वैद्यकिय हलगर्जी (मेडिकल नेग्लिजन्स)
आज मी माझ्या आयुष्यात आलेल्या वादळाची कहाणी येथे मांडणार आहे. 2010 साली मला मासिकपाळीचा त्रास होत होता,आमच्या फैमिली डॉ ना कन्सल्ट करुन त्यांनी मला माझ्या आग्रहा (Insist) मुळे महिला स्त्री रोग विशेषज्ञ चे नाव रेफर केले त्या मॅडम ने काही टेस्ट करुन मला 3-4 महीने ट्रिटमेंट दिली व दर महिन्याला मासिक पाळी च्या 3-4थ्या दिवशी भेटायला बोलवत असे. औषधोपचार काही लागू पडत नाही हे पाहून मॅडम ने सोनोग्राफी व काही चाचण्या केल्यावर त्या म्हणाल्या कि गर्भ पिशवी काढायला हवी नाहितर कैंसर् होइल.मला हा धक्का च होता,जेमतेम 35 क्रॉस केलेय आत्ताच, हे कसे शक्य आहे?माझा मुलगा 5 वित् व लेक 10वि ला.
मिसळपाव