जाऊन जराशी येते
जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती
मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी
जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता
हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी?
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी
हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा
भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस
मिसळपाव
