Skip to main content

साहित्य

रात दाटली दाटली

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 06/08/2026 11:10 या दिवशी प्रकाशित केले.


रात दाटली दाटली 
उरी भावना कल्लोळ 
एका दिव्याचा उजेड 
लिही प्रकाशाची ओळ.

सारा अंधार अंधार 
मनी एक आठवण 
जरा उसवी अंधार 
असं नभात चांदणं.

कोण झुरे अंधारात 
कोण आठवितो कुणा 
काळोखाच्या वाटेवरी 
शोधी पावलांच्या खुणा.

काढी का ही रात अशी 
काळजाला उकरून 
चांदण्यांच्या सोबतीनं 
येई तुझी आठवण. 

काव्यरस

कोबीची भाजी खूप चवदार

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 23/06/2026 22:52 या दिवशी प्रकाशित केले.

कोबीची भाजी खूप चवदार 

कोबीची भाजी खूप चवदार
खाल्ली तर खातच राहणार || 

एक दिवस ही ट्रंपने खाल्ली
चड्डी त्याने पिवळी केली (कुणी, कुणाची?)

होय, कोबीची भाजी खूप चवदार 

एक दिवस ही मेलोनीने खाल्ली
मेलोडी चॉकेलेट पाहीजे म्हणाली 

काव्यरस

आकाशवाणीच्या आठवणी

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 24/10/2024 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
इये मराठीची नगरी ... मराठी आकाशवाणीच्या आठवणी नक्की बघा घोषणा करताना शब्द पुढे मागे केल्याने होणारे अनर्थ ( जसा शब्द लिहितं मुद्रा राक्षासाचा विनोद होतो तसेच काहीसे ) https://www.youtube.com/watch?v=o1oM8t5G8lk

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे भाषण.

लेखक गवि यांनी रविवार, 24/04/2022 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाचे लाडके व्यक्तिमत्व प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे साहित्य संमेलनातील भाषण. उत्स्फूर्त, मुद्देसूद आणि खणखणीत विचार मांडल्याबद्दल सरांचे अभिनंदन. ते मिपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिपाच्या प्रवासात सहभागी आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

कविता शोधायला मदत

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 06/01/2021 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही सध्या एक जुनी कविता शोधत आहोत.. "मी बाई कोकिळ वनांची राणी गाईन सुंदर गोड गाणी" याचे कवी माहीत नाहीत, कवितासंग्रह पण माहीत नाही..

मॅजिक रियलिस्म

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी सोमवार, 02/03/2020 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मंडळी. मराठी मध्ये आधुनिक काळात मॅजिक रियलिस्म तंत्र वापरून लिहिलेला कोणत्याही नवीन कथा किंवा कादंबरी आहे का? प्रणाम

लिहायचे आहे, पण कसे?

लेखक अनुप देशमुख यांनी बुधवार, 19/07/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे. लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला.

साहित्यातील survival of the fittest म्हणजे काय ?

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 25/02/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. माहितगार यांच्या लेखकास/लेखनास वाचवावे की नाही या लेखावर एक मजेदार संकल्पना आढळली ती म्हणजे "survival of the fittest'' मला साहित्यातील फिटेस्ट याचा अर्थ न कळल्यामुळे किंवा जरा गोंधळून गेल्यामुळे हा विषय चर्चेला घेतला आहे.

"कुत्र्याला खीर पचली नाही"

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 18/01/2016 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाल सबनीस हे नाव मी त्यांची यंदाचे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा प्रथमच वाचले. "हे सबनीस कोण?" असा प्रश्नही अनेकांकडून उघड ऐकला. श्रीपाल सबनीस यांचे निकटवर्तीय (पण बहुतेक आता दुरावलेले) पत्रकार घनश्याम पाटील यांनी "कुत्र्याला खीर पचली नाही" या शीर्षकाचा एक लेख लिहून सबनीस यांच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर टांगली आहेत. साहित्यजगतात इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण होत असेल आणि ते निर्लज्जपणाने करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदापर्यंत पोचत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही. सदर लेख आंतरजालावर सहज उपलब्ध आहे. परंतु भ्रमणध्वनी हस्तसंचावरून दुवा डकवणे कठीण जात आहे.

इतर भाषांतील साहित्य वाचण्याची गोडी लागण्यासाठी काय करावे ?

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 14/01/2016 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी मराठी साहित्याचे वाचन बरेच केले आहे. अजूनही करत आहे. अर्थात येथील वाचनसम्राटांच्या तुलनेत आम्ही मांडलिक राजेच म्हणा. सुरुवातीला घरापासून वाचनालय लांब असल्यामुळे आणि जास्तीत जास्त पैसे वसुल व्हावेत असा साधासरळ हिशेब असल्यामुळे मी जास्त पाने असलेले पुस्तकच घेत असे. यातुनच कादंबर्‍या वाचण्याची आवड वाढत गेली. कादंबर्‍या, कथा, संकीर्ण, प्रवासवर्णने, आत्मचरीत्र (चरीत्र नव्हे) अशा प्रकारच्या वाचनाची आवड जास्त प्रमाणात आहे. कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे.