नेहमीचंच !
दिवाळी आली की मारवाडी रेशनच्या दुकानासमोर एक पलंग टाकतो, पलंगावर एक सतरंजी, काही फळांची रिकामी झालेली लाकडी खोकी खाली-वर पायर्यांसारखी चढण करुन विक्रीसाठी फटाक्याची रास लावतो. संध्याकाळी सात साडे-सातच्या सुमारास लक्ष्मीपुजनाचा तो दिवस, सगळी दुनिया सजलेली असते, सजवलेली असते, सगळ्यांच्या अगांत नवीन कपडे, घरा-घरातुन फराळाचा सुगंध, कुठे धुप तर कुठे दीपमाळ, कुठे लायंटिंग तर कुठे १००० फटाक्याची लड लावलेली !! चैतन्यमय आणि प्रसन्नचित्त वातावरणामध्ये 'ती' मारवाड्याच्या दुकानापुढे उभी रहाते.
मिसळपाव