यांना किंवा त्या त्याला विचारायला जाणार नव्हत्या हे सरळ सत्य होते. दिसत होता इतका बदलसुद्धा समाधान वाटावे इतका मोठा होता दोघांकडून.
२) नवर्यावर माया करायला आवश्यक असणार्या त्याच्या गुणात, तो मारहाण, शिवीगाळ करत नाही, हा एक महत्त्वाचा असतो हे तेव्हाच समजले.
३) माणसामाणसांतला मामला अखेर निव्वळ देण्याघेण्याचाच असतो का? माझे 'देणे' पुरे पडेना झाले की कुणीही माझ्याकडे पाठ फिरवायची की काय? तोंडदेखले चार गोड शब्द बोलणे इतकेच का कुणाशीही नाते जमू शकते या जगात?
‘ विंचुर्णी’ संग्रहात नाहीये; पण विकत घेईन की नाही आता; माहिती नाही.
गौरीचं लेखन सुरुवातीला खूप आवडलं – नंतर मात्र त्यातली साचेबद्धता जाणवून कंटाळा आला.
पण ‘विंचुर्णी’ कदाचित वेगळं दिसतंय तुमच्या परिचयावरुन - सहज मिळालं तर वाचेन.
(१)आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. (२)संघटना या निराशाजनक असतात. (३) माणसांना प्रेम लावले की ती आपली होतात असे नव्हे. दृष्टीआड झाली की ती मनातून हळूच निखळून जातात. हा धडा अवघड असला तरी याचा अर्थ असा नाही की माणसे जोडूच नयेत! ज्यांच्या आधारे आयुष्य काढले ती तत्त्वे फोल आणि अडगळीची म्हटल्यावर माणसाने काय करावे हा आणि असेच प्रश्न. कोणाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि तरी ठोकर लागलीच तर ते सगळेच मागे ठेवून पुढे चालू लागायचे हा सगळ्यात मोलाचा धडा!
गेल्या चाळीसेक वर्षात विविध अनुभवातून हेच शिकलो ...
ते म्हणजे (१)आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. (२)संघटना या निराशाजनक असतात. (३) माणसांना प्रेम लावले की ती आपली होतात असे नव्हे. दृष्टीआड झाली की ती मनातून हळूच निखळून जातात. हा धडा अवघड असला तरी याचा अर्थ असा नाही की माणसे जोडूच नयेत! ज्यांच्या आधारे आयुष्य काढले ती तत्त्वे फोल आणि अडगळीची म्हटल्यावर माणसाने काय करावे हा आणि असेच प्रश्न. कोणाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि तरी ठोकर लागलीच तर ते सगळेच मागे ठेवून पुढे चालू लागायचे हा सगळ्यात मोलाचा धडा!
गौरी देशपांडे आणि मेघना पेठे या माझया आवडत्या लेखिका. खूप सो कॉल्ड प्रसिद्ध पुरूष लेखकांपेक्षा सकस आणि भिडणार लेखन करणार्या लेखिका. धन्यवाद पैसा ताई हा धागा सुरू केल्याबद्दल
गौरीचे बंधू नंदू कर्वे हे जर्मनीहून परत आल्यानंतर फलटण येथेच
निमबाळकर कृषि संशोधन केंद्रात बरीच वर्षे कार्यरत होते.>>>>>>>> चूक ,कर्वे हे जर्मनीहून परत आल्यावर त्यांनी फलटण इथे appropriate rural technology institute अर्थात ' आरती' ची स्थापणा केली.आज ती संस्था चालू आहे की नाही माहीत नाही.त्यांची मुलगी प्रियदर्शनी कर्वे ही पुण्यात समुचित नावाची संस्था चालवते.
फलटणला निंबाळकर कृषी संशोधन केंद्र नसून निंबकर कृषी संशोधन केंद्र आहे.इरावती कर्वे यांचे जावई बनबिहारी निंबकर यांनी ते सुरु केले.
आवडत्या लेखिकेचं एक आवडतं पुस्तक. मला जास्त आवडला सुरवातीचा भाग. गौरी तिथल्या जीवनात कशी रमत जाते ,विंचवासकट इतर प्राण्यांसोबत कशी राहू लागते ते. विंचुर्णी बदलत नाही हे उमजून ही तिचं विंचुर्णी चं प्रेम काही कमी झालं नाही . मिळालेल्या अनुभवांचे पण ते किती सुंदर आणि संयत विश्लेषण करते . आता पुन्हा वाचावसं वाटतय पुस्तक छान परिक्षण वाचून .
पुस्तक परिचय उत्तम!साॕरी,
पण गौरिचे लेखन ना कधी मनाला भिडले, ना कधी विचारांना सकसपणा देऊन गेले!पर्सनल डायर्यांतले लेखन पुस्तकरुपात!
पण त्यांचीच कन्या उर्मिला देशपांडे हिने लिहीलेले The Pack of Lies वाचण्यासारखे आहे.
उत्तम पुस्तकपरिचय. पु. ल. आणी सुनीताबाई देशपांडे यांनी खुप वर्षांपुर्वी एका खेडेगावामध्ये ध्येयवादाने प्रेरित होउन एक शाळा उभारली होती . पण त्यांनाही काही कटु अनुभव आल्यामुळे ती शाळा सोडावी लागली . "आहे मनोहर तरी" या पुस्तकांत या आठवणींचा उल्लेख आहे .
परिचय आवडला. सगळ्यांना तिचे विचार पटतीलच असे नाही. पण गौरी एक मनस्वी जीवन जगली. एकच कौटुंबीक घटनेबद्दल तिचे आणि तिच्या मुलीचे विरुद्ध विचार/बाजू वाचायला मला आवडले. "निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग" हे गौरीचे आणि पॅक ऑफ लाईज हे उर्मिला देशपांडेचे पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे .
प्रतिक्रिया
नक्की वाचीन...
चांगलं लिहिलंस. माझंही अत्यंत
छान, पण पोस्ट आवरती घेतली गेली आहे
धन्यवाद!
माझा उद्देश पुस्तकाचा ओझरता परिचय करून देणे एवढाच होता.
‘ विंचुर्णी’ संग्रहात नाहीये;
विंचूर्णी नक्कीच वेगळं आहे
नंतर मात्र त्यातली साचेबद्धता
पुस्तकाबद्दल
छोटासाच पण उत्तम परिचय.
उत्तम पुस्तकपरिचय.
+ १
परिचय आवडला...
ते म्हणजे (१)आपल्या हातून
गौरी देशपांडे आणि मेघना पेठे
विंचूर्णी ?
सातारा जिल्हा
धोंडो केशव कर्वे यांची नात
आणखी माहिती
गौरीचे बंधू नंदू कर्वे हे
ARTI चालू आहे.
विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे
धन्स.
आवडत्या लेखिकेचं एक आवडतं
परीक्षण आवडले!
छान
पुस्तक परिचय उत्तम!साॕरी,
गौरी देशपांडे म्हटलं की पटकन
पण त्यांचीच कन्या उर्मिला
उत्तम पुस्तकपरिचय.
अतिशय सुरेख पुस्तक परिचय.
उत्तम पुस्तकपरिचय.
परिचय आवडला. सगळ्यांना तिचे
'आहे हे असं आहे' कुणी कुणी
वाचलंय.
हो वाचलय... अप्रतीम आहे.
पुस्तकपरिचय आवडला.
मस्त
वाचलय पुस्तक.छान परिचय.
वाचलय पुस्तक.छान परिचय.
पुस्तकाची पहिली काही पाने इथे