Skip to main content

बुंदी रायते

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/02/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटि दहि १ वाटि खारि बुंदि १ छोटा कांदा चिरुन २ चमचे चिरलेली कोथिंबिर १ चमचा चिरलेले आले २ चमचे साखर पाव चमचा काळे मिठ चवि नुसार साधे मिठ पाव चमचा लाल तिखट कृती : प्रथम दह्यात थोडे पाणि टाकुन जरा घट्ट्च घुसळुन घ्यावे. मग त्यात काळे मिठ, साधे मिठ, साखर, लाल तिखट टाकुन हलवावे. नंतर राहिलेले सर्व जिन्नस टाकावे. जर बुंदि कडक आवडत असेल तर ति आयत्या वेळेवर टाकायचि. खुपच छान लागते. सजावटी साठी वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर पेरावी. हे रायते पराठा, पुलाव सोबत अधिक छान लागते.

वाचने 6393
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

:) :) छान आहे गं! सोप्पी आणि सुन्दर पा कृ. फोटो... पण मस्त!!!! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अगं सुगरणे, मी बुंदी आधी थोड्याश्शा कोमट पाण्यात टाकते व ५ मिनिटांनी त्यातच दही व इतर साहित्य घालते. आयत्यावेळी पानाची डावी बाजू सजवायला बुंदी रायते मस्तच. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

जागु अंग, त्यात तिखटाच्याऐवजी चाट मसाला घालून बघ. चटपटीत.

अश्विनी अग बुंदी मी आयत्या वेळिच टाकते म्हणजे ती कुरकुरीत राहते जराशी खाताना. कोमट पाण्यात भिजवल्यावर ती एकदम नरम पडत असेल. पण शेवटी प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. कुणाला कुरकुरीत आवडत असेल त्यांनी आयत्या वेळेवर घालावी आणि नरम असेल त्यांनी कोमट पाण्यात भिजवुन घ्यावी. चटपटीत तुमचेही बरोबर आहे. चाट मसाला घालुन पण स्वाद चांगला येतो. कधी कधी मी ही घालते. पण मिरची पुड चा स्वाद ही ह्या रायत्या मध्ये चांगला लागतो. अर्थात ती मिरची पुड चांगल्या प्रतिची असायला हवी.

In reply to by जागु

मी थोडी बुंदी आयत्या वेळिच टाकते. बाकी ताकात भिजवून घेते...आले घालायची आयडीया आवडली! चकली http://chakali.blogspot.com

In reply to by ब्रिटिश टिंग्या

दाही दिशांनी बुंदी च्या गोळ्यांचा मारा झाला.... बरबाद झालो.... ठार मेलो .. जबरा >:) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

दाही दिशांनी बुंदी च्या गोळ्यांचा मारा झाला .. .. त्याच बुंदीचा मारा आम्ही अंगाखांद्यावर झेलुन त्याचा रायता बनवला .. राजे बरबाद झाले .. आम्ही रायता खाउन तृप्त झालो. >:) >:) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

जे भुलोकी आहेत त्यांच्यासाठीच डिश आहे.. वर गेलेल्यांना नाही. बुंधी रायता मस्तच. :)

खरच खुप पटकन होणारी पाकृ. आहे. व्हेज बिर्याणी बरोबर मस्त लागते. :)

व्हेज बिर्याणी बरोबर मस्त लागते. अगं, न लागायला काय झालय? आता लवकरच (बहुतेक उद्या) व्हेज बिर्याणी व बुंदीचं रायतं करणं आलं की नाही?;) फोटूसुद्धा अस्सा टाकलाय ना..... थांब करतेच आता... रेवती

बुंदी थोडीशी लालसर ,मद्रासी बुंदी का दिसते आहे. ? पिवळसर सोनेरी बुंदी वापरली नव्हती का. ?

अय्या, मी असतील शितं तर जमतील भुतं अशी म्हण ऐकली होती. इथे तर असेल बुंदी रायतं तर जमतील मिपावरची भुतं अशी म्हण लागू झालिये. :D --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

;;) जागु अंग अहो जावो कशाला अग तुग केलेस तरी चालेल. आणि हे रायत नुसंत खाल्ले तरी छान लागते. चटपटीत