Skip to main content

अनुभव

Happy new year!!!

लेखक Maheshswami यांनी बुधवार, 24/12/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
बारमध्ये, परमिट रूम मध्ये, लाईट्स जमेल तेवढ्या मंद करून काळाकुट्ट अंधार करून ठेवण्याचे काय प्रयोजन असेल, हा मला नेहमी सतवणारा प्रश्न आहे. दारू पिणे काही गुन्हा आहे काय कि सगळ्यांच्या नजरा चुकवत अंधारात लपून करावा? गेल्या दहा मिनिटात वेटरचे "हेल्लो , शूक शूक " करून लक्ष वेधून घेण्याचा माझा दहावा प्रयत्न या अंधाराने हाणून पाडला होता. शेवटी, जोरात ओरडून बोलावल्यावर तो धावत पळत टेबलाकडे आला . मी तोंड उघडायच्या आधीच माहितीवजा धमकी दिली त्याने . "साब, और कुछ मंगानेका रहेंगा , तो अब्भीच बोलो . कल कि थरटी फष्ट की तैय्यारी के वास्ते बार आज जल्दी बंद होएंगा .

कथा bigger cypher ची

लेखक येडाफुफाटा यांनी रविवार, 21/12/2014 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार- लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे! यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला. म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे! bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते.

वाणप्रस्थाश्रम,मेंढपाळ -राजा आणी काहीबाही...

लेखक जेपी यांनी शनिवार, 20/12/2014 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीच काळ आणी रात्रीचा वेळ,यष्टीतुन प्रवास करताना मस्त पेकी डुलकी लागत होती.. तेवढ्यात डोक्यावर टपली बसली,चिडुन मागे पाहील..मक्या होता "अय लिंबुटीबुं काय झोपतो..

ये लाल रंग , कब मुझे छोडेगा ?

लेखक Maheshswami यांनी शुक्रवार, 19/12/2014 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला .

अहो गोविंदशास्त्री!

लेखक Maheshswami यांनी शुक्रवार, 19/12/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
अहो गोविंदशास्त्री! रविवारची अशीच एक सुस्तावलेली दुपार. पोटास तड लागेपर्यंत जेवण झालेलं. एक छानशी वामकुक्षी झालेली . फावल्या वेळात काय करावं असा विचार करताना सुचले कि चला, आज सतीश मामाला फोन करावा. सातिशमामा माझा सख्खा मामा. एका खेडेगावी शिक्षकाची नौकरी करतो. बऱ्याच गमती-जमती सांगत असतो तिकडच्या . फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मामा म्हणाला "अरे एक सांगायचं विसरलो. तुझा एक बालमित्र भेटला मला २ दिवसांपूर्वी. कोण असेल सांग पाहू?". आता हे गेसिंग चे गेम मला फार बोर होतात , उगीच त्याचे मन राखण्यासाठी मी २ मिनिटांचा पॉज घेतला, आणि म्हणालो " नाही बाबा ओळखता येत, सांग तूच !".

जडण-घडण 1६

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 19/12/2014 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा निवांतपणा. मी मजेत होते. आकाशवाणी सुरू होतंच. रूचेल तसं फ्री लान्सींगही सुरू होतं. फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या, त्यामुळे हातात पूर्णवेळ नोकरी नसण्याचं टेन्शन नव्हतं आणि मुख्य म्हणजे माझ्या सोयीनुसार मला हवा तेवढाच वेळ काम आणि प्रवास करून माझ्या बरोबरीच्या सर्वांइतकंच, किंबहुना थोडं जास्तच उत्पन्नही हाती येत होतं. त्याहून महत्वाचं म्हणजे माझ्या घरातल्या सर्वांनी कायम दाखवलेला विश्वास. अगदी दहावी किंवा त्यानंतरही मी काय करावं, शिकवणी लावावी का, डी.एड्. करावं का, त्यानंतर पुढे शिक्षण घ्यावं का, अशा सगळ्याच बाबतीत घरच्यांनी सल्ले जरूर दिले, पण दबाव नाही आणला.

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.

दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १

लेखक जेपी यांनी रविवार, 14/12/2014 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १- वेळः २ महिण्यापुर्वीची. स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला) ग्राहक-आत येउ का सायेब मॅ- या ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे. ...मॅनेजर कागदपत्र पाह्तो. मॅ- किती कर्ज पाहिजे ? ग्रा- द्या कि एक लाख काय. मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ? ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा. आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु.

भीतीच्या भिंती:२. जिवंत असण्याचा पुरावा

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 12/12/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) भाग १: एक तास जास्तीचा ‘काबूलला जायचं’ असं ठरल्यावर सगळ्यात आधी खरेदी केली ती दोन पुस्तकांची. एक श्रीमती प्रतिभा रानडे यांचं ‘अफगाण डायरी’ (पूर्वी वाचलं होतं आणि आवडल्यामुळे लक्षात होतं) आणि दुसरं श्री. निळू दामले यांचं ‘अवघड अफगाणिस्तान’.

जडण-घडण 15

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 09/12/2014 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मार्केटमध्ये कंपनीचं चांगलंच नाव झालं होतं. मला आठवतंय, त्या वर्षी दिवाळीसाठी वेगवेगळ्या आकारातल्या १०० पेक्षा जास्त शुभेच्छापत्रांसाठी मी संदेश लेखन केलं. यात आकार वैविध्याबरोबर पॉप अप, विनोदी, कॉर्पोरेट अशा प्रकारांचाही समावेश होता. एकंदर घोडदौड वेगात सुरू होती. मागच्या भागात सांगितलेल्या द्व्यर्थी किंवा काहिसे अश्लील शुभेच्छा संदेश लिहिण्याचं सुचवणाऱ्या त्या प्रसंगानंतर माझी एकंदर प्रतिक्रिया लक्षात घेत तो विषय तिथेच संपला होता. मला त्या वेळी घड्याळं जमवायची आवड होती. पण ही घड्याळं मनगटावर कमी आणि माझ्या डेस्कवर जास्त वेळ दिसायची.