लेखकअनन्त्_यात्रीयांनी रविवार, 05/11/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे?
या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी
कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम
वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
लेखकतृप्ति २३यांनी शुक्रवार, 13/10/2017 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
नवी मैत्री
नवी मैत्री आहे
पण आहे खूप सुंदर
कुठे ही असलो तरी
कुणीच कोणाला देऊ नका अंतर....
आपलं ते गोड़ गुपित
एकमेकींना सहज पणे बोलून गेलो
तुझे तेच माझे म्हणत
एकमेकींमध्ये रमत गेलो...
नवीन आहे आपली मैत्री
तरी जपतोय आपण फुलासारखी
कायमच एकमेकींना साथ देऊ
एकमेकींच्या आनंदासाठी.
तृप्ती समीर टिल्लू http://www.truptiskavita.com
लेखकमाम्लेदारचा पन्खायांनी शनिवार, 30/09/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?
रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?
घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ?
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?
भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . .
लेखकअनन्त्_यात्रीयांनी शुक्रवार, 22/09/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे अवघे
निमिषात अश्रुरूप घेते
उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते
शब्दांच्या निबिड अरण्यी
बहरणे कठिण किती असते
अमरत्व उमलण्या आधी
का मरण विकटसे हसते