कलादालन

दख्खनची राणी आणि बोरघाट

Primary tabs

दरीवरचा पूल

अमृतांजन पॉईंटजवळ

बोगद्यातून बाहेर आल्यावर

जवळ जवळ संपूर्ण गाडी

कर्जत जवळ

बरेच दिवस झाले सदस्य होऊन पण लिहिता येत नसल्यामुळे काही विशेष भर नाही माझ्याकडून...हा पहिलाच प्रयत्न... म्हणून मग त्यातल्या त्यात हे फोटो... :)
नोकिया न-८० या मॉडेलमधून काढले आहेत... ३.२ मेगा पिक्सेल्स

छान आहेत फोटो.

बहुतेक विंदांची एक कविता आहे. "दख्खन राणीच्या बसून कुशीत, हजारो पिले ही चालली खुशीत". कोणाकडे आहे का ही कविता पूर्ण?

बिपिन कार्यकर्ते

अमोल केळकर

आणखी एक गाणं आहे,
'दख्खनची राणी तू नेशील का मला पेशवाई पुणे पहायचे मला ' बहुतेक आशा भोसले यांनी गायले आहे. - कुणा कडे आहे का ?

बाकी राणीचे फोटो मस्तच
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रमोद देव

बहुतेक विंदांची एक कविता आहे. "दख्खन राणीच्या बसून कुशीत, हजारो पिले ही चालली खुशीत
माझ्या आठवणीप्रमाणे ही कविता वसंत बापटांची आहे.

सुनील

बोगद्यात अंधार असल्यामुळे फोटो दिसेनासे झाले आहेत वाटते!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला

काय फोटो आहेत !!! ;-)

साइज अजुन थोडी मोठी असती तर सुस्पष्टता आली असती !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केवळ_विशेष

दिसतायत का आता... नसतील तर काय करू सांगा... पहिलाच प्रयत्न हाये...

दशानन

छान !

सुंदर फोटो !

दिसता आहेत.

नोकियाच कॅमेरा चांगलाच आहे की :)

भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !

पण आता बाय-बाय =))

सुनील

कुठल्याशा जुन्या मराठी चित्रपटातील एक कोंकणी ओळ असलेले गाणे आठवले....

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा, दिसता कसो, खंडाळ्याचो घाट!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती

तिसरा, पाचवा व सहावा हे फोटू आवडले.

रेवती

जाग्या झाल्या...
त्या फोटोंतल्यासारख्या वळणावर, गाडीच्या दरवाजात उभं राहून, वाफाळती कॉफी पिणं म्हणजे काय सुख असायचं !
कॉफीच्या आधी डेक्कन क्वीनस्पेशल कटलेट - टोस्ट किंवा ऑम्लेट - टोस्ट असा मस्त ब्रेकफास्ट झालेला असायचाच :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com