पाककृती
उपासाची भजी
Primary tabs
साहित्य :
४/६ अळकुड्या ; शिंगाडा पीठ ; हिरव्या मिरचीचा ठेचा ; मीठ ; जीरा पावडर ; पाणी ; तळणाकरीता तूप.
कृती :
अळकुड्या सोलून त्याचे त्रिकोणी तुकडे करून घ्यावे.ते लगेच मीठाच्या पाण्यात ठेवावे नाही तर बुळबुळीत होतात.
शिंगाडयाच्या पीठात हिरव्या मिरचीचा ठेचा , चवीपुरते मीठ आणि जीरा पावडर घालून जरा पातळसरच भिजवावे.
तूप तापवून मंद आचेवर अळकुड्यांचे तुकडे पीठामधे बुडवून सोडावे.
चांगला लालसर रंग येईपर्यंत तळावे.गरम गरम खाण्यातच मजा आहे.
अळकुड्या शिजवून घेतल्या तरी चालतील पण मग त्याचे काप करून त्याला पीठ जरा जाड भिजवावे लागेल.
वा! ही पण भजी लै भारी दिसताहेत! :)
करून खायला पाहिजे!
उपासासाठी छान वाटतेय रेसिपी. पण अळकुड्या म्हणजे काय?
चांगली वाटतेय रेसिपी.
चकली
http://chakali.blogspot.com
उपासासाठी छान सोपी रेसीपी दिल्याबद्द्ल धन्यवाद्.
अळ्कुड्या म्हणजे आर्वी. अळूचे कंद.
भजी छान होत असावीत, यात वाद नाही पण अळू किंवा अळकुड्या उपासाला चालतात का???? त्या ऐवजी बटाट्याचे कापही छान लागतील नाही का? :W
अरे फोटू कुठाय बाबा?
तात्या.