जे न देखे रवी...

संध्याखंत

Primary tabs

गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :)

"गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज

पिले बिलगती आईला
झाड आवरे पाने
क्षितिज लाजले किंचित
रेखीत रंगीत गाणे

सारे काही जिथल्या तिथे
मलाच नाही थारा
विश्व मानिते ज्याला मी
मग्न तो जगदाधारा"

रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत

मिसळ छानच जमली आहे.
अशीच झणझणीत कविता येऊ देत.

पिले बिलगती आईला
झाड आवरे पाने
क्षितिज लाजले किंचित
रेखीत रंगीत गाणे
या ओळी आवडल्या.

प्राजु

सारे काही जिथल्या तिथे
मलाच नाही थारा
विश्व मानिते ज्याला मी
मग्न तो जगदाधारा"

या ओळी एकदम छान जमल्या आहेत.

- प्राजु

विसोबा खेचर

अरे नंदन सायबा,

लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो? :)

असो..

गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज

या ओळी सुंदर...!

तात्या.

नंदन

:), तात्या माका अजून पण काय कळना नाय काव्याबिव्यातला. पण वाईच जरा हुक्की इली चार ओळी लिवूची, इतकी लोका वांगडा मस्त कविता-चारोळे करतंत ता बघून.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय

अर्थगर्भ. नंदन, तुमच्या कसदार लेखणीला इतका थोडा पाझर का, हीच माझी तक्रार.

आजानुकर्ण

अप्रतिम कविता. खूप आवडली.

रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत

काय ओळी आहेत!

(रसिक) आजानुकर्ण

बेसनलाडू

शेवटची दोन कडवी विशेष आवडली. कविता छान आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

प्रमोद देव

नंदनमधील काव्यगुण ह्या आधीही प्रकट झालेत. हे काव्यही सहजसुंदर झालेय.

नंदन

मंडळी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

नंदन,
कविता आवडली.......!!!

गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
आणि
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनं!!!

वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश

रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत

वा! कविता फार आवडली, त्यात गुंफलेली ही सुंदर चारोळी मस्तच :)

-ऋषिकेश

यशोधरा

किती सुरेख लिहितस!
कित्या नाय रे लिहिणस नेहेमी!

बॅटमॅन

आयला, हे कसं काय सुटलं नजरेतुन काय की. नंदनशेठ इथेही लैच उच्च लिहितात राव.

यशोधरा

रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत

तिमा

रात्र येई संस्थळी
मिपाकर करिती खंत
नंदन दिसे ना कुठे
रुपे जरी अनंत