लेखकशिव कन्यायांनी गुरुवार, 01/06/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसाचा ताप संपला
कि ऊन उदास होऊन
कोपऱ्यात एकटे बसते.
आपण कुणासाठी सावली
झालो नाही म्हणून
हुरहुरते, हळहळते.
अंधारात गडप होऊन
पाण्यापलीकडचे मृगजळ
शोधू लागते.
-शिवकन्या
लेखकअरूण गंगाधर कोर्डेयांनी गुरुवार, 01/06/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच आहे
मज एकटाच राहू दे
काय मागणे असे ते
मी तुजसी देतो रे
स्तुतिसुमनांचा वर्षाव
जरी करिसी मजवरी
तरी संतोष बहुत मज
परी जवळीक न साधी रे
तू वेगळा मी वेगळा
पडू नको गळी रे
देवत्व कठिण आहे रे
तुज पेलणार नाही रे
अंतर राखणे बरे रे
तुज अंतरी थारा नको रे
तू मम सौंदर्यात
लिप्त होउन राही रे
सर्वस्व मजला वाहुनी
कवटाळिशी दारिद्र्य रे
सुखी होउनी संसारी
राहशील तर बरे रे
तू संत ना महंत
ना बुद्ध ना भदंत
नर नारायण जोडी
एकदाच झाली रे
लीला माझी पठण करी
कीर्तने प्रवचने करी
मज जवळी येताची
होशील निर्माल्य तू रे
लेखकअरूण गंगाधर कोर्डेयांनी बुधवार, 31/05/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जमले सभोवताली जे
सारे ओळखीचेच होते
साऱ्यांच्याच शस्त्र हाती
निः शस्त्र मीच होतो
हत्यारे उगारली जरी
उपकारकर्ता मीच होतो
जगण्याची भ्रांत त्यांना
जेव्हा केव्हा पडली
माझीच भाकरी मी
त्यांच्या पुढ्यात वाढली
सारेच कसे विसरले ते
जेव्हा नागडे होते
माझेच वस्त्र अर्धे
पांघराया शरमले होते
त्यातील एक लहानगा
अगदीच पोर होता
वार त्यानेच केला
जो माझा मुलगाच होता.
लेखकVinayak sableयांनी शुक्रवार, 26/05/2017 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जे भांडल्यावर आधी क्षमा
मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा
असते म्हणून..
जे तुम्हाला मदत करायला पुढे
सरसावतात
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून
नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात
म्हणुन......!
लेखकअरूण गंगाधर कोर्डेयांनी गुरुवार, 25/05/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
बंधने झुगारणे माझ्याच हाती
मानणे ना मानणे माझ्याच हाती
कापलेले पंख किती उडणार सांगा
प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा
दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा
वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा
छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा
रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा
जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला
हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
लेखकअरूण गंगाधर कोर्डेयांनी मंगळवार, 23/05/2017 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
येताच तू, किनारा
शब्दात व्यक्त होतो
बेभान लाट होते
वारा अनर्थ करतो
पदरावरी तुझ्या ग
फुलती फुले अनेक
संध्येस धुंदी येते
गंधात स्पर्श फिरतो
डोळ्यातले तुझे ते
निः शब्द भाव भोळे
उर्मीत भावनांच्या
ओठात शब्द घसरे
चढतो असाच कैफ
जाणीव भ्रष्ट होते
लहरीत भावनांच्या
मजसी भुरळ पडते
तो काळही थबकतो
अंधार पेट घेतो
लाजूनी सागरही
ओहोटीत मंद हसतो.