अनुभव
पाउस, ती आणि मी- भाग १
दोन दिवसांपुर्वीची गोष्ट, ऑफिसमधुन भिजत घरी आलेलो. घरी कोणी बॉसिंग करायला नसल्याने मस्तं पैकी कपडे बदलुन बीन बॅगवर आडवा तिडवा वेडा वाकडा पसरलेलो होतो. समोरच्या खिडकीमधुन मस्तं पाउस दिसत होता. कानावर हेडफोन आणि हातामधे कॉफीचा मग. विनअँप ला शफल ला टाकुन डोळे बंद करुन कॉफीचे सिप घेत होतो. थोड्या गाण्यांनंतर हे गाणं चालु झालं आणि नकळत अनेक खपल्या काढल्या गेल्या.
काही नवे करावे म्हणून.-भाग ६
माहेरचा आहेर म्हणून त्यांना तो घ्ययला लावला.नि
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.
सज्जनगड - एक जुनी आठवण
( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला !
काही नवे करावे म्हणून.-भाग ५
ओशाळून म्हणाला.” घरी चाललोय.राजापूरला.”मी काहीच बोलले नाही.पण सुरेखाचे यजमान कसले गप्प बसतात?,”आणि उद्यारे?” “नाय त्याच कामासाठी चाललोय .येणार ना उद्या !पण मॅडम, तेवढी केस मागे घ्याल ना?”ते बघू पुडे पुढे ते प्रकरण आणि हे प्रकरण वेगवेगळे आहे तेव्हा आताच काही सांगू शकत नाही.”मी आजच्या दिवसातली सिक्सर ठोकली.(क्रमश:)
************************************************ इतक्यात बस आली.
म रा.वि.म.मं. मधील एक दिवस
नेहमी प्रमाणे लोकलचे धक्के खाउन स्टेशनवर उतरलो आणि हुश्श केले. बुधवार असल्यामुळे अजून दोन फक्त दोन दिवस रेटायचे आहेत त्यातच बॉस नामक प्राणी दोन दिवस गायब असणार आहे ह्या सुखद कल्पनेमध्ये डुलत डुलत घरी आलो. घरी येताना आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला खूप काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले नंतर लक्षात आले. वीज नामक गोष्ट जी नित्यानेमाने सगळ्या घरात आपली उपस्थिती लावत असते ती गायब आहे( हाय मेरी फुटी किस्मत !) आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार ह्याची मानसिक तयारी केली. पण म. रा . वि. म. मं. ने एक सुखद धक्का दिला घरी पोचायच्या आत वीज आली(?). चला सुटलो म्हणत घरी पोचलो ….
उडदांमाजी....
‘मॅडम, बाहेर काळे म्हणून एकजण भेटायला आलेत. येऊ देत का ?’
दहा मिनिटापूर्वीच मी शिपायाला बजावलं होतं, मिटिंगचं काम आहे, एक तास कुणाला आत सोडू नको. आणि दहाच मिनिटात कोण काळे उगवला ? मी कपाळाला दोन सुरकुत्या पडून विचार केला. काळे नावाची कुणी व्यक्ती डोळ्यासमोर येईना.
‘थोडा वेळ थांबा म्हणावे..’ मी म्हटले.
इतक्यात शिपायाच्या मागून एक ओळखीचा चेहेरा उगवला.
‘मॅडम, येऊ का आत ?’
‘अरे, तुम्ही होय, काळे ? या, या ना !’
काळेला बघितल्याबरोब्बर माझी बत्ती पेटली. तीन वर्षापूर्वी माझे सोलापुरातल्या एका तालुक्याच्या गावी पोस्टिंग झाले असताना तिथे माझ्या हाताखाली दोन शाखा अधिकारी होते. हा काळे आणि दुसरा गोरे.
भाव तेथे देव (असं म्हणतात खरं!!)
मनुष्यास्वभावाला औषध नाही हे सर्वविदीत आहे. जगाकडे पहाण्याचा दॄष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तसेच आयुष्याकडून कुणाला काय अपेक्षा असतील हे सांगणे कठीण आहे. कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, वर नमूद केलेल्या बाबतीत फरक हा आढळणारच. कुणाच्या खांद्यावर काय ओझे असेल याचा अंदाज येत नाही. वरवर सामान्य वाटणारे हे स्वभावविशेष किती टोकाचा परिणाम घडवून आणू शकतात, हे दाखवून देणारा हा एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला अप्रिय प्रसंग आहे.
जे झाले ते आनंददायक मुळीच नव्हते. तो कटु प्रकार संपूर्णपणे टाळता येण्याजोगा होता. जवळची माणसे त्यात गुंतली असल्यामुळे जास्त वेदना झाल्या.
आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?
नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे.
सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो.
त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत.
मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का?
खर्च आपापला.
कळावे,
लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा.
आपला,
कट्टेकरी मुवि.
मिसळपाव