शृंगार
गुलमोहोर
काय सांगु त्या गुलमोहोराची साथ
बालपणापासुन आहे त्याच्या हातात हात
शाळेत जाताना अर्ध्या रस्त्यावर त्याचे अधिष्ठान
लाल गोजिऱ्या फुलांमधुन हळुच डोकावे हिरवे पान
वयात येता हुरहुर लावतसे जीवा
टपोऱ्या फुलांच्या खाली असे थोडा गारवा
वाऱ्या सोबतीने पडतसे फुलांचा सडा
धुंद वारे वाहताना सोबती गुलमोहोर खडा
हिरव्या पानांच्या मखमालीने फुलले माझे मन
त्या घरी ही गुलमोहोर असावा आस मनी धरुन
पुर्ण व्हावी कामना असे वाट्तसे माहेरी
काय सौभाग्य माझे दिसला गुलमोहोर दारी
जातानाही गुलमोहोराला सांगा साथ माझी करशील
सरणावरती लाल फुलांची रांगोळी तू रेखशील
प्रसन्ना जीके
काव्यरस
<काहीच्या काही ...> अर्थातच कैच्या कै
आमची प्रेरणा
आभास कविता
कि पास कविता
*त्यास कविता
मिळालेली |
हे शिडशीडीत
ना फटफटीत
ना धडधडीत
साध्य कसे ?
अर्थ गर्भ पोरी
खिसा कशी जाळी
गूढ कधी काळी
घे जाणोनी |
शब्दांचा कंटाळा
अर्थांचा घोटाळा
नि*धाचा पाचोळा
फार झाला |
तो श्वास, नि: श्वास
लसणाचा वास
सार बाजू त्यांस
आज तूही |
मागणी प्रमाणे
प्रेम प्रसवावे
मूढ प्रेमीस रे
कोणी सांगा |
चलनात नाणे
मद्य आणि खाणे
'बार' ' बार' करणे
एक सत्य |
पाहिजे तनू
जे पाहता स्तब्ध
करी नाद लुब्ध
समोरच्यास |
आम्हा व्यथा फार
नको पुन्हा भार
जगू क्षण चार
एकट्याने |
जो घेई अर्जंटं
होई डॉक्टरी पेशंट
तो इंटेलिजंटं
होई
इशारा
न ठावे सख्या, तू कुठे गुंतलेला...
तुझ्या चाहुली जीव आतूरलेला
कधी वाटते की तुला जाणते मी
जरी चेहरा तो, नसे पाहिलेला
'असावा असा तो शिलेदार माझा'
कितीदा तुला मी मनी रेखलेला
इथे रोज नाती नवी गुंफताना
उरी भास वेडा, पुन्हा जागलेला
कसा तू कुठे भेटशी... कोण जाणे...?
कसे ओळखावे... मना राजसाला ?
म्हणे... तू विधात्या, असे योजलेले
जरा दे इशारा... दिशा वेधलेला
काव्यरस
अचानक....
अ्चानकच तूला अस समोर बघितलं
आणि काय झालं न कळे
शुष्क असलेल्या जिवनात
एक कोम्बं अंकुरलं.....
निगा राखावी तर कशी कळेना
पाऊस प्रेमाचा कधी पडेना
रान वाळवंट झाले....
ग्रिष्माचे रण माजले....
मग केले हद्दपार पावसाला
या जिवनातून
तुझ्यासकट......
आणि पुन्हा अचानक....
हो अचानकच.....
तू समोर आलास..
ठरवलं होत थेंब हे
पडु द्यायचे नाहित तरी
उगाच पाणी तरळले
झिरपु नकोस म्हंटल तरी
हा पाऊस कोसळलाच
प्रसन्ना जीके
काव्यरस
तू पुन्हा
आसमंती लाघवी गंध जेव्हा लाजले
मोगर्याने गे तुझे, नाव तेव्हा घेतले
पैंजणांच्या किलबिली, पाखरे नादावली
थिरकता तव पावले, सूर साती छेडले
मोकळ्या ओल्या बटा, फिरविता वार्यावरी
थेंब ते सारे झणी, चातकाने झेलले
भास्कराने पाहता, वळविला तू चेहरा
अन नभीचे मेघ ते, पश्चिमी झेपावले
गौर अंगाला तुझ्या, चुंबणारे ऊनही
ती झळाळी कांचनी, लेवुनी सरसावले
स्मित गाली विलसता, दशदिशा आसावल्या
हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले
शब्द ही ना बोलल्या, पाकळ्या अधरातल्या
श्वास माझा तोलती, अर्थ ते नजरेतले
काव्यरस
(सुज रंग)
ह्या काव्याचे हे एक मुक्त स्वरुप-
लालसर झाल्या त्या जागा
जेथे डासा रे तू मला चावला
उडत ये तसाच गुणगुणूनी
आजच तू या संध्याकाळी...
टायर, डबे, घाण अंगणी
त्यात पाणी थोडे ठेवूनी
तुझिया स्वागताची तयारी
जय्यत करोनी ठेविली...
डोक्यावर तेल लावून,
बसले मी ओट्यावरी
गुणगुण तुझी ऐकूनी
कांती माझी आसुसली...
टचकन तुझी सोंड खूपसुनी
पी हे माझे रक्त लवकरी,
सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना...
अधीर ही तनू बावरी..
खाजवू ती चाव्यजागा,
मजाच त्याची निराळी
तुझ्या चाव्यांच्या खूणा घेऊनी
सुज्जित बाला दिसे निराळी...
तुझ्या असंख्य डोळ्यातूनी
ऊडून पहा खालती
लाललालती सुजगर्विता
स
काव्यरस
दीप रंग..
धूसर झाल्या नभी तारका
आसमंती बेहोष हिवाळी,
मेहंदी रंगल्या सोनपाऊली
पहाट घेऊन येई दिवाळी..
मंद तेवते दीप अंगणी
जणू नक्षत्रे उतरून आली,
रंग माखूनी अंगावरती,
जमीन सारी भरून गेली..
मंद सुगंधी अभ्यंगातून,
धुंद काया होत सकाळी
चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी
यौवनास या नवी झळाळी..
रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन्
सुवर्णमाला गळा ल्यायली,
निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी
वस्त्रांकित ही तनू बावरी..
बिंदी रेखूनी भाळावरती,
काजळरेखा नयनी आली
साज सोवळा लेऊन दर्पणी
लज्जित बाला रूप न्याहाळी..
क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती,
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती..
- प्राजु
काव्यरस
ये ना .....
ये बाहुपाशी हलकेच प्रियवरा
राजसा, का असा, दुर तू जाशी?
सखया तू येना जवळ लवकरी
बघ रे कधीची चांदरात झाली !
मिठीत तुझीया रे स्वर्ग साती
नाते अपुले, जणु मीन जळाशी,
तु घेना मज कुशीत झडकरी
प्रीतीची ज्वाला मनी भडकली !
विझवलेले सख्या दीप कधीचे
बहाण्यास तुझ्या.., पडले फशी,
धरू नकोस ना राग मजवरी
बघ रात्र सारी उडून चालली !
सोड ना आता रुसवा फुकाचा
कशास फसवे हे कलह प्रियेशी?
पंचप्राण घेवूनी उभी निजकरी
ये.. मिलनवेळा निघुन चालली !
विशाल.
काव्यरस
(धूळधाण)
तुझा फोटो पाहून
व्यवहाराचे गणित समजून घेताना
तुझ्या गोतावळ्याचा हिशोब लिहू लागले तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
"सासू, दिर, भावजय, आणि नणंद
ह्यांचा हिशोब लावतेयसच कशाला?
लग्न आपल्यासाठी असतं
अन नातीगोती भांडणं करण्याऱ्यांसाठी.
नातलग सगळे सारखेच- इथून-तिथून."
स्वार्थ पाहण्याची जेव्हा वेळ आली
तेव्हा हेच आठवून मी बाजूला सरले
कारण त्या वेगळ्या संसारात भलं आपलंच होतं
डोकं वापरुन निर्माण केलेलं!
***
गेल्या दसरा-दिवाळीत
आपण घर आवरत होतो
आता पुन्हा सण आलाय...
आता पसारा आवरुन घायचा आहे
माळ्यावरची बोचकी-बाचकी फेकण्याचा
मनोसंकल्प तरी तडीस न्यावाच लागेल, कारण
बोहारणीकडून चांगलेसे भांडे मिळवण्याचे रंजन त्यातच!
मिसळपाव