Skip to main content

मुक्तक

गोंड चित्रकलेचा माझा प्रयत्न

लेखक मनस्विता यांनी मंगळवार, 11/08/2026 08:29 या दिवशी प्रकाशित केले.

 आपल्या देशात अनेक आदिवायी आणि त्यांनी जोपासलेल्या कला आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाशी जोडलेली घट्ट नाळ दिसून येते. त्याचबरोबरीने त्यांच्या समूहाचा एकत्रित अनुभव, आठवणी यांचं चित्रण असते.

मी काढलेले हे चित्र असेच एक उदाहरण आहे. एक आर्ट वर्कशॉप अशी सुरु झालेली सामूहिक क्रिया, मैत्रीण, घरची मंडळी अशा सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची ही एक गोष्ट आहे.      

एक जीवघेणं लावण्य!

लेखक अनिशासूत यांनी मंगळवार, 07/07/2026 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्य उगवला, सकाळ उमलून आली. जाग आली तर माझ्या हातावर डोकं ठेवून निजलेली तू. अस्ताव्यस्त केस, मोठं कपाळ, लांब नाक, गोऱ्यापेक्षा जरा कमी आणि सावळ्यापेक्षा जरा उजळ रंग. तुझे ते गडद गुलाबी ओठ, नाजूक हनुवटी आणि कचकन चावा घ्यावासा वाटणारे तुझे ते गोड कान. आखीव भुवयांच्या खाली बंद पापण्याआडचे तुझे पाणीदार डोळे.

काव्यरस

पाऊस वाजतो दारी.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 24/06/2026 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
प

 नेहमीसारखाच साडेपाच वाजता उठलो.  पाऊस पडत होता.काल दुपारी आलेला मेघराज वस्तीलाच राहीला वाटते! कल्पनेनेच शिरशीरी भरली,अंगावर काटा आला. इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपली. 

चित्रभाषा

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/06/2026 20:52 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या चित्रभाषेमधले मी
शोधित होतो जरी व्याकरण
त्या शोधाच्या वाटेवरती
मला गवसले काही विलक्षण

नियमबद्ध काहीही नसणे
हाच नियम असणार, वाटले
होते- पण त्या ओळींमधल्या
जागेवर ते पुन्हा भेटले

चकवा देऊन आकलनातून
पुन्हा पुन्हा निसटुनी जे गेले
तेच गूढ चित्राक्षर होऊन
मला पछाडून अथांग उरले

चाफा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 26/05/2026 20:53 या दिवशी प्रकाशित केले.

जोजवितो कवितेला सृजन पाळणा
शब्द जन्मखुणा, अर्थ प्रसवाच्या वेणा

शेषामाथी पृथ्वी तसा कवितेचा तोल
शब्द केवळ कल्लोळ, अर्थ डोह खोल

भूल घाली कवितेची अविरत साद
पावश्याची हाक शब्द, अर्थ मेघनाद

ध्यानी मनी कवितेचा चाफा लपलेला
शब्द पानोपानी गेला, अर्थ दर्वळला