HATS ऑफ टू फिलीपिनोज,
गेली चार दिवस नुसत प्रत्तेक लोकलच नाही तर इंटरनेशनल न्यूज चानेस्ल वर, वृत्तपत्रात, सगळीकडे, एकच चर्चा, “रुबी” (इंटरनेशनल नाव Hagupit) येतंय. त्याच्याशी लढण्यासाठी पिनॉय (फिलिपिनो लोक) सज्ज होत आहेत. ह्या बद्दल बोलण्या अगोदर थोडी या देशाची ओळख करून घेऊयात.
फिलिपिन्स – थोडी ओळख
नैसर्गिक वैविध्यतेने नटलेल फिलिपिन्स हा जवळ जवळ 7,107 लहान मोठ्या बेटांचा समूह. एकूण क्षेत्रफळ ३००,००० स्क़्वेर किमी. एकूण लोकसंख्या १०० मिलिअन (जगातील १२ वा सर्वात जास्त लोक्संखेचा देश, आणि आशियातला ७ वा) आणि, वेगवेगळ्या देशात विस्थापित झालेल्यांची संख्या जवळ जवळ १२ मिलिअन.
मिसळपाव
गोष्ट तशी ८ वर्षापुर्वीची. मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची, त्याचा हा नेहमीचा टाईमपास.
डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत अडकलेल्या एका जहाजेवर २००६ साली पोसायडन नावाचा सिनेमा आला होता. विजय आणि इतर काही मित्र सोबत रात्री ६-९ चा शो पाहून आलो. होस्टेल च्या खिडकीतून माझ्या रूम वरून मी बघितले तर विजय ४-५ मित्रांना सोबत घेऊन काही सांगत होता.