Skip to main content

शांतरस

प्रेम - तुझे माझे ...

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/01/2013 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
‎'तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - ' --विचारून माझ्या प्रेमाचा का अपमान करतोस रे..... वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर तू सावरलेल्या माझ्या चेहऱ्यावरच्या अवखळ बटा... सागरतीरी मी वाळूत ओढलेल्या रेघोट्यावर तुझे अलगद फिरलेले बोट... ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे तू आपल्या ओठांनी टिपून घेतलेला पावसाचा एकेक थेंब... क्याफेतल्या उष्टावलेल्या कॉफीच्या मग धरलेल्या माझ्या हातावर तो हळूच फिरलेला तुझा हात ... डोळ्यात डोळे घालून अगणित काळापर्यंत पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ... माझ्या हृदयाच्या कप्प्यातल्या एका कोपऱ्यात मी दडवलेल्या त्या सगळ्या आठवणी ... तू कधीच आपल्या मनाने जाणून घ्यायला हव्यास
काव्यरस

सिद्धोबा

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 25/01/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो. थोडं आत वळल्यावर - भर दुपारी अचानक एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो. मूळ खोड नसणाऱ्या पारंब्यांच्या वडाखाली मोरांचा एक थवा केकारवत फिरतो इकडेतिकडे. तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी एक नितळ झरा आहे, थंडगार! वेळू आणि आमराई वगैरेही- निळंशार आकाश, स्वच्छ मन, निवलेले डोळे, अक्षय शांती- तोच सिद्धोबा! पण थोडं आत वळावं लागतं - स्वतःच्या. कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो - तिथे रहदारी असते फक्त. .
काव्यरस

मनमुक्त

लेखक समयांत यांनी मंगळवार, 22/01/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परिधान केलेला घनक्लांत तो, मनमुक्त बोल उधळत आहे.. जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा.... पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;) त्याच्या भेटीच्या असोशीने..... n
काव्यरस

येशील?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/01/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या
काव्यरस

विखुरलेला चंद्र - अंतिम

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/12/2012 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं ---- अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय शिकार्‍याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत पाण्यावर झुलणार्‍या तार्‍यांचे ते शेपूट ते अजूनही तसेच मोहक आहे ----- पण तो चंद्र, तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्‍यातून ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन पाण्यावर वाहत वाहत किनार्‍याला लागतोय ------ जातांना तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस... ~~~(समाप्त)~~~ |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१२/२०१२)
काव्यरस

देह आत्म्याचे मंदीर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 24/12/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
उभे भक्कम पायावर एक राजस आहे घर तेथे भगवंताचा वास, देह आत्म्याचे मंदीर देणे लाभले इश्वरी चमत्कार खरोखरी त्याचे लोभस रुपडे काया रेशमी गोजीरी चार खांबांचा निवारा दोन नेत्रांचा पहारा आत्माराम तेजोमय राही धरूनी पिंजरा नको भरू ते धूराने नको माखू काजळीने प्राणज्योतीचे देऊळ ठेवी त्याला निगुतीने देह आत्म्याचे मंदीर दिव्यतेजाचे ते घर उरे मूठभर माती जाता प्राणपक्षी दूर लक्ष चौ-यांशी फ़े-यांत आला मानवी देहात नको घालू रे करंट्या देणे इश्वरी, कच-यात
काव्यरस

दीप

लेखक समयांत यांनी शुक्रवार, 21/12/2012 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...
काव्यरस

आजूनहि मी

लेखक श्रीमत यांनी गुरुवार, 20/12/2012 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही अजूनही मी वावरतो ह्या माणूस हरवलेल्या सनातन शहरात ऐकतो पवित्र परंपरा अन संस्कृतीचा झिंगलेला जयघोष, नग्न करून धिंड काढलेल्या स्त्री बद्दलचे, भाड्याने आणलेल्या रडव्यांचे मुक्त पंचतारंकित परिसंवाद गरिबी हटाव आणि जाती वादाच्या मादक गर्जना.......... पहातो लोकशाहीच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पाशवी बलात्कार निर्विकारपणे मनावर एकही ओरखाडा उमटू न देता मी मित्रांबरोबर चहा पितो ,सिगारेट ओढतो, हिंदी सिनेमा पहातो प्रयेसीच्या दारावर चक्कर मारतो............ मग रात्री निर्लज्जपणे माझ्यातला मी, स्वत:ला विचारतो एवढा का मी षंढ अजून ही????????????
काव्यरस

भूक

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/12/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले
काव्यरस