कलादालन

प्रहारच्या रीलॅक्स पुरवणीत माझे लेख.

Primary tabs

उद्या म्हणजे ३१ जानेवारी २००९ पासून दर शनिवारी 'प्रहार' या दैनिकाच्या रीलॅक्स पुरवणीमधे माझे लेख येणार आहेत. कॉश्च्युम डिझायनिंग हा माझा विषय. याच्या अनुषंगाने लेख आहेत. जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या. दुवा मिळाला की इथेच प्रसिद्ध करीन. १. पहिला लेख 'सोंग सजवायची कला' ३१ जानेवारी २००९ http://epaper.prahaar.in/epaperimages/3112009/3112009-md-you-4/23271713.JPG २. दुसरा लेख 'अमेरीकेतील शिक्षण' ७ फेब्रुवारी २००९ http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=3892&boxid=114727828 ३. तिसरा लेख 'डिझायनिंगची पूर्वतयारी' १४ फेब्रुवारी २००९ http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=4178&boxid=174527671 ४. चौथा लेख 'तिकडची नाटकं' २१ फेब्रुवारी २००९ http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=4472&boxid=16423937
अनंत छंदी

आज्जुका तै
आपले अभिनंदन! आता आपण कॉलमिस्ट का काय म्हणतात त्या झालात.

टारझन

जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या.

हे वाक्य कुठे तरी वारांवार वाचल्यासारखं वाटतंय ..

अवांतर : पेपरात लेख येण्याबद्दल अभिणंदण
- पु.दा.

दशानन

स्वारी !
प्रहार कुठे प्रसिध्द होतो... हेच माहीत नाही आहे... ह्यांचे ऑनलाइन आहे का पुरवणी !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

दशानन

ठीक !
जरुर कळवा, आम्हाला वाचायला आनंद होईल व हो मगाशी राहीलेच तुमचे अभिनंदन :)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

लिखाळ

अभिनंदन !
दुवे द्या नक्की .. वाचायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.

अज्जुका अक्का आपले हार्दिक हाबिणंदण !
आपल्या यशाची कमान अशीच चढती राहो !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

नाहीतर ते ही चोराल.

त्यांचा नवा प्रयत्न काय असणार बरं??
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखाराम_गटणे™

(चड्डी घट्ट पकडून बसलेला)
आंतरजालिय चड्डी ???

श्रावण मोडक

आवर्जून लिंक द्या. वाचायला आवडेल. मुख्य म्हणजे तुमचा विषय कॉश्च्यूम डिझायनिंग हा असल्याने! फॅशनची पाने आली की मी ती सरळ उलटवून पुढे जात असतो. एरवी मी रिलॅक्स वगैरे नावाच्या पुरवणीकडे वळलोही नसतो. या लेखमालेमुळे तेवढे तरी वाचण्याजोगे असेल आणि म्हणून इथे तसे होणार नाही. माझी माहिती बरोबर असेल तर असा विषय वृत्तपत्रात प्रथमच सविस्तर हाताळला जात असावा.
लेखमालेचे स्वरूप कसे आहे? अनुभवात्मक की केवळ अकॅडेमिक - पाठ्यक्रमासारखे? त्याविषयी अधिक लिहा येथे.
कॉश्च्यूम डिझायनिंग हा खास विषय आहे. माझ्या मनात त्याविषयी अनेक प्रश्न आहेत. लेख वाचल्यानंतर त्यांची काही उत्तरे मिळतील अशी आशा आहे.

नीधप

>>फॅशनची पाने आली की मी ती सरळ उलटवून पुढे जात असतो.<<
मी कॉश्च्यूम डिझायनिंग वर लिहिणारे. फॅशन नव्हे!!
>>माझी माहिती बरोबर असेल तर असा विषय वृत्तपत्रात प्रथमच सविस्तर हाताळला जात असावा.<<
याबद्दल खरंच कल्पना नाही. पण मी तरी अजून वाचला नाहीये. एरवी बर्‍याचश्या पुरवण्या नटनट्या आणि मॉडेल्स यांच्यातच रमलेल्या असतात.
>>लेखमालेचे स्वरूप कसे आहे? अनुभवात्मक की केवळ अकॅडेमिक - पाठ्यक्रमासारखे?<<
दोन्ही थोडं थोडं. अनुभवातून किंवा केलेल्या कामांच्या वर्णनातून मुद्दा समजावून सांगितल्यासारखं असं म्हणता येईल.
>>लेख वाचल्यानंतर त्यांची काही उत्तरे मिळतील अशी आशा आहे.<<
मला पण.. :)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

श्रावण मोडक

तुमचा विषय ठाऊक आहेच. म्हणून तर या लेखमालेविषयी मला इतकी उत्सुकता आहे.
एरवी मी फॅशनची पाने उलटवून पुढे जात असतो, हा माझ्या मूळ वाक्याचा अर्थ. तो एरवी शब्द राहिला... आणि ती फॅशन टोचली. सॉर्री (इथे योग्य ती स्मायली आहे असे मानावे).
लेखमालेचे स्वरूप आवडले. मला ती वाचायची आहे. लिंक हवीच. नसेल तर ते लेख येथेही आणता येतील का? किंवा तुमच्या ब्लॉगवर? कारण ती पुरवणी मला उपलब्ध होत नाही.

साती

प्रहार म्हणजे नारायण राणेंचा पेपर की काय?:)
अज्जुका अभिनंदन.
तुझ्यासाठी प्रहारही वाचू हो.
साती

श्रावण मोडक

ही लिंक -
अज्जुकाचा लेख, अर्थातच ३१ जानेवारीला पहा
ही लिंक इ-पेपरची आहे. तेथे ती पुरवणी, त्यातले लेखाचे पान वगैरे शोधावे लागेलच. उद्या कोणी ही लिंक अपडेट केली तर बऱ्याच जणांचे काम होईल.

श्रावण मोडक

आभार आणि साहेब? X(
साहेब हा शब्द माझ्यालेखी शिवी आहे आणि आभाराची गरज नाही...

नी... हार्दिक अभिनंदन....
तुझ्या पेशल विषयातले लेख वाचायला मजा येईल.. वाट बघतोय... :)

नी... चे नक्कीच अभिनंदन!

पण "प्रहार" ची "रीलॅक्स" पुरवणी?:)
हा ऑक्सिमोरॉन नाही का?
आता उद्या "सामना"ची "मांडवली" पुरवणी निघेल!!!
:)

ते तर झालंच गं! म्हणून तर तुझं पहिल्या वाक्यातच अभिनंदन केलंय.
माझी टिप्पणी प्रहारकर्त्यांवर आहे!:)
बाळासाहेबांनी मार्मिक आणि सामना काढले, हे प्रहार काढतायत!
आमच्या (आणि त्यांच्याही!) कोकणीत एक म्हण आहे...
"वाघाच्या शेपटांक बांधलो कोल्हो, आणि आपटांन आपटांन मेलो!!!"
:)

अनंत छंदी

पिडांनु खयचा वाघ आणि खयचा कोल्हो ता शांगशाल तर बरा होतला.
=))

तां जर तुमकां सांगूक लागांत, तर तुम्ही खरे मराठीच नाय!!!!!

बाकी,
नी....
तुजो लेख आवाडलो....
एका वेगळ्या विषयावरचो आसां....
जनरली या क्षेत्रांत मराठीत जास्त लिखाण होणां नाय....
तू लिहित रंव....
अभिनंदन!

घाटावरचे भट

नीतै, लेख वाचला. अत्यंत माहितीपूर्ण आहे. विशेषत: बजेट नसूनही उत्तम वेशभूषा करता येते हे जे तुम्ही तुमच्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे ते तर खासच आहे. साध्या साध्या गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास वेशभूषा परिणामकारक होऊ शकते हा कन्सेप्ट जामच पटला (मायला, कॉलेजात नाटकं करताना बजेटच्या नावाने बोंबा मारल्या, तुमचा लेख जरा आधी वाचायला मिळाला असता तर....? कदाचित काही आयड्याज मिळाल्या असत्या. असो). ही लेखमाला सुरू केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.

सुनील

सहमत.

अवांतर - "प्रहार"चा देवनागरी फॉन्ट वाचायला किंचित त्रासदायक आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कुंदा

लेख आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक :)

- कुंदा

विसोबा खेचर

जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या.

असेच छान छान इतरत्र लिहीत रहा आणि त्याचे दुवे इथे देत रहा! मिपाकर ते वाचून अवश्य प्रतिसाद देतील!

तात्या.

नीधप

अरे वा मी लिंक टाकायला आले इथे आणि तोवर लोकांनी लेख वाचला पण आहे.
तुमचे सगळ्यांचे आभार.

मी पण पुण्यात असल्याने नेटवरच वाचलाय.
तरी ही लिंक देऊन ठेवते.
http://epaper.prahaar.in/epapermain.aspx

या लिंकने तुम्ही रीलॅक्स पुरवणीच्या पहिल्या पानावर जाल. चौथ्या पानावर माझा लेख आहे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दशानन

मस्त आहे लेख !

आवडला !

छान लिहता तुम्ही !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

श्रावण मोडक

या लेखाचे पानच उघडत नाही. उघडते ते केवळ खालच्या पंधरा-वीस ओळींच्या भागांचे. कोठेही स्क्रोल नाही. काय अडचण आहे ते कळत नाही.
अज्जुका, सरळ हा लेख येथे किंवा ब्लॉगवर टाकून सुलभतेने वाचता येईल असे काही करा. तसा ही पुरवणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेच, पण त्यात यश येईलसे दिसत नाही.

नीधप

तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम येतोय असं दिसतं.
तुम्हाला चौथे पान पूर्ण स्वरूपात दिसतेय का? तसे असेल तर त्या लेखावर क्लिक करायचं की नवीन पान उघडतं ज्यात केवळ माझा लेखच आहे.
मला इमेल पत्ता कळवा तुमचा. इमेलच करते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

शक्तिमान

मला वाटतं की आपण हा लेख मॉझिला फायरफॉक्स मध्ये उघडला असावा.
इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये उघडून पहावा.

श्रावण मोडक

धन्यवाद. भटांनी दिलेल्या लिंकवर मोझिलातच वाचला लेख. पुढच्या शनिवारी आयई मध्ये पाहीन.

प्रमोद देव

नीरजा,लेख अतिशय मस्त आणि वास्तववादी झालाय.
माझेही असे निरीक्षण आहे की बहुसंख्य चित्रपटात कपड्यांकडे...वेशभूषेकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाहीत. चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे...अगदी खेड्यातल्या दृष्यात श्रीमंत असो अथवा गरीब-दरिद्री , ह्या लोकांच्या अंगावर एखाद्या धुण्याच्या पावडरीच्या जाहिरातीत दाखवतात असे पांढरे धुप्प आणि कोरे करकरीत कपडे असतात. कैदेतल्या कैद्यांचे ,इस्पितळातल्या रोग्यांचे कपडेही अगदी नवे कोरे आणि पांढरे धुप्प असतात.
ह्या पार्श्वभूमीवर तुझे विचार अतिशय वास्तववादी आहेत आणि माझी खात्री आहे की लवकरच तू तुझ्या क्षेत्रात मोठे नाव कमावशील आणि इतरांना आदर्शवत होशील. तथास्तु!

दशानन

सहामत.

ह्याला म्हणतात प्रतिसाद !

असं खुप काही डोक्यात येत होतं तुमचा लेख वाचताना पण योग्य शब्द मिळत नव्हते... ! देवांनी ती कमी पुर्ण केली :)

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

नीधप

>>अगदी खेड्यातल्या दृष्यात श्रीमंत असो अथवा गरीब-दरिद्री , ह्या लोकांच्या अंगावर एखाद्या धुण्याच्या पावडरीच्या जाहिरातीत दाखवतात असे पांढरे धुप्प आणि कोरे करकरीत कपडे असतात. कैदेतल्या कैद्यांचे ,इस्पितळातल्या रोग्यांचे कपडेही अगदी नवे कोरे आणि पांढरे धुप्प असतात.<<
करेक्ट काका.
दुष्काळी भागातल्या, युद्धातल्या, कैदेतल्या लोकांचे कपडे पांढरे स्वच्छ. आत्ताच धुतल्यासारखे. (अनेक सिनेमे.. नेताजी आणि वीर सावरकर या सिनेमांसकट)
झोपेतून नुकतेच उठलेल्या बाईचा चेहरा चोख मेकप केलेला आणि केसाची बट न बटही जागच्या जागी. (सगळ्या मालिका)
बाई कोठेवाली असो वा खानदानी दागिने आणि कपड्यांच्या पद्धतीत, नटण्याच्या पद्धतीत कणभर फरक नाही (भन्साली चा देवदास)
१९१२ च्या सुमाराच्या दृश्यात, सिंथेटिक कापडातच मिळू शकेल अश्या पिवळ्या रंगाचा सूट घातलेला क्रांतिकारी (वीर सावरकर सिनेमा) (सिंथेटिक कापड म्हणजे नायलॉन या दशकात अस्तित्वात नव्हते! शोधच लागला नव्हता)
मोगल काळात ओढणीला लावलेल्या सेफ्टिपिना ( उदाहरण सांगायची जरूर आहे? बर आठवत नसेल तर घ्या 'जोधा अकबर'..)

असे अनेक महाघोळ सहज बघायला मिळतात आपल्याकडे.
आणि माझ्या नजरेला ते जास्त मोठ्ठे दिसतात.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आपला अभिजित

माझेही असे निरीक्षण आहे की बहुसंख्य चित्रपटात कपड्यांकडे...वेशभूषेकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाहीत.

हे बरीक खरे हो!
मल्लिका शेरावत, कंगना राणावत, सेलिना जेटली, नेहा धुपिया, बिपाशा बसू, यांचाकडेच पाहा ना! कपड्यांकडे कुठे लक्ष देताहेत त्या??

श्रावण मोडक

चांगला लेख.
लो बजेट हे फक्त खिशाचं असतं, बुद्धीचं असून उपयोग नाही.
अगदी साजेसा समारोप.
सुरेख.

विसुनाना

सहमत.
नीरजा यांचे अभिनंदन.
सदरातील पुढील भागांच्या लिंकही मिळत राहोत. वाचायला आवडेल.

नी,

लेख आज वाचायला मिळाला. छानच आहे. या मालिके मधे अजून बरंच काही वाचायला मिळो हीच इच्छा. विषय नविन आहे. वाचायला मजा आली.

बिपिन कार्यकर्ते

सहज

भटोबांनी दुवा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

भानु अथैय्या ह्या ऑस्कर मिळवणार्‍या [बहुदा पहिल्या] भारतीय म्हणुन माहीती होती, गांधी सिनेमासाठी त्यांना वेशभुषेचेच मिळाले ना?
पुढील भागाची वाट पहात आहे.

नीधप

हो बरोबर. भानू अथैया या एकमेव ऑस्कर विजेत्या भारतातील.
सत्यजित राय यांना मिळाले होते ते लाइफटाइम ऍचिव्हमेंटचे होते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

जरा उशिरा वाचलाय आपला लेख अज्जुकाताई.

पण मनापासून आवडला. या लेखमालेतील सर्व लेख असेच छान उतरावेत आपल्या लेखणीतून..
याच शुभेच्छा.

विसोबा खेचर

प्रहारमध्ये आलेले प्रतिसादही वाचायला आवडतील!

तात्या.

रामदास

आवडला.पुढचे लेख नक्की वाचेन. अभिनंदन.

अवलिया

छान लेख. आणि प्रतिसाद.

मिपावरती कधी लेख टाकताय याची वाट पहातो.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

विसोबा खेचर

मिपावरती कधी लेख टाकताय याची वाट पहातो.

ते लेख त्यांनी प्रतिथयश वर्तमानपत्रातच टाकावे हे उत्तम! त्याचे दुवे मात्र मिपावर दिले जातीलच! ;)

तात्या.

अवलिया

आणि मिपाकर आहेतच तिथले लेख वाचुन, इथे प्रतिसाद द्यायला... :)

काल शेजारची मुलगी आली होती "काका! ह्या पेपरातला शिंप्याचा लेख वाचुन दाखवा ना!"
गहिवरुन आले मला....पाहिले तर शिंपी पक्षाची काही माहिती होती.
छान सांगितले होते बाकी...

तात्या, एक नवीन सदर चालु कर...
'वाचनमात्र मिपाकरांची वर्तमानपत्रातील कलमबहादुरी'. कसे?

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

रेवती

लेख वाचला. आवडला व माहीती मिळाली.
सर्वसामान्य वाचकांना (माझ्यासारख्या) कॉश्चूम डिझाईन व फॅशन डिझाईनमधला फरक माहित असेलच असे नाही.
पुढच्या लेखांमधून अजून माहिती मिळेल अशी आशा.
धन्यवाद!

रेवती

सुंदर लेख.
वेशभूषा हा विषय तसा बराच गहन. त्यावर विस्तृत विचार वाचायला नक्कीच आवडतील. पहिला लेख उत्सुकता वाढविणारा आहे. पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत आहे.
दरवेळी लिंक देणार का? ह्या वेळीही शोधाशोध करायला त्रास पडला. घाटावरच्या भटांनी दिलेली लिंक उपयोगी पडली.
धन्यवाद.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

नीधप

लिंक ला त्रास झाला हे मान्य. मला पण अजून घाटावरच्या भटांनी ही इमेज लिंक कश्यापद्धतीने मिळवली ते जमले नाहीये. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत आशा करूया की मला ते सापडेल किंवा परत एकदा भटच मदतीला येतील.
त्यांना आधीपासूनच धन्यवाद देऊन ठेवते.
:)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

वेशभूषाकार, स्तंभलेखिका, धोरणी, राजकारणी अशा काय काय म्हणून प्रतिमा आहेत तुमच्या. अभिनंदन.

नीधप

सहावा लेख ”मी कॊश्च्युम डिझायनरच आहे"
http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=5043&boxid=224356656
किंवा
http://epaper.prahaar.in/epaperimages/732009/732009-md-you-4/224356656…

इथे वाचून कदाचित मला शिंपी म्हणणार्‍यांच्या डोक्यात थोडा उजेडही पडेल.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home