जवळपास २४ तास झालेत पण अजून त्याचा विसर पडत नाही...
कित्येक वर्षांनी झालेली भेट...पुन्हा कधी होईल माहित नही...८२ वर्षांचे वय पण नं स्वरात नं वावरण्यात त्याचा मागमूस...
गेटवे ऑफ इंडियाचा परिसर ... आधीचा जमलेला भैरव आणि नंतर सुरु झालेला ललत....पाठीमागे २ तानपुरे आणि त्याच्याही पाठीमागून येणारी मंद सागराची गाज...
इतक्या वर्षांची तपश्चर्या प्रत्येक स्वरातून झिरपणारी...त्यातील श्रुतींचे वापर आम्हा पामरांच्या पार डोक्यावरून जाणारे...आपण हे सगळे ऐकतो आहोत अनुभवतो आहोत हि जाणीव लोपलेली ...
ललत संपला ...म्हणाव्या तश्या टाळ्या नाहीत...कारण श्रोते एकतर दिग्मूढ झालेले नाहीतर माझ्यासारखे डोळे पुसत...
अजून गाण्याचा आग्रह...आणि गाण्याइतक्याच गोड आवाजात...”ह्याच्या वर अजून काही रंगणार नही...ऐका माझं.. आता पुरे..” अशी आर्जवी विनंती...
त्याचं बरोबर “bhairavi is not for morning” अशी समोरच्या आगाऊ सूचनेला परखड फटकारा...
संपूर्ण २ तासात...कुठेही तबल्याचे दाण दाण ...ठाण ठाण नाही ...विनाकारण लांबलचक धीराकीत तीरकीत ची बरसात नाही ...चमत्कारिक तिहाया नाहीत.....श्रोत्यांच्या टाळ्या नाहीत आणि ती दाद खोट्या अदबीने स्वीकारण्याच्या अदा नाहीत....अहो...भरत कामतने एक साधा तुकडा लावला तर...’मारामारी नको रे “ अशी आर्जवी विनवणी... पण म्हणून वेळ आल्यावर लयकारीवरचे असाधारण प्रभुत्व सुद्धा अतिशय साधे पणाने गाण्याचे एक ‘अंग’ म्हणून आले... कुठेही काहीही ‘सिध्द’ करायचे नव्हते...
संजयासारखी ...हृष्यामि च मुहुर्मुहु अशी अवस्था....
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
नशीबवान आहात
वाहवा!
काय बोलणार....!
+१००
रागांची वेळ
हो ...
आम्ही संगीतनिरक्षर पण लेखन
+१
धन्यवाद!!
झकासच
एक अडचण
अपलोड करा प्लीज!
mediafire.com इथे अपलोड करा
हेच म्हणतो
.आज दिवसभरात
https://drive.google.com
धन्यवाद!
धन्यवाद
बरे झाले
मानलं यार, सहीच. आनंद वाटत
भैरवीची वेळ
आज हे आठवले
अरे बापरे