चांदणचकवा
काट्यांत हरवली वाट
संदिग्ध पावले माझी
वळणावर एका अवचित
अबोल होऊनी गेली....
वस्ती ही आता दूर
वळ्ण्याचा नाही धीर
एकाकी निर्जन रानी
हे श्वास ही होती तीर....
जगण्याचे वादळ शमले
मृत्युची ओढ न उरली
निस्तब्ध शांत या रात्री
ओझेच सावली होई....
भिरभिरतो रानी आता
दिशाहीन जणू रावा
जगण्याच्या आवर्ताला
मरणाचा चांदणचकवा...
पद्मश्री चित्रे (फुलवा)
काव्यरस
मिसळपाव
नाणेघाटच्या अविस्मरणीय ट्रेक मधील एक निवांत क्षण
मंतरलेले दिवस ते, आता परत येतील का
वेळीअवेळी मित्र माझे हाका मारत येतील का
मान्य आहे सगळे येथे गरजेपुरते सखे
गरजेला मी साद घालता तरीही धावत येतील का
भेटलास आनंद झाला, नको म्हणाया कुणी
नाही भेटलो म्हणून साले शिव्या घालत येतील का
निर्जळ झाल्या आपुलकीच्या नद्या इथे डोळ्यात
प्रेमाचे ते झरे नभातून वाजत गाजत येतील का
मिटेल का कधी इथली ही विषयांची वानव