Skip to main content

साहीत्य

रात दाटली दाटली

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 06/08/2026 11:10 या दिवशी प्रकाशित केले.


रात दाटली दाटली 
उरी भावना कल्लोळ 
एका दिव्याचा उजेड 
लिही प्रकाशाची ओळ.

सारा अंधार अंधार 
मनी एक आठवण 
जरा उसवी अंधार 
असं नभात चांदणं.

कोण झुरे अंधारात 
कोण आठवितो कुणा 
काळोखाच्या वाटेवरी 
शोधी पावलांच्या खुणा.

काढी का ही रात अशी 
काळजाला उकरून 
चांदण्यांच्या सोबतीनं 
येई तुझी आठवण. 

काव्यरस

मोहॉकची रणदुंदुभी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/05/2026 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ‘‘मोहॉकची रणदुंदुभी‘‘चे कथानक ज्या प्रदेशात घडते त्याची थोडीशी माहिती आज देतो आहे...

शब्द का नाहीसे होतात

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 08/01/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा माझा एक मित्र डेहराडूनचा आहे, हिंदी साहीत्य वगेरे वाचनाऱ्यांपैकी आहे. पार्टीमधे त्याच्या तोंडून कवि निरज किंवा कवि प्रदीप यांच्या कविता ऐकने म्हणजे एक मेजवाणीच असते. एकदा सहज गप्पा मारीत असताना तो म्हणाला “हमारे भैय्या डेहराडूनमे अध्यापक है.” त्यातला अध्यापक हा शब्द चांगलाच लक्षात राहीला कारण हल्ली हा शब्द कोणी वापरीत नाही. हल्लीच्या टीचर, प्रोफसर च्या जमान्यात कुणी अध्यापक असे म्हणतच नाही. हाच नाही तर असे कितीतरी शब्द जे एकेकाळी वापरात होते ते आज नाहीसे झाले. एका मुलाखतीत प्रसून जोशीने म्हटले की हल्लीच्या वाचकांची शब्दसंपदा कमी झाली आहे.