Skip to main content

काथ्याकूट

भाव तेथे(च) देव:......यनावाला

लेखक यनावाला यांनी सोमवार, 18/12/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाव तेथे(च) देव:......यनावाला आमच्या कोकणात गणेश चतुर्थीचे महत्त्व अन्य धार्मिक सणांच्या तुलनेत सर्वाधिक असते. उत्सव दीड दिवसाचाच, पण त्या काळात गणपतीच्या मूर्तीला सतत जिवापाड जपावे लागते. मूर्तीला कुठे तडा गेला, टवका उडाला, देवापुढील समई-निरांजन विझून अंधार झाला तर ते अगदी अशुभ मानतात. लहानपणी मी एकदा आईला विचारले," आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली, " अरे, मानला तर देव. नाहीतर मातीचा बाहुला." ......म्हणजे देव हा केवळ मानण्यावर आहे. काल्पनिक आहे. त्याला खरे अस्तित्व नसावे. असे मला तेव्हापासून वाटू लागले.

श्रद्धेमुळे विकृती

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 01/12/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धेमुळे विकृती........यनावाला ................................ रविवारच्या वृत्तपत्रात -(दि.२०-मार्च-२०१६)-"नातवासह आजोबांचा अंत" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. आजोबा ( सुधीर शहा, वय ६५ वर्षें ) यांनी पहाटेच्या वेळी नातू (जिनय, १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात त्यांनी लिहिले., "कोर्टातील खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे.

जगाचा अंत १५ ऑक्टोबरला?? सिरिअसली ??

लेखक हर्मायनी यांनी बुधवार, 11/10/2017 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही मॅच व्यतिरिक्त संध्याकाळचा tv लावणं केव्हाच बंद केलंय . काल जेवण झाल्यावर कोणीतरी tv लावला तो बातम्या बघण्यासाठी.. एकीकडे दिवाळीच्या फटाक्यांवर लोकं खडे फोडत होते, तर दुसरीकडे वीज पडूनही टोपली खाली असलेली मुलगी जिवंत राहिली आणि हा एक वैद्यकीय(dude, really?) चमत्कार आहे असा एक डॉक्टर सांगत होता.आणि तिसऱ्या चॅनेल वर न्यूज रिपोर्टर बाई आपल्या नाटकी धीर-गंभीर आवाजात जगाचा अंत अगदी ५ दिवसांवर येऊन ठेपलाय हे सांगत होती. तिचा म्हणणं परीणामकारक करायला २०१२, डीप इम्पॅक्ट वगैरे चित्रपटांमधील दृश्य दाखवली जात होती. हे जवळजवळ १५ ते २० मिन चालू होतंआणि यानंतर त्यांनी एक चर्चा सत्र आयोजित केलं होतं.

सुधा मूर्ती बिझिनेस क्लास

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 28/07/2017 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पार्श्वभूमी " -सुधा मूर्तींनी बिझिनेस क्लास चे बोर्डिंग कार्ड घेऊन रांगेत उभे असतांना एका बाईने त्यांना "ह्यो स्पेशल क्लास हाये तुमी तिकडे जावा, आले उठून गुरांच्या कळपातले " सदृश काहीतरी बोलली -सुधा ताई संतापल्या पण शांत राहिल्या आणि त्यांनी विचार केला तेव्हा कळले कि त्यांच्या साध्या कपड्यात त्या बिझिनेस क्लास वाल्या दिसत नव्हत्या -आपले बोर्डिंग कार्ड दाखवून त्या बै ला शांत करण्या ऐवेजी त्या स्वत:च शांत बसल्या ट्रान्स्फर सीन -एक समारंभ जिथे सुधा ताई अध्यक्षा आणि ह्याच त्या बाई आता स्वतः सध्या कपड्यात अवतीर्ण झाल्या आणि सुधातैंना बघून चकित झाल्या आ

बिहारचे राजकीय नाट्य.

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 27/07/2017 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारमध्ये काल जे राजकीय नाट्य रंगले त्याचे युपीए आणि एनडीए च्या पुढील राजकीय वाटचालीवर काय परिणाम होऊ शकतील? आधीच सगळा गेम फिक्स झाला असावा आणि फक्त राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची वाट बघितली गेली असावी का?

डेटा महापूर

लेखक अत्रन्गि पाउस यांनी बुधवार, 01/03/2017 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर अनुभवांचा महापूर , भावनांचा महापूर, सल्ल्यांचा महापूर, कवितांचा महापूर, लेख, कथा निबंधांचा महापूर ....तत्वज्ञान पंथांचा तर महापुराचा धबधबा जणू .... बऱ्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अस विचारलं होत कि "डेटा अनालिसिस चे अंतिम भवितव्य काय ?" तेव्हा "अंतर्ज्ञान" असं उत्तर देऊन मुलाखत काराला त्या उमेदवाराने नि:शब्द केले होते कोणताही विषय घ्या ...अपरंपार डेटा उपलब्ध ..खरी, खोटी , पूर्ण, अपूर्ण...आमच्या भाषेत structured / unstructured डेटा आणि मग त्याचं पृथ:करण, चर्वित चर्वण, त्याचे प्रत्येक टप्प्यावरचे निष्कर्ष मग त्या निष्कर्षांचा वेगळा डेटा आणि मग त्यावरची अनुमाने ...

व्हॉट्सॅपिय दावे

लेखक Nitin Palkar यांनी सोमवार, 20/02/2017 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट्सॅपिय दाव्यांची इतकी दखल घेऊ नका.--- डॉ सुहास म्हात्रे या वरून सहज सुचलं ...... मुंबई पोलीस, डॉ. अमुक अमुक रामभरोसे हॉस्पीटल अथवा मेजर सो and सो अशांच्या नवे प्रसारित होणारे खोटे संदेश. प्लीज हे वाचा... तुम्हांला माहित आहे का? जर का तुम्हांला तुमच्या एटीएम (ATM) कार्डासमवेत तुमचं अपहरण केलं तर काही काळजी करू नका, तुम्ही त्यास अजिबात विरोध करू नका, अपहरणकर्त्याच्या सांगण्यानुसार ATM मशीनमध्ये तुमचं ATM कार्ड टाका.

मोबाईल घेण्यासंदर्भात मदत हवी आहे.

लेखक अव्यक्त यांनी बुधवार, 15/02/2017 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी दिनाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १३०००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित.

हे पण छळ-कपट वाले कॉल

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 09/02/2017 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे http://www.jobishh.com/ किंवा http://www.clickjobs.com/ सारख्या काही ठिकाणांहून अचानक बरेच कॉल्स येताहेत ... थोडक्यात सांगायचे तर तुम्ही काही पैसे ६ ते ९ हजार भरा आणि ते तुमच्यासाठी इंटरव्ह्यू (निश्चित नंबर किंवा कालावधी नाही) अरेंज करतील त्यांच्याशी जेव्हा रोकडी बातचीत करावी आणि जर का रिफँड साठी तुमच्या अटी शर्ती काय आहेत असे विचारले तर अत्यन्त गोलमाल उत्तरे देतात ... योगायोग म्हणजे हे सगळे कॉल्स दिल्ली हुन येताहेत आणि बराच अक्सेंट मारून बोल्ट असले तरी इंग्रजीचा दर्जा बघता अत्यन्त संशयास्पद व्यवहार वाटतो

नाशिक शिर्डी हॉटेल्स

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 05/01/2017 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवसात ठाणे नाशिक शिर्डी आणि परत असा प्रवास करायचे योजले आहे सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करण्यासाठी काही विशेष उत्तम चवीचे पदार्थ देणारे ढाबे/ हॉटेल्स सुचवू शकाल का ? मुख्य महामार्ग फारसा लांब न सोडता जाता आले तर फारच उत्तम .. धन्यवाद ...