Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हे शाब्बास!! आत्ताच वेळ मिळाला तेव्हा शेवटचे उरलेले दोन्ही भाग अधाश्यासारखे वाचून काढले. एखाद्या गोष्टीचा विचार केला की त्यावर फार सखोल लेखन करता राव तुम्ही...सलाम त्या 'हटके' पियुषला आणि त्याला अगदीयोग्य शब्दात उभा करणार्‍या तुम्हालाही!

अंबरीश मिश्र हा माज़ा खूप आवड़ता लेखक. तुमच्यासारखेच घायाळ करनार लिहितो. तुलना करने योग्य नाही तरीहि मोह आवरला नाही. मज़ा आला. वा. फेस बूकावर यातलि काही वाक्य टाक़त आहे. तुमची परवानगी घेऊन.

हाय काय न् नाय काय! टाका चेपुवर. मित्रांनो, तुम्हाला लेख आवडले, सर्वांनी आवर्जुन सांगितले त्याबद्दल धन्यवाद! अंबरीश मिश्र मलाही खूप आवडतात. गांधीजींवर त्यांनी लिहिलेले एक पुस्तक 'अज्ञात गांधी' आणि दुसरे 'शुभ्र काही जीवघेणे' संग्रही आहेत. त्यांचे मौज, सा. सकाळच्या दिवाळी अंकातले लेखही उत्तम असतात. त्यांच्याइतके प्रगल्भ मला लिहिता येईल त्या दिवशी मीठ-मोहर्‍यांनी स्वतःची दृष्ट काढेन! पण तुम्ही केलेले कौतुक पाहुन छान वाटले!

द्या टाळी. मी ही हेच म्हणणार होतो. अंबरीश मिश्रांची स्निग्ध शैलीच आठवली ही लेखमाला वाचताना. शिवोऽहम यांचे एका उत्कृष्ट मालिकेबद्दल आभार. (मागच्या एका लेखावर केलेली विनंती नि धमकी रिपीट टेलेकास्ट करतो. :) )

अतिशय सुरेख लेखमाला.. फारच छान ओळख करुन दिलीत तुम्ही पियुष मिश्राची.. __/\__ या लेखातील समाप्त शब्द वाचून "अर्र.." असं वाटलं... :( पुलेशु.

नेह्मीप्रमाणेच वाचनीय!! अजून वेगळ्या वाटेवरच्या कलाकारांची ओळख करून द्या..मज़ा आएगा!! पु ले प्र...

छानच . सुंदर लेखमाला . अजुनी काही अश्या वेगळ्या कलाकारांबद्दल (इरफान खान , मनोज वाजपेयी ) आपण माहिती लिहाल या अपेक्षेत .

वेगळ्या वाटेवरचा लेख. असेच आणखी कलाकारांबद्दल जरूर लिहा!

फारच सुंदर लेखमाला..तुम्हाला आता वेगवेगळ्या फर्माईशी तर आलेल्या आहेतच. त्या पुर्‍या करायचा विचार असेल तर लिस्टमध्ये 'कर दे मुझे, मुझसे ही रिहा' लिहिणार्‍या 'इर्शाद कामील' चे पण नाव अ‍ॅड करावे ही विनंती..

अवलिया कलाकाराबद्दल लिहीणार्‍या अवलिया लेखकाचंही आज दर्शन घडलं. बरेच दिवस मिपावर पियुष मिश्रा चा बोर्ड बघत होतो पण का कुणास ठाऊक वाचलंच नाही. आज पूर्ण मालिका वाचली. म्हणजे सुरु केली वाचायला नि कधी वाचून संपली समजलंच नाही. भन्नाट लिहीताय. पियुष मिश्राना वासेपुर मध्ये बघितलंय. अभिनयाबरोबरच वरचा ओठ थोडासा वेगळाच्च आहे. बाकी फुल्ल कलंदर वाटताय तुम्ही. दाढी वाढलेला, केस सुद्धा भरपूर, डोळ्यावर चष्मा जाड फ्रेमचा, कुर्ता, शबनम, मळकट जीन्स नि जुन्या सॅन्डल्स वाला एखादा नाटकवाला भेटावा नि बोलायला सुरुवात करावी, बोलता बोलता तिथल्या तिथं साभिनय स्क्रीप्ट वाचून नाही करुन दाखवणारा, डोळ्यात वेगळीच चमक चष्म्या तून देखील दिसणारा एक नाटकवाला म्हणजे शिवोsहम ! (असं मला वाटतंय) हॅट्स ऑफ मालक. नवीन सेरिज सुरु करा लवकर.

ह्या कलाकाराचे नाव माहिती नव्हते ते आज कळले पण माझ्या मते ह्या कलाकारांचा दिल से ह्या सिनेमातून माझी ओळख झाली. एक सी बी आय ऑफिसर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणार्‍या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी झटतो. आणि रॉक स्टार मध्ये त्याचे काम अनेकांना आवडले

अशा मस्त कलाकारांबद्दल तुम्ही मस्त लिहीत आहाताच पण बाकीच्यांनी पण असे लेख लिहुन आमच्या सारख्या येर्‍यागबाळ्यांणा थोडं शाणं केलं बरच आहे की...

एखाद्या कलाकृतीची, कलाकाराची रसिकांना भेट होते ति काहि मिनीटे, वा तास, पण तेव्हढ्या वेळात फार काहि खाल्ल्या/पचवल्या जात नाहि. मग अशा लेखमालेतुन उलगडतात पांढर्‍या प्रकाशाच्या आतले इंद्रधनु. एका पियुष मागे त्याच्या प्रवासाचा मागोवा घेणारे शिवोSहम् आहेत म्हणुन आमच्यासारख्यांना चार गोष्टी समजुन घेता येतात. याला भाग्य लागतं महाराज.

छान ओळख . अलिकडेच आलेल्या "तमाशा" या चित्रपटामधला , गोंधळलेल्या रणबीर कपुरला "अपनी कहानी तु मेरी जुबानसे सुनता चाहता है ?" असे फटकारणारा त्याचा "कहानीवाले बाबा" चा रोल लक्षात राहणारा होता .