Skip to main content

शांतरस

<गोवरी>

लेखक यकु यांनी गुरुवार, 15/03/2012 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी उगाच्या उगाची किती कुंथीशी मानवाची नसे कोणतीही स्थिती चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी जात जातीत भेदे अशी ती कशी जळेना कळेना मढी जाळीशी बाबारे कोरडे तरी तेच आहे लिहिशी कविता तू ती कशाने अशी यात ना काही तरी तू तोच आहे पिसारा कशाला उगा दाविशी करावे भरावे उणे तूच पाहे खपावे मरावे गोवरी जाळताहे (कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )

प्रेमात हे असेच असते

लेखक गोंधळी यांनी मंगळवार, 13/03/2012 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी तीला पाहत होतो ती मला पाहत होती पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते मी तीच्याशी बोलत होतो ती मझ्याशी बोलत होती बोलता बोलता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते मी तीच्या तीने माझ्या सहवासात रहावे असे एकदा वाटु लागले होता होता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते खरच प्रेमात हे असेच असते अखेर एकदा मी तिला प्रेमाचि साद घातली तिनेही मला प्रेमाने प्रतिसाद दिला पण आता असेच वाटते एक दिवस असे होनार होते कारण खर
काव्यरस

मजल

लेखक यकु यांनी मंगळवार, 13/03/2012 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
मजल आम्हाला गझल लिहीता येत नाही - म्हणून गजलेच्या दिशेने आम्ही मारलेली ही मजल) हे गोड आठवांनो बरसू नकात आता स्मृतीशेष त्या स्थळांना उकरू नकात आता भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो असता असेही काही गलती अमान्य नाही पुसण्यास जाच आता देईल ती ही ग्वाही तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती उमजून सर्वकाही नियती कठोर होती तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही या बुजूर्ग सांगण्याला झालो मी न राजी धाडून पाहिली मी आमंत्रणे तहाची शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता हे गोड आठवांनो बरसू नकात आता
काव्यरस

का? का? का?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/03/2012 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
का? का? का? पानांनाही कधी का येतो गंध फुलासारखे हुंगून होण्या धुंद पाण्याला कधी चढते निळाई जंगलात का असते हिरवाई रंग फुलांचे इतके का आगळे पाहून असे का होते ते नकळे डोंगरावर ते वृक्ष उभे का सावली देण्या ते तेथे का आकाशात ढग का जमून येती आता येथे मग कोठे जाती वारा भणाण उगा का वाहतो "की, मी येथे आहे" असे सांगतो हा मी एकटाच का कधीचा आलो येथला नसूनही का येथलाच झालो - पाभे
काव्यरस

आकाश उजळले होते,,,

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 08/03/2012 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>
काव्यरस

स्वप्नांस शाप आहे............!

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 07/03/2012 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या झाला सराव आता, अंधार साहण्याचा या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा संध्या
काव्यरस

अंबरात फिरुनिया उगवतो....

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/03/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ || बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ || स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी निळ्या बोलक्या..
काव्यरस

देखणी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 01/03/2012 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
नवी पालवी अन नवे अंतराणे जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे उराशी किती भोवले पाहुणे हे गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे पुन्हा पाखरे आळवीती तराणे जरेल्या तरूंचे उभरले कणे साद घाली कुणी देइ आमंत्रणे बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे मनाची कुपी उलगडी आवरणे गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे देखणी सुप्तशी उंबराची फुले अमृताच्या सरी द्वैत पारायणे .......................अज्ञात
काव्यरस

मूळ

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 25/02/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
गुंता गुंता फांदी फांदी शकुनाची ना करिते कसली अनावधानी चिंता येती जाती ऋतु-पर्णे मोहोर अवघे अव्यक्त तळातिल; "मूळ" गातसे गीता निष्काम कर्म गत युगायुगांचे गीत निश्वासांप्रति श्वासांस खेळवी प्रीत उधळून गंध रंगात उमलवी काया बघ निसर्ग कैसा जगण्याचे संगीत मोहात अडकले पाश पृथक जन्मांचे विसरले गमक रुजण्यातिल; वंश मनूचे मिथकांचे रांजण स्वैर उधळवी माया ओंजळी रिकाम्या स्वप्न काय कामाचे ? सौहार्द मुके रे जगा जगू द्या सारे शिणु नका; मिळूनी; वस्त्र विणू या न्यारे भंगूर क्षती मग चिरंजीव होतील पुन्हा रे ऋतुमानपरत्वे; आपले आपण; वळतिल बुजरे वारे ......................अज्ञात
काव्यरस