जाग
उन्हाळ्यातल्या एका दुपारी पळस आणि गुलमोहर भेटतात. गुलमोहराला असंख्य बारीक बारीक पाने तर पळसाला मोठ्ठी तीन तीन पाने. गुलमोहर शीतल लाल रंगाने न्हाऊन निघालेला आणि पळस... आहा.. आग पेटताना निमिषार्धापुरतीच होते तसा तप्त लाल रंग. हालहवाल विचारून झाले की झाडे एकमेकांची गळाभेट घेतात. गुलमोहराच्या इवल्याश्या पानांनी गुदगुल्या होऊन पळसाची मोठी पाने अवखळ हसतात. दुरूनच चंद्रकोर दोन्हीकडच्या लाल छटा एकत्रित पाहत स्वतःचे अंतःकरण तृप्त करत होती. तिथून परावर्तित होणाऱ्या तेजाने क्षणापुरते सूर्याचेही डोळे दिपले. झाडांनी कान टवकारले. धून ओळखीची होती. झाडे वेगळी होऊन आवाजाच्या दिशेकडे डोळे लावून बसली.
काव्यरस
मिसळपाव