Skip to main content

अनुभव

आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 26/11/2014 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका आळसावलेल्या रविवारी घराच्या गॅलरीत अचानक एका अनाहूताची लगबग चालू आहे असे दिसले...

घटकाभरचं झुरणं..

लेखक Targat Porga यांनी गुरुवार, 20/11/2014 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम! हा शब्द तुम्ही फक्त ऐकलेला,वाचलेला असतो.त्या बाबतीत तुम्ही जास्त विचारही केलेला नसतो ती केवळ एक रम्य कल्पनाच आहे अशीच तुमची समजूत असते.ह्या गोष्टीची तुम्हालाही अनुभूती मिळावी ही कल्पना तुम्हाला कधी कधी शिवून जाते पण तुम्ही मात्र 'श्या !आपलं काम नाही हे प्रेम बीम ' अस मनातच म्हणून ती कल्पना करणं सोडून देतात.त्याचे फक्त वाईटच परिणाम असतात असं म्हणून तुम्ही स्वतःला समजावतात.

जडण-घडण 14

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 20/11/2014 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा.

कावळ्यांची शाळा

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 20/11/2014 15:40 या दिवशी प्रकाशित केले.

काकशाला

कावळ्यांची शाळा “ओकांना कावळे आवडते दिसतायत....”! … खरे आहे. पुण्यातल्या ओंकारेश्वराच्या आसपास नदीपार जवळून पास होताना सहज जाता जाता नुकतेच आईच्या अंत्यविधीसाठी जमलो असताना निर्माण झालेले दृष्य डोळ्यासमोर तरळले.

माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 20/11/2014 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५ या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी. मागिल लेखापर्यंत मी माझ्या कोकणातल्या गावाचे वर्णन केले होते.

एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 18/11/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ दिवाळीचे दिवस बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया. ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता. खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला.

दैव ,नशीब कि शाप ? भाग २

लेखक स्वीत स्वाति यांनी मंगळवार, 18/11/2014 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
bhag ek हे कुटुंब ज्या गावात राहते ते गाव छोटे च असून पूर्ण गाव एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी असते. जेव्हा किरण चा अपघात झाला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी खूप लोक धावले . लोंकाचा या कुटुंबावर असणारा जिव्हाळा तेव्हा दिसून आला. अर्थात या कुटुंबातील सर्वजन माणुसकी जपणारी आहेत . ग्रामीण भाग असल्यामुळे बर्याच वेळा वीज गायब असते .

दैव ,नशीब कि शाप ?

लेखक स्वीत स्वाति यांनी सोमवार, 17/11/2014 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दैव ,नशीब कि शाप ? हि एक सत्य गोष्ट आहे.. माझ्या आयुष्यातील कटू घटना ज्या पाहून वाटते कि का असे झाले ? एका कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो आणि त्या घरावर एका मागे एक संकट यायला लागतात. हे कुटुंब ग्रामीण भागातील आहे .

कोवळा हुंकार

लेखक समयांत यांनी सोमवार, 17/11/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं दोन ठोकर खात मला माझं संपवावं रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत. कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात.

"e" पुस्तके आणि कागदी पुस्तके

लेखक sanjivanik१ यांनी रविवार, 16/11/2014 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण . मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .