मदत/सल्ला हवा आहे- नवीन फरशी/लाद्या बसवणे आणि रंगकाम
नमस्कार मंडळी,
सध्या घरातल्या hall आणि बेडरूम अशा दोन खोल्यांसाठी नवीन लादी/फरशी घालणे आणि रंग काढणे असे काम करायचे आहे. त्याच्यासाठी Contractor ला contract देऊनच करून घेणार आहोत, तरीही या संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असावी या दृष्टीने हा धागा काढत आहे. नेहमीप्रमाणे मिपाकर मंडळी योग्य मार्गदर्शन करतील याची खात्री आहे. याआधी या विषयावर चर्चा झाली असल्यास त्या धाग्याचा दुवा द्यावा.
काही प्रश्न :
१) सध्या घरात साध्या फारश्या आहेत, त्याजागी मार्बल टाकायचा विचार आहे, जे खर्चिक आहे, या मार्बल ची जाडी किती असावी, कारण दिसायला आणि पुसायला चांगल्या असल्या तरी त्या पुरेश्या मजबूत असतात का?
मिसळपाव