Skip to main content

बाळाचे नाव काय ठेवावे?

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 20977
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

'फ' वरून इथं लै डेंजर णावं आहेत .. कसं काय होणार देव जाणे आणि कौल काढण्याचा आयटम कळला णाही पामराला ... दोन ऑप्शन्स दिले आहेत ...म्हंजे २ पैकी १ णिश्चित आहे काय ? इण दॅट केस णो कमेंट्स - फैंटम

In reply to by टारझन

अग्दी बरोबर ! मुलगी असती तर फुलनदेवी ठेवता आल असत ना ? फ वरुन मुलाचे नाव ह्म्म ह्म्म ह्म्म्म :T बारस झाल का बालाच ?

In reply to by विनायक प्रभू

अरे काय फाळ ... सॉरी सॉरी, हे आपलं बाळ झोपलं की काय ? सुचवा , नवी नावे सुचवा ..!!! अखंड "फ" यज्ञात खंड नको फडायला ... फेव फाय फणतील ??? ---- फेवेंद्र - फोटा फॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

सहमत. कोणतेही नाव सुचवा पण ते फंसर्गजन्य असायला हवे !! फरिकथेतील फाजकुमार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

फाजीलपणा फंडू जमला आहे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

क्रु. करुन तुम्ही तुमची नावे सुचवा, वरचे ऑप्शन्स फक्त कौल चा फॉम भरण्यासाठी उदारणासाठी देण्यात आलेली आहेत

फोकलीचा नाव ठेवण्यापूर्वी या शब्दाचे कॉपीराईट होल्डर मे. तात्या अभ्यंकर यांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. थोडे सीरिअसः फ मु शिंदे यांचे जे नाव आहे ते ठेवू शकता. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मझ्या मित्राला मुलगा झाला, वा, छान...! अहो मग त्यालाच नाव ठेवू दे की! उगाच लोकांच्या डोक्याला त्रास का? जळ्ळं आम्ही आपली नांवं सुचवत बसायचो आणि तुमचा तो मित्र आम्हाला साधं बारश्यालादेखील बोलावणार नाही! :) असो, नवजात अर्भकाला आशीर्वाद. अर्भक बाकी जन्मल्या जन्मल्याच मिपावर फेमस झालं! :) तात्या. स्वगत: सालं पब्लिक मजा करणार, त्यांना मुलं होणार आणि नावं मात्र लोकांनी सुचवायची! छ्या...! :)

भटजींना असले अक्षर काढल्याबद्दल दक्षिणा देऊ नका. किंवा त्यांनाच नाव सुचवायला सांगा नाहितर नवीन अक्षर द्यायला सांगा. भेंड्या खेळताना नाही का आपण दुसरे अक्षर देत? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

भेंड्या खेळताना नाही का आपण दुसरे अक्षर देत? हा युक्तिवाद प्रचंड आवडला! :) तात्या.

In reply to by JayGanesh

हम्म! मान्य..! :) कधी कधी लिहिला जातो एखादा शब्द अधिक-उणे! एक तर सकाळी सकाळी उठल्यावर नावं आठवायची. त्यात पुन्हा 'फ' हे चमत्कारिक आणि नाव ठेवण्याकरता अत्यंत गैरसोयीचे अक्षर. च्यामारी माणूस वैतागून लिहितो एखादी ओळ. माफ करा...! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

काही नावे मला सुचलेली, फरहान, फाजल, फरदीन, फैजल, फिरदोस, फाहरुक, फना, (आजकाल काही प्रमाणात....... आप्ल्याकडीही "अरबी" नावे ठेवायचा "ट्रेन्ड" आला आहे.... म्हणुन वरील नावे सुचवली आहेत. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

फना चा अर्थ 'बरबाद/उध्वस्त/नेस्तनाबूत' होतो (annihilation) -- हे नाव खरच कुठले आई-वडील आपल्या मुलाचे ठेवतील का?

In reply to by JayGanesh

आणखी नऊ -साडेनऊ महिन्यांचा कालावधी मिळायला हवा होता !! थोडा विचार करायला तरी वेळ मिळाला असता , आता तुम्ही एकदम घोड्यावर आलात :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

फ वरुन लोकानी बरिच नावे सुचवली आहेत्....ते नाव पाळ्ण्यातले (त्यालाच नावरस नाव असेही म्हणतात) ठेवा.. आणी वापरायचे, हाक मारायचे नाव वेगळे... नाहितरी कितिहि चांगले नाव असले तरी त्याला, पिंट्या, चिंग्या , बंट्या असली टोपणनावे ठेवायची सवय आहेच...(बेबिच्या बेबीला दोन-तीन बेब्या झाल्या तरी तिचे नाव मरेपर्यन्त बेबी च रहते... ;)) असो. --------------- केदार जोशी

In reply to by मनिष

फणींद्र कसे वाटते? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

किंवा सत्यजित रेन्चा फेलुदा ! फणी ह्या शब्दाचा अर्थ फणा असलेला म्हणजे नाग असा होतो. फणीधर हे शंकरचे नाव आहे.

आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता. असो. हकरत नाही ... जर आंग्लभाषेवर यावच्चयावत बहिष्कार नसेल तर फिलीप, फ्रॅन्क, फ्रॅन्कलीन वगैरे नावे सुद्धा उत्तम आहेत ... ------ फोटा फॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

>>आम्ही आनंदाने "फ्रेडा पिंटो" हे नाव सुचवले असते व स्वखर्चाने बारश्याला येऊन "रिंग रिंग रिंगा" ह्या गाण्यावर डान्स करुन दाखवला असता. असो. हकरत नाही ... मला डोळ्या समोर डॉन्या नाचताना दिसतो आहे.. ;)

नाव 'फलाणा ' ठेवा!! नाहीतरी आपण बोलतोच की अमक्याने असं केलं , फलाण्याने हे केलं.. फलाण्याने ते केलं , त्याअर्थी 'अमका' व 'फलाणा ' ही नावेच आहेत हा आमचा वादा नव्हे दावा आहे !!!! तेव्हा नाव 'फलाणा'च ठेवा.('फ'चाच अट्टाहास असेल तर !) महत्वाचे : आत्याबाईना पडणारे प्रश्न तुम्हाला का पडताहेत बरं :-) ? तुमच्या मित्राचे अभिनंदन ! आणि तुमचेही !! टिप : फार मनाला लावून घेऊ नये. ही मस्करी समजा. सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by दशानन

आयला भारी मजेशीर धागा आहे, ह्या धाग्याच्या अनुषंगाने मी सर्व मिपाकरांना एक विनंती करतो की ... " कॄपया सर्वांनी आपली नावे बदलुन त्याची सुरवात "फ" ह्या अक्षराने होईल असे करणेचे करावे ... उदा : फोटा फॉन, फाजे , फमाल मुलगा, फानंदयात्री , फरिकथेतला फाजकुमार, फिपीन कार्यकर्ते वगैरे वगैरे ... " म्हणजे काय होईल की नावे सुचतील व निर्णय घेणे सोपे जाईल .. ------ फोटा फॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

एक प्रश्न आहे डान्राव, या 'फकारा'त माझं नाव "फस्त फदिती" करावं का "फस्त फजिती" करावं? (माझ्या जन्मापूर्वीच मातोश्रींनी एक मुलाचं, एक मुलीचं कागदोपत्री नाव शोधून ठेवलं होतं, त्यामुळे अक्षरं काढणार्‍या भटजीला फा*** मारता आलं. एवढं करून त्या नावाने कधी हाक मारलीच नाही, अदिती हे नावतर मोठ्या भावाच्या नावावरून आलं.) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आजपासुन किंवा आजपुरते आमचे नाव "फोटा फॉन" असे असल्याने तुम्ही "डॉन्रावांना" विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही कसे देणार ? ह्या दोन्ही सर्वस्वी भिन्न प्रवॄत्तीच्या व्यक्ती आहेत ... सबब, तो प्रश्न आम्हाला "गैरलागु" आहे ... ---- फोटा फॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

ठीक आहे, फॉन्राव! अच्छा, मग या फकारात माझं नाव काय होईल, फस्त फदिती, फस्त फजिती का फस्त अदिती?? (किती फसफसाट झाला आहे नाही आता?) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो. फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो. फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे एवाटाते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ? फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे .. आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा .. ------ फोटा फॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या फॉर्च्युनेटली मला आज फार फार फुक्कटचा व कसलीही फिकीर नसलेला असा वेळ असल्याने मी आपल्याला फारच मोठ्ठे उत्तर देतो. फस्त फदिती : येस्स, नियमाप्रमाणे हे फार योग्य आहे. पण अगदी "अबक" प्रमाणे बेचव वाटते हो. फस्त फजिती : हे अगदीच नियमाची काटेकोर अंमलबजावणे वाटते, तसे करायला हे काय "फनोगत" आहे काय ? फस्त अदिती : हे कसे मोकळेमोकळे वाटते, शिवाय नियम ही आहेच, अगदी "फिसळपाव" सारखे .. आता तुम्हीच फरवा ... सॉरी सॉरी ..ठरवा .. ------ फोटा फॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आपला निर्णय मान्य फॉनराव, शिवाय फस्त अदिती म्हटलं की एकतर फिसळपाव फस्त केल्याच्या फंदात पडल्यासारखं वाटतं किंवा फिस्कारणारं मांजर समोर येतं. तस्मात, आपण दिलेलं उत्तर आम्हाला फारच फनी वाटल्यामुळे आजचा दिवस आम्ही फस्त अदिती आहोत. =)) (फस्त) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by JayGanesh

>>>तात्या, फनीलचा अर्थ सांगा... फनील = फनी + नील. [समास ओळखा :-) ] फनी = मजेशीर , गमतीदार [ या धाग्याप्रमाणेच ] नील = निळा रंग (मराठीत) किंवा 'काहीच नाही ' [ इंग्रजीत ! ] सही /- आगरी बोली - आगरी बाना.

भाईकाकांचे एक वाक्य आहे. 'पुर्वीचे लोक नावे शोधण्यात वेळ घालवत नसत, दुसर्‍या बारश्याच्या तयारीला लागत' ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

फकीर फालतु फुलीश फंटुश फेकुचंद ह. घे.. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

In reply to by सखाराम_गटणे™

गटणे जी आपल्या णावात 'फ' टाकून पाहिला .. अंमळ मजा आली :) कृपया आपण हलके घ्यावे . - फकाराम फटणे

In reply to by टारझन

चालयचेच, ह्या नादाने आमची आठवण झाली, हे ही नसे थोडके. हल्ली तुम्ही मिपावर दिसत नाही, ----

In reply to by JayGanesh

''बाबा'' मि नाही, माझा मित्र झाला आहे !! आमच्यात एखाद्या मित्राला मुलगा अथवा मुलगी झाली की त्याची बायको आई झाली असे म्हणतात, आणी 'मग मित्र ?' असे कोणी विचारले की तो बाप झालाय का नाही ह्याची खात्री नाही असे सांगतात ;) ह.घ्या. मला सुचलेली काहि नावे :- फोटोफास्ट फकीरा फणस फुरफुर फक्तएकच फुलचंद१२०-३०० फंटुश फुटकळ फरिकथेतला फाजकुमार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by JayGanesh

>>>> तात्या, बाप 'मि' नाही , माझा मित्र झाला आहे. मित्राचा आनंद 'आपला' माना !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by JayGanesh

"आव्हान" नका देवू. आणि, अहो ही सुद्धा पाक्रुच आहे, रेसिपीसाठी मास्तरांना भेटावे.

In reply to by JayGanesh

बाकि सगळी ऊर्दु नाव आठवतात हो फ वरुन.. फिरोज, फरहान वगैरे.. बिचारे ते बाळ.. उगीच लोक हसतील असे काहि नाव ठेऊ नका.

फक्त उपचार म्हणून नाव ठेवा "फ" वरुन पण प्रचलित नाव वेगळेच द्या उगाच मुलाने मोठा झाल्यावर दोष नको द्यायला की काय नाव ठेवले म्हणून :) (ज्योतिषाने सुचविलेल्या अक्षराला न मानणारा ) सागर अवांतर : नाव काहीही ठेवले तरी प्राक्तन नाही बदलत :)

'फुटाणा' 'फुटकळ' 'फूत्कार' 'फुस्' 'फट्' 'फटाका' 'फाटा' (नको.. इथे लोकं सारखं 'फाट्यावर मारतो' असं लिहितात) 'फाजील' 'फावड्या' 'फिरंगी' 'फितुर' (हे पण नको) 'फुकट' 'फ़काटराव' 'फत्तेश' (कुठलेही/कुणाचेही काम फत्ते करणारा) 'फरसाण' (एक खमंग नाव...) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

फाल्गुन !! साधे आणी अर्थपूर्ण..मराठी कालमापनातील अखेरचा महीना.. ह्या नावाचा हिंदी चित्रपट सुद्धा आलेला... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

फुलबाजा फुलोरा फौजी फौजदार (जन्मानेच! मजा आहे)

मला पण काही सुचली पण 'फ' नावाने हाक मारायला घरच्यांचीच फेफे उडेल..... फुल फैझल फक्रुद्दीन फसल ;) फाटक्या फुसक्या फंगस (मराठीत 'बुरशी' ) फणींद्र फ "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"