कलादालन

कर्दे सूर्यास्त - माझी काही प्रकाशचित्रे

Primary tabs

Image removed. नाव आहे चाललेली Image removed. खेळकर संध्याकाळ Image removed. क्रिकेट Image removed. सागराच्या कुशीत अलगद विसावतांना Image removed. रंग माझा वेगळा! Image removed. मनोहारी Image removed. किनार्‍याशी एकरूप आणि एकजीव सालो कॅमेरा - निकोन डी ४०
अनिल हटेला

अत्युत्तम !!! :-)

अवांतरः-कुठला किनारा आहे कळेल काय ?:-?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सालोमालो

हा किनारा दापोलीतील कर्दे आहे. दापोलीपासून साधारण १३ कि. मी, पण अजून मुरूडसारखा commercialize न झालेला. प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार!

सालो

सहज

>अजून ..commercialize न झालेला

मोकळा किनारा पाहून खरच छान वाटले.

सोनम

फोटो तर छान आहे. पण कुठला किनारा आहे कळेल नाही ?

प्रमोद देव

छायाचित्रे सुंदरच आहेत.

पण हे काही कळले नाही की हीच छायाचित्रे 'अस्द' नावानेही का चढवलेत?

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सालोमालो

च्यायला अस्द नावानी पण सेव झालयं वाटतं. ~X( माफ करा. काल चित्र टाकायच्या प्रयत्नात r & d करतांना झालेल दिसतयं. आता तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया पण आल्यात. :) म्हणून काढून टाकणं जीवावर आलयं. नाव चेंज करतो. :? निदर्शनास आणून दिल्याबद्द्ल आणि प्रतिक्रिययेबद्दल आभार! :)

सालो

नानबा

अहो साहेब, जरा फोटो टाकले कसे ते तरी कळवा....

बेसनलाडू

अतिशय सुंदर चित्रे! फार आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

सुक्या

खुप छान फोटो. अप्रतिम !! दुसरा शब्द्च नाही . .

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

लवंगी

आत्ता समुद्रकिनारी बसुन सुर्यास्त पहावासा वाटतोय

चित्रा

ही मुरूड (जंजिरा नव्हे, हर्णे) येथील दोन गावे आहेत.

फोटो छान.

गणपा

अश्या अनेक संध्याकाळी गावला नजरेने टिपल्यात. आज हि संध्याकाळ कॅमेर्‍यात टिपुन आम्च्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ल आभार.

(गावच्या आठवणींत रमलेला) गणपा.

विसोबा खेचर

या चित्रांकरता निदान माझ्याकडे तरी कुठलेच शब्द नाहीत..!

तात्या.

सालोमालो,
सुरेख फोटो!!

कर्दे इथं राहण्याच्या/ इतर सोयींविषयी थोडं लिहिलं असतं तर बरं झालं असतं.
म्हणजे फोटो पाहून तिकडे जाण्याची इच्छा झालेल्या माझ्यासारख्याची सोय झाली असती!!!

सुंदर फोटो. त्यातले मधले दोन, लाटांचा खेळ असलेले जबरदस्त आहेत. आवडले.

बिपिन कार्यकर्ते