देवा तुला नक्की काय करायचं होतं ?
भल्यामोठया तंट्यातून , तू जन्म मला दिला
अगदी थोड्या क्षणात , तू पोरका याला केला
आधार देतो म्हणून , तू थोडा पुढे आला
पुढे येऊन माझा , आधारच घेऊन गेला
तेव्हाच माझ्या मनी , एक कोडं उभं होतं
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?
सुख म्हणून दिलस , ते झोळीत नाही पडलं
किती सांगू तुला , नेमकं काय काय घडलं
साठवण्या ते सुख , तू झोळी मला दिली
माझंच नशीब खोटं , ती ही फाटकी निघाली
सुख म्हणून नक्की , तुला काय द्यायचं होतं ?
देवा तुला नक्की काय करायचं होतं ?
वाटलं होतं चालतोय ती वाट आहे न्यारी
अजून सुद्धा चालताना , ती काटेच फेकून मारी
होईल पुढे काही , अशी आशाच गायब झालीय
त्याच वाटेने माझी , हालत अशी केलीय
काव्यरस
मिसळपाव
.
शब्दांमागे धावण्यात
'बघणं' राहूनच गेलं
रस्त्याकडेचं इवलं रोपटं
कुणी न बघताच मेलं
शब्दांचा पसारा हवा
मोर-पिसारा नको
शब्दात उलगडून सांगा
'नुस्तं बघणं' नको
'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात
सौंदर्यगंध दरवळतो
समजून घेण्याच्या नादात
तोच नेमका हरपतो
समोर अप्सरा उभी
तिचं आधी नाव सांगा
वय-जात-उंची-शिक्षण
सगळं तपशील्वार सांगा
सांदि-कोपर्यात डुलणारं फूल-
त्यात विशेष क