मोझाम्बिकची निवडणूकः १
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे.
मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल.
मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.
मिसळपाव